तुमच्यात दम असेल तर मैदानात या, नाव न घेता जयकुमार गोरेंचा रामराजे नाईक निंबाळकरांवर हल्लाबोल
तुमच्या दम असेल तर या ना मैदानात असे थेट आव्हान सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी नाव न घेता रामराजे नाईक निंबाळकर यांना दिले.
Jayakumar Gore : कुस्तीत एखादा पैलवान कसाच हरत नसेल तर त्याच्या डोळ्यात माती टाकली जाते, नाहीतर त्याचा चावा घेतला जातो. शेवटी काहीच नाही जमले तर माय माऊलींना मध्ये घातले जाते. अरे तुमच्या दम असेल तर या ना मैदानात असे थेट आव्हान सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी नाव न घेता रामराजे नाईक निंबाळकर यांना दिले. आज सलग दुसऱ्या दिवशी माळशिरसच्या दौऱ्यावर असलेल्या जयकुमार गोरे यांच्या हस्ते फोंडशीरस येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी जयकुमार गोरे यांनी काल प्रमाणे आजही त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर थेट तोफ डागली.
जनता जनार्दन माझ्या पाठीशी असल्याने मला काही फरक पडत नाही
मी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातला आणि एका रेशन दुकानदाराचा मुलगा आहे. मला जनतेचे सुखदुःख कळते. कारण ते सर्व दुःख आम्हीही भोगले आहे, पाहिले आहे. वयाच्या 16 वर्षी मला पायात चप्पल घालायला मिळाली. मी कोणताही इतिहास अथवा भूगोल असणारा नेता नसून सोन्याचा चमचा कधीच पाहिला नाही. मात्र सोन्याचे चमचे तोंडात घेऊन जन्मलेल्यांनी कितीही मला अडवण्याचा प्रयत्न केला तरी या माय माऊली आणि जनता जनार्दन माझ्या पाठीशी असल्याने मला काही फरक पडत नाही असा टोला जयकुमार गोरे यांनी लगावला. मला तुम्ही कोणतीही कामे सांगा अगदी तुमचा फ्युज बसवायचा असेल तरीही तो मी बसवायला तयार आहे असे गोरे म्हणाले. विकासाच्या वाटेत आड येणाऱ्या एखाद्याचा फ्युज काढायचा असेल तर तोही मी काढायला आलो आहे असा सज्जड दम देखील जयकुमार गोरे यांनी विरोधकांना दिला.
महत्वाच्या बातम्या:
Jaykumar Gore: मंत्री जयकुमार गोरेंवर नग्न फोटो पाठवल्याचे आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक; 3 कोटींची मागणी अन्...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

