एक्स्प्लोर

Kurla Bus Accident: बेस्टमध्ये हैदराबादच्या कंपनीची मोनोपॉली, कोणाचा राजकीय वरदहस्त? कुर्ला बस अपघातानंतर ठाकरे गटाचा गंभीर आरोप

Kurla BEST Bus Accident: मुंबईतील कुर्ला परिसरात सोमवारी रात्री 8.30 वाजता एक भीषण अपघात झाला. बेस्टच्या बसने रस्त्यावरील अनेक लोकांना चिरडले. 7 जणांचा मृत्यू.

मुंबई: कुर्ला परिसरातील लालबहादूर शास्त्री रोडवर (एलबीएस रोड) झालेल्या अपघाताच्या मुद्द्यावरुन आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. या अपघातासाठी कारणीभूत असलेला बसचालक संजय मोरे हा कंत्राटी तत्त्वावर काम करत होता. बेस्टमधील या कंत्राटी कंपनीवर राजकीय वरदहस्त असल्यामुळे बेस्टच्या अधिकाऱ्यांनाही काहीही करणे शक्य नसल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी केला. बेस्ट प्रशासन सामान्य लोकांच्या जीवाशी खेळत आहे. ज्या कंपनीला बेस्टकडून (BEST Bus) कंत्राट देण्यात आले आहे, त्यांचे स्वत:चे ऑफिसही मुंबईत नाही. ते एका कंटेनरमध्ये बसतात. कालच्या अपघातामधील जो चालक नियुक्त करण्यात आला होता, त्याच्यावर बेस्ट प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. बेस्टच्या अधिकाऱ्यांना या कंपनीला जाब विचारायचा असेल तर हैदराबादला फोन करावा लागतो. तिकडेही कोणीही उत्तर द्यायला तयार नाही. मग बेस्टमध्ये या कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना का घेतले जाते? हैदराबादच्या या कंपनीवर कोणाचा राजकीय वरदहस्त आहे, ज्याच्यामुळे बेस्टमध्ये ही कंपनी चालते, असा सवाल सुनील प्रभू यांनी उपस्थित केला.

ज्या कंत्राटी कंपनीचे कर्मचारी बेस्टसाठी पुरवले जातात, त्यांच्या बसेस बेस्टपेक्षा जास्त आहेत. त्यांची जबाबदारी अधिक आहे. ड्रायव्हिंगसाठी बेस्टमध्ये लागणारा सर्व गोष्टीचा पालन होत आहे का? बस चालवण्यासाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या ड्रायव्हर्सवर बेस्टचा कंट्रोल का नाही? तो माणूस दारू पितो का त्याची चेकिंग होते का? त्याची मेडिकल चेकअप होते का, असा सवाल सुनील प्रभू यांनी उपस्थित केला. कालच्या अपघाताची घटना ही दुर्दैवी आहे. आज मुख्यमंत्र्यांनी लोकांचा नातेवाईकांना मदत जाहीर केली. परंतु यावर थांबून फायदा नाही.  ही जी कंपनी आहे ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिला होता त्यावर बेस्ट प्रशासनाचा कोणताही कंट्रोल नव्हता, असेही प्रभू यांनी म्हटले. 

मिनी बसेस बंद केल्या, नागरिकांची गैरसोय: सुनील प्रभू

मुंबईत अनेक गल्लीबोळ आणि झोपड्यांचा परिसर आहे. याठिकाणी बेस्ट प्रशासनाने मिनी बसची सेवा सुरु केली होती. या भागात राहणाऱ्या लोकांना रिक्षा आणि टॅक्सीने प्रवास करणे परवडत नाही. पण सहा महिन्यांपूर्वी या मिनी बसेस बंद करण्यात आल्या. आता मोठ्या आकाराच्या इलेक्ट्रिक बसेसमुळे लहान रस्ते असणाऱ्या भागात वाहतूक कोंडी होत आहे, असेही सुनील प्रभू यांनी म्हटले. 

