एक्स्प्लोर

Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्गावरून दिशाभूल केली जात आहे का? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय काय म्हणाले?

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या शक्तीपीठ महामार्गासाठी 86 हजार 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे धार्मिक पर्यटन एकाच महामार्गावरून होणार आहे.

Shaktipeeth Expressway : कोल्हापूर जिल्ह्यातून दक्षिण बाजूने नागपूर-रत्नागिरी महामार्गाची (Nagpur Ratnagiri National Highway) काम प्रगतीपथावर असतानाच तसेच शेतकऱ्यांचा मोबदल्यासाठी आणि पाणंद रस्त्यांसाठी वाद सुरु आहे. हे सुरु असतानाच आता जिल्ह्याच्या उत्तर बाजूने सुद्धा नागपूरमधील पवनार ते गोव्यातील पत्रादेवी शक्तीपीठ महामार्ग (Shaktipeeth Expressway) जात असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे. या महामार्गामध्ये जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 59 गावांमध्ये शेकडो एकर जमिनी प्रभावित होणार असल्याने हा महामार्ग रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातून एकमुखाने होत आहे.

मात्र, शक्तीपीठवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावरुन तफावत असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी विरोधी शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात दिली. मात्र, एकनाथ शिंदे यांनी 21 जून रोजी केलेल्या ट्विटमध्ये महामार्ग रद्द करण्याचे कोणतेही संकेत दिले नव्हते. मात्र, फेरविचार करण्याचे सुतोवाच केले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मांडलेली भूमिका अधिकृत समजायची की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली ग्वाही अधिकृत समजायची असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर- गोवा जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गा विरोधात आंदोलन सुरु आहे. हे सरकार सर्वसामान्य जनतेचे आहे. त्यामुळे जनतेच्या भावनेचा विचार करुनच तसेच त्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे नेला जाईल. कुठलाही प्रकल्प जनतेवर थोपणार नाही अथवा रेटून नेणार नाही. समृध्दी महामार्ग हा गेमचेंजर प्रकल्प आम्ही जनतेला विश्वासात घेऊनच पूर्ण केला. त्यानुसार या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात ज्या ठिकाणी विरोध आहे त्याची फेरआखणी करता येईल का, याचाही विचार करीत आहोत. मात्र जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही प्रकल्प पुढे नेणार नाही.
 

दादा म्हणतात, शेतकरी विरोधी शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही

दरम्यान, शक्तीपीठ महामार्गावरून आक्रोश सुरु असतानाच शेतकरी विरोधी शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात दिली. अर्थखाते माझ्याकडे आहे, मी या महामार्गसाठी निधीच देणार नाही, असेही अजितदादा म्हणाले. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने तत्काळ हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी करण्यात आली. केवळ तोंडी स्थगिती असल्याचे सांगतात पण दुसरीकडे शेतकऱ्यांना नोटीस देत आहेत तसेच पर्यावरण विभागाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवत आहेत हे चुकीचे असल्याचे दाखवून दिले. समितीने प्रकल्प रेटत असल्याचे सांगितल्यानंतर अजित पवार म्हणाले की, प्रकल्पाचे काम सुरु असल्याचे शासनाने आपल्याला काय कळवले आहे का? तसे पत्र असल्यास दाखवा. पर्यावरण विभागाची मान्यता प्रस्तावासाठी दिलेल्याचा काही पुरावा कोणाकडे नाही, असे अजित पवार म्हणाले. 

महायुतीच्या नेत्यांकडून सुद्धा शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध

कोल्हापूर जिल्ह्यातील फक्त शेतकरी आणि शेतकरी संघटनांनीच शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला नसून कोल्हापूर जिल्ह्यातील सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून सुद्धा शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही महामार्ग रद्द करावा अशी मागणी केली आहे. दुसरीकडे, भाजप नेते समरसिंह घाटगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी सुद्धा शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला आहे. मात्र, हा सर्व विरोध डावलून महामार्ग निर्मितीसाठी भूसंपादन करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील 59 गावे बाधित

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 59 गावे शक्तीपीठ महामार्गाच्या कामामध्ये बाधित होणार आहेत. यामध्ये सर्वाधिक भूदरगड तालुक्यातील 21 गावांचा समावेश आहे. त्या खालोखाल कागल तालुक्यातील 13 गावांचा समावेश आहे. करवीर तालुक्यातील 10 गावांचा समावेश आहे. शिरोळ, आजरा, हातकणंगले तालुक्यामधील पाच गावांचा समावेश आहे. त्यामुळे या शक्तिपीठ महामार्गाविरोधात आता पुन्हा एकदा रणकंदन होण्याची चिन्हे आहेत. 

