Gopichand Padalkar : ... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
Gopichand Padalkar : मारकडवाडीतील ईव्हीएमच्या (EVM) मुद्द्यावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शरद पवार, सुप्रिया सुळेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Gopichand Padalkar Markadwadi : राज्यात विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यापासून माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी हे गाव राज्यात नाही तर देशभरात चर्चेत आलं आहे. ईव्हीएम (EVM) मशीनच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केलेल्या मारकडवाडी गावाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. दरम्यान, याच मुद्यावरून आता महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी थेट मारकडवाडी गाठत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे.
दरम्यान ईव्हीएम समर्थनार्थ मारकडवाडीत (Markadwadi) आज जाहीर सभा घेण्यात आली. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ईव्हीएमविरोधी सभेला प्रत्युत्तर देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. याच पार्श्वभूमीवर आज सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी मारकडवाडीत जाहीर सभा घेत तुफान फटकेबाजी केली. यावेळी बोलताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर घणाघाती टीका केली आहे. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, आमदार रोहित पवारांसह सुप्रिया सुळेंवरही हल्लाबोल केला आहे.
... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही- गोपीचंद पडळकर
ईव्हीएमला विरोधी करून बॅलेट पेपेरवर मतदान घेण्याची मागणी करणाऱ्या आणि त्यासाठी आंदोलन करणाऱ्या शरद पवारांना आमचे आवाहन आहे की. शरद पवारांनी सर्वप्रथम आपल्या लेकीचा, आपल्या नातवाचा तसेच जयंत पाटील यांचा राजीनामा घेतला पाहिजे. या तिघांचा पहिल्यांदा राजीनामा घेऊन त्यानंतर हे आंदोलन पुढे नेले पाहिजे. तसेच काँग्रेसच्या राहुल गांधी आणि त्यांच्या बहीण प्रियंका गांधी यांनीही राजीनामा देऊन या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे. अन्यथा EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, असे म्हणत पडळकरांनी शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला आहे. तुम्ही केवळ बळीचे बकरे आम्हालाच करत आहात. म्हणून राज्यातील प्रस्थापितांना आपल्याला उधळून लावावे लागेल असेही ते म्हणले.
हवं तर राहुल गांधी यांनी मामाच्या इटलीत जावून चौकशी करावी
बारामतीत माझे डिपॉझिट जप्त झाले होते, त्याच ईव्हीएममध्ये हे झाले होते. अमेरिकेतील अनेक राज्यात आणि अनेक देशात देखील ईव्हीएमवर मतदान होते. हवं तर राहुल गांधी यांनी मामाच्या इटलीत जावून चौकशी करावी, असा टोलाही गोपीचंद पडळकरांनी लागवला.
...तर जयंत पाटलांना लायकी नुसार 101 रुपयाचे बक्षीस
शरद पवार यांचे सर्व राजकारण विश्वासघातावर अवलंबून होते. त्यांची अक्कल देखील या आंदोलनात संपल्याचे दिसते. 2017 ते 2024 पर्यंत एकानेही मशीनमध्ये कसा घोटाळा होतो ते दाखवू शकले नाहीत. जयंत पाटील यांनी हे सिद्ध केले तर लायकी नुसार 101 रुपयाचे बक्षीस आणि दुसऱ्या कोणीही हॅक करून दाखवल्यास 11 लाखाचे बक्षीस देऊ असेही गोपीचंद पडळकर म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या