एक्स्प्लोर

Ratnagiri-Nagpur National Highway : रत्नागिरी-नागपूर महामार्गातील जमिनीसाठी चौपट दराने मोबदला द्या, जबरदस्तीने मोजणी केल्यास जशास तसे उत्तर; राजू शेट्टींचा इशारा

महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीस चौपटीप्रमाणे मोबदला न देता पोलिसबळाचा वापर करून जबरदस्तीने मोजणी केल्यास जशास तसे उत्तर देवू, असा इशारा 'स्वाभिमानी'चे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला. 

कोल्हापूर : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक ते अंकली या महामार्गाच्या मोजणीबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून काम सुरु आहे. महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीस चौपटीप्रमाणे मोबदला न देता पोलिसबळाचा वापर करून जबरदस्तीने मोजणी केल्यास जशास तसे उत्तर देवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला. 

चौपट मोबदला देवूनच जमीन संपादित करावी

भूमि अभिलेख विभागाकडून कोणतीही अद्यावत कागदपत्रे न तपासता तसेच संबधित शेतकऱ्यांना नोटीसही लागू न करता  जुन्या कागदपत्राच्या माध्यमातून मोजणी करण्याचे काम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हद्दी निश्चीती नसून वाटणीपत्र न झाल्याने मोजणी पूर्ण होण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. सदरच्या भुसंपादनामध्ये संपादित केल्या जाणाऱ्या जमीनींना राज्य शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे दुप्पट मोबदला दिला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून रत्नागिरी ते नागपूर या 945 किलोमीटरच्या महामार्गातील जवळपास 907 किलोमीटरचे संपूर्ण भुसंपादन हे चौपटीने झालेले आहे. यामुळे याच मार्गावरील चोकाक ते अंकली हा 38 किलोमीटरच्या रस्त्यासाठी चौपट मोबदला देवूनच जमीन संपादित करावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. 

सध्या चोकाक फाटा ते अंकली येथील नवीन रस्त्याच्या चोकाक, अतिग्रे ,उदगांव या गावातील मोजणीची कार्यवाही युध्दपातळीवर सुरू आहे. यापुर्वीही शिरोली ते अंकली रस्त्याचे 2008 साली भुसंपादन होत असताना अत्यल्प दराने मोबदला दिला गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. या मार्गावरील अनेक शेतक-यांची संपूर्ण जमीन संपादित होणार असून त्यामुळे ते भुमिहीन होणार आहेत. 

राज्य सरकारने रत्नागिरी ते नागपूरपर्यंत जो मोबदल्याचा दर रेडीरेकनरच्या अथवा बाजारभावाच्या चौपटीने शेतकऱ्यांना दिला आहे. तोच दर या शेतकऱ्यांना दिल्यास शेतकरी भुसंपादनास कोणताही विरोध करणार नाहीत. एकाच जिल्ह्यातील  एका शेतकऱ्यास दुप्पट व एका शेतकऱ्यास चौपटीने दर देवून प्रशासनाच्या चुकीचे खापर शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे. उमळवाड येथून अंकली रस्त्यापर्यंत जाणारा महामार्ग हा भरावाचा न करता पिलरचा करावा लागणार असून अन्यथा सांगली शहरासह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 35 हून अधिक गावांना पुराचा फटका बसणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये. गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.    
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Rishabh Pant : रिषभ पंतचा निर्णय चुकला, सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव असूनही भारताचा पराभव, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
रिषभ पंतच्या एका निर्णयाचा फटका, सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा अपयशी, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
Mumbai : मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahayuti Election : 'आगामी निवडणुका स्वबळावर लढू', Ajit Pawar यांचे संकेत; महायुतीत मतभेद?
Matoshree Drone Row: 'कोणत्या सर्वेक्षणामुळे घरांमध्ये डोकावण्याची परवानगी मिळते?', Aaditya Thackeray यांचा सवाल
Adventure Tourism: 'भूदरगड आता देशाच्या पर्यटन नकाशावर येईल', पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा विश्वास
Pune Crime: 'दृश्यम' पाहून पत्नीची हत्या, आरोपीने रचला हत्येचा कट, पण CCTV मुळे फुटलं बिंग
Bailgada Sharyat: 'बैलगाडा शर्यतीची प्रो-लीग भरवली जाईल', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Rishabh Pant : रिषभ पंतचा निर्णय चुकला, सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव असूनही भारताचा पराभव, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
रिषभ पंतच्या एका निर्णयाचा फटका, सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा अपयशी, दक्षिण आफ्रिका अ संघाचा दणदणीत विजय
Mumbai : मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
मुंबईत नवा ‘भुयारी रस्ता रोड नेटवर्क’ प्रकल्प सुरू; वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी MMRDA ची घोषणा
Akash Kumar Choudhary :6,6,6,6,6,6,6,6..सलग 8 षटकार ठोकले, रणजी स्पर्धेत मेघालयच्या युवा खेळाडूची वादळी फलंदाजी, BCCI कडून व्हिडिओ शेअर  
एक दोन नव्हे सलग आठ षटकार ठोकले, प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक, रणजीमध्ये आकाश चौधरीचं वादळ 
Rahul Gandhi: 'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
Share Market : शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात 'या' गुंतवणूकदारांनी 36 हजार कोटी कमावले, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
शेअर बाजारात तेजी-घसरणीचा खेळ, चार दिवसात गुंतवणूकदारांची 36 हजार कोटींची कमाई, LIC चे गुंतवणूकदार मालमाल
Nandurbar School Bus Accident : नंदुरबारमध्ये 30 ते 35 विद्यार्थी असलेल्या स्कूल बसचा अपघात, बस 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली, एका विद्यार्थ्याचा मृत्यू
नंदुरबारमध्ये स्कूल बसचा अपघात, बस 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली, एका विद्यार्थ्याचा मृत्यू
Embed widget