एक्स्प्लोर

Beed Crime : धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?

Beed Crime News : बीड जिल्ह्यात गेल्या 24 तासात दोन अपहरणाच्या घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

बीड : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे.  केज (Kej) तालुक्यातील मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून केल्याच्या घटनेला 24 तास उलटत नाही तोच एका व्यापाराचं अपहरण करून खंडणी मागण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. व्यापाऱ्याने खंडणीखोरांना पैसे देऊन आपली सुटका करून घेतली आहे. याप्रकरणी परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, व्यापारी अमोल दुबे यांची परळीत एक एजन्सी आहे. आपले काम आटपून दुबे घरी जात असताना त्यांना पाच अनोळखी इसमांनी अडवले. यानंतर दुबे यांना मारहाण करून त्यांचे अपहरण करण्यात आले. या दरम्यान त्यांना दोन कोटींची मागणी खंडणीखोरांनी केली. यावेळी त्यांनी विनंती करून तीन लाख 87 हजार रुपये रोख आणि दहा तोळे सोनू देऊन आपली सुटका करून घेतली आहे. काल मध्यरात्री ही घटना घडली आहे. आज अमोल दुबे यांनी परळी शहर पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून दोन पथकाच्या माध्यमातून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. ही अपहरणाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाली आहे. बीड जिल्ह्यात 24 तासात अपहरणाच्या दोन घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आता दुबे यांच्या  अपहरणातील आरोपींना पकडण्याचे आव्हान परळी पोलिसांसमोर आहे. 

संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात दोघांना अटक

दरम्यान, केज तालुक्यातील  मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे सोमवारी चारचाकी गाडीतून मस्साजोगकडे जात असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवून त्यांचे अपहरण केले होते. तसेच त्यांना बेदम मारहाण करत अपहरणकर्त्यांनी त्यांना बळजबरीने आलेल्या गाडीत बसवून केजच्या दिशेने नेले होते. काही तासानंतर बोरगाव-दहीटना रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला होता. यामुळे बीडमध्ये मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Kurla Bus Accident: ज्या रुग्णालयात नोकरीला, त्याच्यासमोरच अपघात; मुलाचं लग्न बघण्यापूर्वीच आईने डोळे मिटले, सर्व गहिवरले!

Beed News : सरपंचाचं अपहरण अन् हत्या, नातेवाईक आक्रमक, 24 तास उलटूनही आरोपी मोकाट, कुटूंब उतरलं रस्त्यावर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा

व्हिडीओ

Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report
Rohit Pawar on Ajit Pawar : रोहित पवारांच्या आरोपांतील 'तो' नेता कोण? Special Report
Chandrapur Shivsena- BJP : चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला डच्चू Special Report
Solapur Ram Satpute : राम सातपुतेंच्या जीवाला धोका? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
Mutual Fund : सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, आकडेवारी समोर, जाणून घ्या कारणं
सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, जाणून घ्या कारणं  
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
Embed widget