CSK vs MI Score IPL 2025 : चेपॉकमध्ये नूर अहमद अन विघ्नेश पुथूर चमकले, चेन्नईचा 4 गडी राखून विजय; रचिन रवींद्र ठरला विजयाचा हिरो
CSK vs MI Match Updates IPL 2025 : आयपीएल 2025मध्ये आज म्हणजेच रविवारी दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला आहे.
LIVE

Background
चेपॉकमध्ये नूर अहमद अन विघ्नेश पुथूर चमकले, चेन्नईचा 4 गडी राखून विजय
आयपीएल 2025 चा तिसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात खेळला गेला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर मुंबईने 20 षटकांत नऊ गडी गमावून 155 धावा केल्या. प्रत्युत्तरात, चेन्नईने 19.1 षटकांत सहा गडी गमावून 158 धावा केल्या आणि सामना 4 गडी राखून जिंकला.
चेन्नईत पदार्पण सामन्यात विघ्नेश पुथूरने घातला तांडव, तीन खेळाडूंची केली शिकार, CSKला चौथा धक्का
चेन्नईत पदार्पण सामन्यात विघ्नेश पुथूरने तांडव घातला आहे, त्याने चेन्नईला चौथा धक्का दिला. आधी ऋतुराज गायकवाड, शिवम दुबेनंतर त्याने दीपक हुडाला आऊट केले. 12 षटकांनंतर धावसंख्या 104/4 आहे.
विघ्नेश पुथूरने पदार्पणाच्या सामन्यात केली कामाल! कर्णधार ऋतुराज गायकवाडची केली शिकार
विघ्नेश पुथूरने चेन्नईला दुसरा धक्का दिला. त्याने कर्णधार ऋतुराज गायकवाडला आऊट केले. 22 चेंडूत अर्धशतक झळकावल्यानंतर तो बाद झाला. शिवम दुबे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे. नऊ षटकांनंतर धावसंख्या 92/2 आहे.
ऋतुराज गायकवाडचा तडाखा, 22 चेंडूत ठोकले अर्धशतक
7 षटकांनंतर, चेन्नई सुपर किंग्जची धावसंख्या 74/1 आहे. ऋतुराज गायकवाड 22 चेंडूत 50 धावांवर खेळत आहे. त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत. रचिन रवींद्र 17 चेंडूत दोन चौकारांसह 20 धावांवर खेळत आहे.
चेन्नईचा स्कोअर 62/1
मिशेल सँटनरच्या चेंडूवर ऋतुराज गायकवाडने दोन चौकार आणि एक षटकार मारला. 6 षटकांनंतर, चेन्नई सुपर किंग्जची धावसंख्या 62/1 आहे. ऋतुराज गायकवाड 19 चेंडूत 42 धावांवर खेळत आहे. त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. रचिन रवींद्र 14 चेंडूत दोन चौकारांसह 16 धावांवर खेळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
