CSK vs MI IPL 2025 : पहिली मॅच देवाला! सलग 13 व्यांदा पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव, घरच्या मैदानावर चेन्नईनं फोडला विजयाचा 'नारळ'
एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध मुंबईचा 4 विकेट्सने पराभव झाला.

Chennai Super Kings vs Mumbai Indians IPL 2025 : मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. लीगमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे. चेन्नई सुपर किंग्जसह या संघाकडे सर्वाधिक 5 जेतेपदे आहेत. पण 2013 मध्ये सुरू झालेल्या हंगामातील पहिल्या सामन्यातील पराभवांचा सिलसिला संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. आयपीएल 2025 मध्येही मुंबई इंडियन्सने त्यांचा पहिला सामना गमावला आहे. एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध मुंबईचा 4 विकेट्सने पराभव झाला. मुंबईने सलग 13 व्या हंगामात पहिला सामना गमावला आहे.
The men in 💛 take home the honours! 💪
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2025
A classic clash in Chennai ends in the favour of #CSK ✨
Scorecard ▶ https://t.co/QlMj4G7kV0#TATAIPL | #CSKvMI | @ChennaiIPL pic.twitter.com/ZGPkkmsRHe
चेन्नईत नूर अहमद अन् खलीलचा कहर
आयपीएलच्या पहिल्या सामन्यात मुंबईची सुरुवात खुपच खराब झाली. खलील अहमदने रोहित शर्मा पहिल्याच षटकात आऊट केले, तो खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर खलीलने रायन रिकेलटनला (13) आऊट करून मुंबईला अजून एक धक्का दिला. सीएसकेमध्ये परतल्यानंतर पहिल्या सामन्यात खेळताना आर अश्विनने पण कामालाची कामगिरी केली. तो येताच त्याने विल जॅक्सला आऊट केले आणि त्याला पहिले यश मिळाले.
36 धावांत तीन विकेट गमावलेल्या मुंबईला चांगल्या भागीदारीची आवश्यकता होती. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा क्रीजवर होते. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये 40 पेक्षा जास्त धावांची भागीदारी झाली. पण, ही भागीदारी नूर अहमदने फोडली, ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनीचा वाटा मोठा होता. कारण त्याने चपळता दाखवली आणि सूर्याला यष्टीच्या मागून यष्टीचीत केले. 26 चेंडूत 29 धावा काढून स्टँड-इन कर्णधार आऊट झाला.
मुंबईकडून तिलक वर्माने सर्वाधिक 31 धावा केल्या. त्याच्याशिवाय रॉबिन मिंजने तीन, नमन धीरने 17, मिचेल सँटनरने 11 आणि ट्रेंट बोल्टने एक धाव केली. या सामन्यात दीपक चहर 28 धावांवर नाबाद राहिला आणि सत्यनारायण राजू 1 धावांवर नाबाद राहिला. सीएसकेकडून नूर अहमदने 4 आणि खलील अहमदने 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय, नाथन एलिस आणि रविचंद्रन अश्विन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
रचिन रवींद्र ठरला विजयाचा हिरो
156 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का धक्का बसला. राहुल त्रिपाठी फक्त दोन धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर, रचिन रवींद्र आणि ऋतुराज गायकवाड यांनी आघाडीची सूत्रे हाती घेतली. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 37 चेंडूत 67 धावांची भागीदारी झाली. 53 धावांची दमदार खेळी खेळून कर्णधार गायकवाड आऊट झाला. यानंतर चेन्नईचा डाव अडखळला पण सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रवींद्र जडेजाने रचिन रवींद्रसोबत 36 धावांची भागीदारी करून संघाला विजयापर्यंत नेले.
पण, रवींद्र जडेजा विजयापासून फक्त चार धावांनी दूर धावबाद झाला. या सामन्यात शिवम दुबेने नऊ धावा, दीपक हुड्डाने तीन आणि सॅम करनने चार धावा केल्या. दरम्यान, रचिन रवींद्र 65 धावांवर नाबाद राहिला आणि महेंद्रसिंग धोनी खाते न उघडता नाबाद राहिला. मुंबईकडून इम्पॅक्ट प्लेअर म्हणून पदार्पण करणाऱ्या विघ्नेश पुथूरने तीन विकेट्स घेतल्या तर दीपक चहर आणि विल जॅक्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.





