भाजप नेते प्रभाकर शिंदेचं बेस्ट प्रशासनाला पत्र

कुर्ला येथे झालेल्या बेस्ट बसच्या भीषण अपघाताबाबत आम्ही आपले लक्ष वेधू इच्छितो.सदर अपघातात रस्त्यावरून जाणाऱ्या चार नागरिकांचा नाहक बळी गेला असून तो आकडा वाढण्याची शक्यता आहे. 35 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. बेस्ट बसचा असा अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. आणि बेस्ट प्रशासनाला व जनप्रतिनिधींना अंतर्मुख करून विचार करायला लावणार आहे असे वाटते.

आजमितीस बेस्ट ताफ्यातील 3000 बेस्ट बसेसपैकी 2000 बेस्ट बसेस या भाडेकरार तत्त्वावर वेट लिजवर चालविण्यात येतात. या भाडेकरार तत्त्वावर बसेस चा पुरवठा करणारा कंत्राटदारच सदर बससाठी चालक आणि वाहक यांची व्यवस्था करतो. बऱ्याच वेळा असे लक्षात आले आहे की कंत्राट दराने नेमलेले बस  चालक हे नवीन असतात. आणि त्यामुळे त्यांना मुंबईच्या रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी बसेस चालवताना अडचण येते.त्यातूनच अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. गेल्या वर्षभरात सुमारे आठ नागरिकांनी बेस्टच्या   अपघातात जीव गमवाला आहे हे बाब अत्यंत गंभीर आहे. याची सखोल चौकशी करून सदर घटनांसंदर्भात जबाबदार कंत्राटदारावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. केवळ  एका वाहन चालकावर कारवाई करून सदर प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर भारतीय जनता पक्ष ते सहन करणार नाही असा इशारा आम्ही आपणास या पत्राद्वारे देत आहोत. 

कालच्या बेस्ट अपघातात बेस्ट चालक व कंत्राटदार यांच्या चुकीमुळे ज्यांचे नाहक बळी गेलेत अशा मृत नागरिकांच्या नातेवाईकांना आपण तातडीने दहा लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि जखमी नागरिकांवरील उपचाराची संपूर्ण जबाबदारी व खर्च बेस्ट प्रशासनाने उचलावा; तसेच जखमी नागरिकांना रुपये 50 हजार ते दोन लाख पर्यंत झालेल्या जखमेच्या प्रमाणात तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी आम्ही या पत्राद्वारे करित आहोत.बेस्टमध्ये भाडे करार तत्त्वावर बसेस घेण्याचे कंत्राट वर्ष 2018 ते 2021 या काळात तत्कालीन सत्ताधारी उबाठा सेनेच्या नेतृत्वात आणि उबाठा सेनेचे युवराज श्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार  देण्यात आले होते. त्यावेळी भाजपाने सदर पस्तावाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. आता वाढणाऱ्या अपघातामुळे आणि झालेल्या जीवितहानीमुळे सदर बाबीचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. तरी बेस्ट महाव्यवस्थापक म्हणून आपण याबाबत तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा आणी मृतांच्या नातेवाईकांना व जखमींना तातडीने मदत करावी तसेच दोषीवर कडक कारवाई करावी ही विनंती, असे प्रभाकर शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे. 

