एक्स्प्लोर

Who is Vignesh Puthur : नुकतंच मिसरूड फुटलेल्या फिरकीपटूची कमाल, पहिल्याच मॅचमध्ये धमाल, मुंबईने शोधून काढलेला विघ्नेश पुथूर कोण?

Vignesh Puthur debuts for Mumbai Indians in IPL : 'अनकॅप्ड' खेळाडू विघ्नेश पुथूरला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. आणि पदार्पण सामन्यात त्याने कहर केला.

Who is Vignesh Puthur Mumbai Indians Player : चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध रोहित शर्माच्या जागी दुसऱ्या डावात इम्पॅक्ट प्लेयर खेळाडू म्हणून आलेल्या 'अनकॅप्ड' खेळाडू विघ्नेश पुथूरला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने या संधीचा पुरेपूर वापर केला आणि त्याचे आयपीएल पदार्पण संस्मरणीय बनवले. 155  धावांचा बचाव करत असताना आठव्या षटकात कर्णधार सूर्यकुमारने पुथूरला गोलंदाजी सोपवली. विघ्नेशने सीएसके कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या रूपात आयपीएलमध्ये पहिला विकेट घेतली. त्यानंतर त्याने स्फोटक फलंदाज शिवम दुबेला (9) गुगली फसवले.

राहुल त्रिपाठीच्या विकेटनंतर, ऋतुराज गायकवाड आणि रचिन यांनी 67 धावांची भागीदारी केली होती, ज्यामुळे सीएसकेला या सामन्यावर मजबूत पकड मिळाली होती. त्यानंतर पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या विघ्नेश पुथूरने मुंबई इंडियन्ससाठी 3 विकेट्स घेतल्या. आठव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने ऋतुराज गायकवाड (53) ला झेलबाद केले. ही त्याची आयपीएलमधील पहिलीच विकेट आहे. त्यानंतर त्याने 10 व्या षटकात शिवम दुबे (9) ला बाद केले. विघ्नेश पुथूरने नंतर दीपक हुड्डाला आऊट करून अजून एक धक्का दिला. तो फक्त तीन धावा करू शकला. आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने विघ्नेश पुथूरला 30 लाख रुपयांना खरेदी केले. 

विघ्नेश पुथूर अद्याप खेळला नाही देशांतर्गत क्रिकेट...

रोहित शर्माच्या जागी त्याला इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात संधी मिळाली. हा क्रिकेट मूळचा केरळचा आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूरने वयाच्या 11 व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. केरळ क्रिकेट लीगच्या पहिल्या हंगामात तो अ‍ॅलेप्पी रिपल्स संघाचा भाग होता. त्या स्पर्धेत पुथूरने फक्त तीन विकेट्स घेतल्या, परंतु मुंबई इंडियन्स स्काउट्सचे लक्ष त्याने वेधून घेतले.

विघ्नेश पुथूरने अद्याप देशांतर्गत क्रिकेटमध्ये केरळ संघाकडून खेळलेला नाही. पण, पण मुंबई इंडियन्सच्या संघानं त्याला हेरलं अन् या पठ्ठ्यानं आपल्यातील धमक दाखवत मैदानही गाजवलं. आयपीएल लिलावात त्याला मुंबई इंडियन्सने 30 लाख रुपयांना खरेदी केले. हा केरळमधील रिक्षा चालकाचा मुलगा आहे. स्थानिक क्रिकेटमधील एका संघात खेळताना मुंबई इंडियन्सच्या शोध पथकानं या हिऱ्याला हेरलं आहे. आणि आज विघ्नेशच्या आयपीएलमधील पदार्पणाच्या कामगिरीनंतर त्याने झटक्यात प्रसिद्धी मिळवली.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द

व्हिडीओ

Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार
Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
Rajesh Kshirsagar: विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
Vasai-Virar Municipal Election 2026: सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
धमकी देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांना निलंबित करा, उद्धव ठाकरेंची मागणी; निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
धमकी देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांना निलंबित करा, उद्धव ठाकरेंची मागणी; निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
Embed widget