एक्स्प्लोर

आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल

बीड जिल्हा सरपंचाच्या हत्येने हादरला असून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

बीड : पुण्यातील हडपसर येथे चक्क आमदाराच्या मामाची अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर, बीड जिल्ह्याच्या केज (Kej) तालुक्यातील मस्साजोग येथेही सरपंचाचे अपहरण करून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. संतोष देशमुख असे सरपंचाचे नाव असून त्यांचा मृतदेह केज परिसरात आढळून आल्याने गावातील नागरिक संतप्त झाले आहेत. मृताच्या नातेवाईकांनी अहमदनगर -अहमदपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत आरोपीला अटक करण्याची मागणी केली होती. दरम्यान, या घटनेनं बीड जिल्हा हादरला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही या घटनेची दखल घेत मस्साजोग गाव गाठलं आहे. तर, दुसरीकडे बीडचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang sonavane) यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया देताना थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला. 

बीड जिल्हा सरपंचाच्या हत्येने हादरला असून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावरून बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया देताना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य केलंय. जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर आहे, अतिशय टॉर्चर करून सरपंच यांची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी पकडले आणि त्यांना लगेच जामीन देखील मिळाला. असा कसा जामीन झाला, असा सवाल बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला आहे. आरोपीसोबत चार तास पोलिस निरीक्षक होते. पोलीस अधिकारी आरोपींना पाठीशी घालत आहेत, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हता, असे म्हणत सोनवणे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच टोला लगावला आहे.

आंदोलकांनी बस पेटवली

केज शहरातील शिवाजी चौकात संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपीला अटक करा, अशी मागणी करत आंदोलन करण्यात आले. या मागणीसाठी आंदोल संतप्त झाले आणि त्या संतप्त आंदोलकांनी केज-कळंब रोडवर बस पेटवल्याची घटना घडली. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हस्ते प्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करावी या मागण्यासाठी केज शहरातील शिवाजी महाराज चौकातही रास्ता रोको सुरू आहे. 

मनोज जरांगे सांत्वन करण्यास पोहोचले

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मनोज जरांगे पाटील हे मस्साजोगमध्ये पोहोचले आहेत. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी पोहोचले. 

हेही वाचा

विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तामिळनाडूचे राज्यपाल भाजपचे एजंट; विजयचा मुख्यमंत्री शपथविधी लांबणीवर, ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांचा संताप
तामिळनाडूचे राज्यपाल भाजपचे एजंट; विजयचा मुख्यमंत्री शपथविधी लांबणीवर, ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांचा संताप
Thalapathy Vijay : विजय यांच्या मुख्यमंत्रिपदामध्ये अडथळे, राज्यपाल मॅजिक फिगरवर अडून, सरकार स्थापनेचं निमंत्रण नाहीच
विजय यांच्या मुख्यमंत्रिपदामध्ये अडथळे, राज्यपाल मॅजिक फिगरवर अडून, सरकार स्थापनेचं निमंत्रण नाहीच
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात फसलं; सुदैवाने सुखरुप लँडिंग, जुहूत उतरवलं
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात फसलं; सुदैवाने सुखरुप लँडिंग, जुहूत उतरवलं
Suvendu Adhikari on Mamata Banerjee: 'त्यामुळेच माझ्या पीएला गोळ्या घालून संपवण्यात आलं...' शुभेंदू अधिकारी यांचे ममतांवर गंभीर आरोप, लेकाला गमावल्यानंतर आईच्या सुद्धा आरोपांच्या फैरी
'त्यामुळेच माझ्या पीएला गोळ्या घालून संपवण्यात आलं...' शुभेंदू अधिकारी यांचे ममतांवर गंभीर आरोप, लेकाला गमावल्यानंतर आईच्या सुद्धा आरोपांच्या फैरी

