Ajit Pawar in Kolhapur : शरद पवारांना अजित पवारांनी खासदार केलं आणि मग दिल्लीची स्वप्न पडली; राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षांची टीका
स्वतःला संसदरत्न खासदार म्हणवणाऱ्या ताई लाडकी बहीण योजनेवर टीका करत आहेत, असं म्हणत शीतल फारकटे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर देखील टीका केली.
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी शरद पवार साहेबांना खासदार केलं. त्यानंतर मोठ्या पवार साहेबांना दिल्लीची स्वप्न पडू लागली, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा शीतल फारकटे यांनी केलं. आज (11 ऑगस्ट) कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना शीतल फारकटे यांनी शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे यांच्यावर देखील टीका केली. मात्र, यानंतर बोलणाऱ्या अजितदादा पवार यांनी शीतल फारकटे यांना चांगलेच खडसावले.
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, इचलकरंजी शहर (जिल्हा) या नवीन जनसंपर्क कार्यालयाच्या उद्धाटनाचा कार्यक्रम अतिशय थाटात पार पडला. यावेळी आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 11, 2024
इचलकरंजीत नव्यानं उभारण्यात… pic.twitter.com/LgpYVcNG7h
काँग्रेसच्या पाठीत एकदा नाही तर अनेक वेळा खंजीर खुपसला
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात बोलताना पदाधिकारी शीतल फराकटे यांनी शरद पवार गटावर जोरदार टीका केली. अजितदादा पवार यांनी पक्ष वाढवला आहे. काही दिवसांपूर्वी अजितदादा यांनी भूमिका घेतल्यानंतर जोरदार टीका झाली. आम्हाला निष्ठा शिकवली गेली, पण ज्या काँग्रेसने तुम्हाला ओळख दिली त्या काँग्रेसच्या पाठीत एकदा नाही तर अनेक वेळा खंजीर खुपसून वेगळी भूमिका घेणाऱ्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये अशी टीका शीतल फारकटे यांनी केली. स्वतःला संसदरत्न खासदार म्हणवणाऱ्या ताई लाडकी बहीण योजनेवर टीका करत आहेत, असं म्हणत शीतल फारकटे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर देखील टीका केली.
आपली जनता ज्या विश्वासाने आपल्याकडे धाव घेते, त्याच क्षमतेने त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण बांधील असतो..
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 11, 2024
आज महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहराकडे प्रस्थानादरम्यान, तिळवणी या ठिकाणी काही स्थानिकांना भेटलो, माय-बहिणींच्या व्यथा ऐकल्या. pic.twitter.com/ZMeGR7L983
अजितदादा पवार यांनी शीतल फारकटे यांना खडसावले
मात्र, यानंतर बोलणाऱ्या अजितदादा पवार यांनी शीतल फारकटे यांना खडसावले. आपण केलेलं काम जनतेसमोर घेऊन जावा. दुसऱ्यांवर टीका करण्याची गरज नाही. बूथ पातळीपर्यंत लक्ष घालून पक्षाची बांधणी चांगली करा, असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधकांवर टीका करणाऱ्याना सुनावलं.
इतर महत्वाच्या बातम्या