एक्स्प्लोर

अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, सचिन वाझेंचे गंभीर आरोप;फडणवीसांना पत्र लिहून माहिती दिल्याचा दावा

Sachin Vaze : माझ्याकडे सगळे पुरावे आहे. सीबीआयकडे देखील त्याचे पुरावे आहेत. पीएच्या माध्यमातून ते पैसे घ्यायचे, असे सचिन वाझे म्हणाले.

मुंबईअनिल देशमुख (Anil Deshmukh)  खंडणी वसुली प्रकरणात नवा ट्विस्ट  आला आहे. निलंबीत पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze)  यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. अनिल देशमुख हे  पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप  सचिन वाझेंनी केला होता. एवढच नाही तर  वाझेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिल्याचे वक्तव्य वाझेंनी दिली आहे. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते.  देवेंद्र फडवणवीसांवर अनिल देशमुखांनी काही दिवसांपूर्वी अतिशय गंभीर आरोप केले होते. 

सचिन वाझे म्हणाले, सगळे पुरावे आहे. सीबीआयकडे देखील त्याचे पुरावे आहेत. पीएच्या माध्यमातून ते पैसे घ्यायचे. सुनावणी त्यांच्या विरोधात गेली आहे. मी सगळे पुरावे दिले आहेत. देवेंद्र फडणवीसांना देखील या संदर्भात मी पत्र लिहिले आहे. मी नार्को टेस्टसाठी कधीही तयार आहे. मी एक पत्र लिहले आहे. त्यामध्ये जयंत  पाटील यांचे नाव लिहले आहे.

सचिन वाझे हे सध्या तुरुंगात आहे. त्यांच्यावर सध्या  मनसूख हिरेन हत्याकांड आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र  ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सध्या ते तुरुंगात आहे. सत्तांतर झाले त्यानंतर अनिल देशमुखांवर वसुलीचे आरोप करण्यात आले. परमबीर सिंग यांनी देखील गंभीर आरोप केले होते.  आता त्याची पुष्टी सचिन वाझेंनी केली आहे. सचिन वाझे हे त्यावेळी वारंवार बंगल्यावर जात होते.  त्यावेळी ते पीएच्या संपर्कात होते. आता सचिन वाझेंनी समोर येऊन देशमुख पीएच्या माध्यामातून पैसे घ्यायचे हे स्पष्ट केले आहे. आरोपच नाही केले तर देवेंद्र फडणवीसांना देखील त्यांनी या संदर्भातील पत्र लिहित पुरावे दिले आहे.  त्यामुळे आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. 

काय आहे प्रकरण?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अचानक मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील मानेंला एनआयएकडून प्रथम अटक करण्यात आली होती. तर दुसरीकडे ईडीने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने भ्रष्टाचार प्रकरणात मागील वर्षी एप्रिल महिन्यात सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतर दोघांना अटक केली होती. आपण अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे गोळा केल्याचं सचिन वाझेने तपासादरम्यान सांगितलं होतं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
पेपरफुटीवर बसणार चाप! MBBS पेपर फुटीप्रकरणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय; आता...
पेपरफुटीवर बसणार चाप! MBBS पेपर फुटीप्रकरणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय; आता...
Beed Crime : धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nana Patole Markadwadi  : नाना पटोले मारकडवाडीत दाखल; पडळकर, खोत यांच्याबाबत काय म्हणाले?Onion Insurance Fraud : महाराष्ट्राच्या आठ जिल्ह्यात कांद्याच्या पिकात विमा उतरवण्यात मोठा घोटाळाABP Majha Headlines : 04 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सKurla Bus Accident: चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; बसची फॉरेंसिक टीम तपासणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
पेपरफुटीवर बसणार चाप! MBBS पेपर फुटीप्रकरणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय; आता...
पेपरफुटीवर बसणार चाप! MBBS पेपर फुटीप्रकरणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय; आता...
Beed Crime : धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
Gopichand Padalkar : ... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
Kurla Bus Accident: बेस्टमध्ये हैदराबादच्या कंपनीची मोनोपॉली, कोणाचा राजकीय वरदहस्त? कुर्ला बस अपघातानंतर ठाकरे गटाचा गंभीर आरोप
बेस्टमध्ये हैदराबादच्या कंपनीची मोनोपॉली, कोणाचा राजकीय वरदहस्त? ठाकरे गटाचा गंभीर आरोप
Embed widget