या महामार्गात होणारी बाधित होणारी गावे कोणती आहेत?

शिरोळ तालुका - कोथळी, दानोळी, निमशिरगाव, तारदाळ
हातकणंगले तालुका - तिळवणी, साजणी, माणगाव, पट्टणकोडोली, 
करवीर तालुका - सांगवडे, सांगवडेवाडी, हलसवडे, नेर्ली, विकासवाडी, कणेरीवाडी, कणेरी, कोगील बुद्रुक, वडगाव खेबवडे 
कागल तालुका - कागल, व्हनूर, सिद्धनेर्ली, एकोंडी, बामणी, व्हनाळी, कोनवडे, सावर्डे बुद्रुक, सावर्डे खुर्द, सोनाळी कुरणी, निढोरी, व्हनगुत्ती
भुदरगड तालुका - आदमापूर, वाघापूर, मडिलगे बुद्रुक, कूर, मडिलगे खूर्द निळपण, धारवाड, म्हसवे, गारगोटी, आकुर्डी, पुष्पनगर, सोनारवाडी, मडूर, करडवाडी, शेळोली, वेंगरूळ, सोनुर्ली, मेघोली, नवले, देवर्डे, कारिवडे
आजरा तालुका - दाभिल, शेळप, पारपोली, आंबाडे, सुळेरान

सांगली जिल्ह्यात किती तालुक्यातील जमीन जाणार?

कवठेमहांकाळ तालुका - घाटनांद्रे, तिसंगी
तासगाव तालुका - डोंगरसोनी, सिद्धेवाडी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, गव्हाण, मणेराजुरी, मतकुणकी, नागाव, कवठे
मिरज तालुका - कवलापूर, बुधगाव, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी 

किती हजार कोटींची तरतूद?

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या शक्तीपीठ महामार्गासाठी 86 हजार 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे धार्मिक पर्यटन एकाच महामार्गावरून होणार आहे. दुसरीकडे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार सिंदखेडराजा नोड ते शेगावपर्यंत चौपदरी रस्ता करून वाढवण्यात येणार आहे. पवनार (वर्धा) ते पत्रादेवी (सिंधुदुर्ग) महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गासाठी 86 हजार 300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

शक्तीपीठ महामार्गातून माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, आंबेजोगाई ही शक्तीपीठे तसेच औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही दोन ज्योतिर्लिंग, नांदेड गुरुद्वारा, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी औदुंबर जोडले जाणार आहे. या महामार्गाचा विस्तार हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, सांगली, कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधून होणार आहे. 

कसा आहे शक्तीपीठ महामार्ग?

शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य सरकारकडून 86 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. पुढील वर्षी या महामार्गाच्या कामाचा शुभारंभ प्रस्तावित असून पाच वर्षात काम पूर्ण करण्याचे टार्गेट आहे. नागपूरहून गोव्याला प्रवास करण्यासाठी सध्या बाय रोड 18 तासांचा कालावधी लागतो. मात्र, शक्तीपीठ महामार्ग निर्मितीनंतर हे अंतर आठ तासांचे होणार आहे. राज्यातील सर्वात लांब हा सुपर एक्स्प्रेसवे असेल आठ हजार हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. हा महामार्ग राज्यातील तीन शक्तीपीठांना जोडणार असल्याने या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग असे देण्यात आलं आहे. राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. हा महामार्ग सहा पदरी असेल. महामार्गावर 26 ठिकाणांवर इंटरचेंज असेल. 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग असतील. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Gavaskar Dance Video : असा 'लिटील मास्टर' डान्स होणे नाही! टीम इंडिया जिंकताच सुनील गावसकरांचं थेट मैदानात भन्नाट सेलिब्रेशन, राॅबिन उथप्पा पाहतच राहिला!
असा 'लिटील मास्टर' डान्स होणे नाही! टीम इंडिया जिंकताच सुनील गावसकरांचं थेट मैदानात भन्नाट सेलिब्रेशन, राॅबिन उथप्पा पाहतच राहिला!
Ind vs NZ Champions trophy 2025: न्यूझीलंडने सगळी अस्त्रं वापरली, हवेत उडून फिल्डिंग, टिच्चून बॉलिंग, क्षेत्ररक्षणाची अभेद्य तटबंदी; पण टीम इंडियाच्या वाघांनी चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल जिंकलीच
एक मावळा पडताच दुसरा खंबीरपणे उभा राहिला, इंच इंच लढून टीम इंडियाच्या वाघांनी गड फत्ते केला
लाडक्या बहिणींना 2100 रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, नमो शेतकरी महासन्मानच्या रकमेत वाढ, महायुती सरकार आश्वासन पूर्ण करणार? अर्थसंकल्पाकडे राज्याचं लक्ष
लाडक्या बहिणींना 2100 रुपये ते शेतकऱ्यांची कर्जमाफी, महायुती सरकार निवडणुकीतील आश्वासनं अर्थसंकल्पात पूर्ण करणार का?
Weekly Horoscope 10 To 16 March 2025: मार्चचा दुसरा आठवडा 'या' राशींसाठी राहील खास! कोणाला घ्यावी लागेल विशेष काळजी? वाचा 12 राशींच साप्ताहिक राशीभविष्य
मार्चचा दुसरा आठवडा 'या' राशींसाठी राहील खास! नोकरी, प्रेम आरोग्य, कोणाला घ्यावी लागेल विशेष काळजी? वाचा 12 राशींच साप्ताहिक राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08.00 AM TOP Headlines 08.00 AM 10 March 2025ABP Majha Marathi News Headlines 07.00 AM TOP Headlines 07.00 AM 10 March 2025Majha Gaon Majha Jilha | माझा गाव माझा जिल्हा, बातम्यांचा सुपरफास्ट आढावा ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 6: 30 AM TOP Headlines 630 AM 10 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Gavaskar Dance Video : असा 'लिटील मास्टर' डान्स होणे नाही! टीम इंडिया जिंकताच सुनील गावसकरांचं थेट मैदानात भन्नाट सेलिब्रेशन, राॅबिन उथप्पा पाहतच राहिला!
असा 'लिटील मास्टर' डान्स होणे नाही! टीम इंडिया जिंकताच सुनील गावसकरांचं थेट मैदानात भन्नाट सेलिब्रेशन, राॅबिन उथप्पा पाहतच राहिला!
Ind vs NZ Champions trophy 2025: न्यूझीलंडने सगळी अस्त्रं वापरली, हवेत उडून फिल्डिंग, टिच्चून बॉलिंग, क्षेत्ररक्षणाची अभेद्य तटबंदी; पण टीम इंडियाच्या वाघांनी चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल जिंकलीच
एक मावळा पडताच दुसरा खंबीरपणे उभा राहिला, इंच इंच लढून टीम इंडियाच्या वाघांनी गड फत्ते केला
लाडक्या बहिणींना 2100 रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, नमो शेतकरी महासन्मानच्या रकमेत वाढ, महायुती सरकार आश्वासन पूर्ण करणार? अर्थसंकल्पाकडे राज्याचं लक्ष
लाडक्या बहिणींना 2100 रुपये ते शेतकऱ्यांची कर्जमाफी, महायुती सरकार निवडणुकीतील आश्वासनं अर्थसंकल्पात पूर्ण करणार का?
Weekly Horoscope 10 To 16 March 2025: मार्चचा दुसरा आठवडा 'या' राशींसाठी राहील खास! कोणाला घ्यावी लागेल विशेष काळजी? वाचा 12 राशींच साप्ताहिक राशीभविष्य
मार्चचा दुसरा आठवडा 'या' राशींसाठी राहील खास! नोकरी, प्रेम आरोग्य, कोणाला घ्यावी लागेल विशेष काळजी? वाचा 12 राशींच साप्ताहिक राशीभविष्य
Uddhav Thackeray : मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
Embed widget