व्हिडीओ

Sushma Andhare Pune : अदिती तटकरेंनी महिला बालकल्याण मंत्री म्हणून काय केलं? म्हणाल्या, झेपत नसेल तर राजीनामा द्या; सुषमा अंधारेंनी सुनावलं
Ambadas Danve PC : तोडफोड, मारहाण, मुडदे पडत असतील तर तृणमूलने एखाद्याचा मुडदा पाडला ते नैसर्गिक आहे
Jay Pawar on Sunetra Pawar : सुनेत्रा पवार केवळ बारामतीच्याच नव्हे, तर मुख्यमंत्रि‍पदाच्या उमेदवार
Punjab Blast : पंजाबमध्ये खलिस्तानी अतिरेकी पुन्हा सक्रीय? Special Report
Bengal Violance : बंगाल, बदला आणि बुलडोझर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात फसलं; सुदैवाने सुखरुप लँडिंग, जुहूत उतरवलं
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात फसलं; सुदैवाने सुखरुप लँडिंग, जुहूत उतरवलं
तामिळनाडूचे राज्यपाल भाजपचे एजंट; विजयचा मुख्यमंत्री शपथविधी लांबणीवर, ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांचा संताप
तामिळनाडूचे राज्यपाल भाजपचे एजंट; विजयचा मुख्यमंत्री शपथविधी लांबणीवर, ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांचा संताप
जलजीवनला 27 महिन्यांची मुदत, पण 4 वर्षांपासून काम पूर्ण नाही; ऋतुराज पाटलांच्या नेतृत्वात संतप्त 13 गावच्या ग्रामस्थांचा प्राधिकरणावर घागर मोर्चा
जलजीवनला 27 महिन्यांची मुदत, पण 4 वर्षांपासून काम पूर्ण नाही; ऋतुराज पाटलांच्या नेतृत्वात संतप्त 13 गावच्या ग्रामस्थांचा प्राधिकरणावर घागर मोर्चा
Suvendu Adhikari on Mamata Banerjee: 'त्यामुळेच माझ्या पीएला गोळ्या घालून संपवण्यात आलं...' शुभेंदू अधिकारी यांचे ममतांवर गंभीर आरोप, लेकाला गमावल्यानंतर आईच्या सुद्धा आरोपांच्या फैरी
'त्यामुळेच माझ्या पीएला गोळ्या घालून संपवण्यात आलं...' शुभेंदू अधिकारी यांचे ममतांवर गंभीर आरोप, लेकाला गमावल्यानंतर आईच्या सुद्धा आरोपांच्या फैरी
इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग; पोलिसांनी दोन भामट्यांना ठोकल्या बेड्या, मुद्देमाल हस्तगत
इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग; पोलिसांनी दोन भामट्यांना ठोकल्या बेड्या, मुद्देमाल हस्तगत
IPL : लखनौसाठी आज करो वा मरो स्थिती, रिषभ पंत कोहलीच्या बंगळुरुला धक्का देणार का? RCB कडे गुणतालिकेत टॉपवर पोहोचण्याची संधी
लखनौला पराभवाचा वचपा काढण्याची संधी, बंगळुरुकडे गुणतालिकेत टॉपवर पोहोचण्याची संधी, रिषभ पंत - विराट कोहली आमने सामे   
Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापुरात शिंदे गटाचे दोन्ही आमदार एकमेकांसमोर उभे ठाकले! राजेश क्षीरसागरांनी चंद्रदीप नरकेंना सुनावलं
शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापुरात शिंदे गटाचे दोन्ही आमदार एकमेकांसमोर उभे ठाकले! राजेश क्षीरसागरांनी चंद्रदीप नरकेंना सुनावलं
Thalapathy Vijay : बहुमत नसतानाही, केवळ 108 आमदारांच्या जीवावर थलापती विजय मुख्यमंत्री होऊ शकतो... कसं? जाणून घ्या समीकरण
बहुमत नसतानाही, केवळ 108 आमदारांच्या जीवावर थलापती विजय मुख्यमंत्री होऊ शकतो... कसं? जाणून घ्या समीकरण
Embed widget