आणखी वाचा

नोकरीचा पहिला दिवस अन् घरी परतताना घात झाला, कुर्ल्यातील बस अपघातात आफरिन शाहने जीव गमावला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : फडणवीसांनी कुदळ-फावडे घेऊन कबर तोडायला जावं, पत्रबाजीची नाटकं बंद करा; संजय राऊतांनी ललकारलं
फडणवीसांनी कुदळ-फावडे घेऊन कबर तोडायला जावं, पत्रबाजीची नाटकं बंद करा; संजय राऊतांनी ललकारलं
Yashwant Verma : दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या घरात आग लागताच अग्नीशमन यंत्रणा पोहोचली, पण घरातला नोटांचा 'खजिना' पाहून डोळे विस्फारण्याची वेळ!
दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या घरात आग लागताच अग्नीशमन यंत्रणा पोहोचली, पण घरातला नोटांचा 'खजिना' पाहून डोळे विस्फारण्याची वेळ!
7 वर्षात 715 उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची नियुक्ती, यात SC, ST आणि OBC मधून किती? कायदामंत्र्यांनी आकडा सांगितला
7 वर्षात 715 उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची नियुक्ती, यात SC, ST आणि OBC मधून किती? कायदामंत्र्यांनी आकडा सांगितला
CBSE Pattern : पहिलीसाठी CBSE पॅटर्न; शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेनंतर शिक्षक अन् पालक गोंधळात, 'या' प्रश्नांबाबत अजूनही संभ्रम
पहिलीसाठी CBSE पॅटर्न; शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेनंतर शिक्षक अन् पालक गोंधळात, 'या' प्रश्नांबाबत अजूनही संभ्रम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 AM : 21 मार्च 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNagpur Clash Market loss : नागपूर हिंसाचारात तीन दिवसात सुमारे 400 कोटी रुपयांचंCBSE Pattern in SSC Board : 'पॅटर्न' बदलणार, सीबीएसई येणार ; अभ्यासक्रमाच कोणते बदल होणार?TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 21 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : फडणवीसांनी कुदळ-फावडे घेऊन कबर तोडायला जावं, पत्रबाजीची नाटकं बंद करा; संजय राऊतांनी ललकारलं
फडणवीसांनी कुदळ-फावडे घेऊन कबर तोडायला जावं, पत्रबाजीची नाटकं बंद करा; संजय राऊतांनी ललकारलं
Yashwant Verma : दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या घरात आग लागताच अग्नीशमन यंत्रणा पोहोचली, पण घरातला नोटांचा 'खजिना' पाहून डोळे विस्फारण्याची वेळ!
दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या घरात आग लागताच अग्नीशमन यंत्रणा पोहोचली, पण घरातला नोटांचा 'खजिना' पाहून डोळे विस्फारण्याची वेळ!
7 वर्षात 715 उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची नियुक्ती, यात SC, ST आणि OBC मधून किती? कायदामंत्र्यांनी आकडा सांगितला
7 वर्षात 715 उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची नियुक्ती, यात SC, ST आणि OBC मधून किती? कायदामंत्र्यांनी आकडा सांगितला
CBSE Pattern : पहिलीसाठी CBSE पॅटर्न; शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेनंतर शिक्षक अन् पालक गोंधळात, 'या' प्रश्नांबाबत अजूनही संभ्रम
पहिलीसाठी CBSE पॅटर्न; शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेनंतर शिक्षक अन् पालक गोंधळात, 'या' प्रश्नांबाबत अजूनही संभ्रम
GROK on Rahul Gandhi: 'आरएसएस'चा स्वातंत्र्य लढ्यात कोणताही सहभाग नाही, राहुल गांधी देशभक्त, सर्वात चांगले नेते; GROK AI च्या उत्तराने केंद्र सरकार हैराण, घेतला मोठा निर्णय
'आरएसएस'चा स्वातंत्र्य लढ्यात कोणताही सहभाग नाही, राहुल गांधी देशभक्त, सर्वात चांगले नेते; GROK AI च्या उत्तराने केंद्र सरकार हैराण, घेतला मोठा निर्णय
Jalgaon Crime : शिंदे गटाच्या माजी उपसरपंचाला चॉपरनं सपासप वार करत संपवलं; जळगावात खळबळ
शिंदे गटाच्या माजी उपसरपंचाला चॉपरनं सपासप वार करत संपवलं; जळगावात खळबळ
Madras High Court : 'महिला एकटी घरी असताना असताना तसले व्हिडिओ पाहून हस्तमैथून करत असेल तर ते पतीसाठी..' मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय
'महिला एकटी घरी असताना असताना तसले व्हिडिओ पाहून हस्तमैथून करत असेल तर ते पतीसाठी..' मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय
Devendra Fadnavis : कुंभमेळ्याच्या तयारीसाठी फडणवीस सरसावले, मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये येणार
कुंभमेळ्याच्या तयारीसाठी फडणवीस सरसावले, मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये येणार
Embed widget