ABP Majha Headlines : 04 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
न्यायाधीश शेखर कुमार यादवांच्या वक्तव्यांची सुप्रीम कोर्टाकडून दखल,हायकोर्टाच्या रजिस्ट्रारकडून मागवले तपशील, न्यायमूर्ती यादव म्हणाले होते, बहुसंख्याकांच्या इच्छेनुसार हा देश चालेल...
शंभर शकुनी मेल्यावर पवार जन्माला आले, गोपीचंद पडळकरांची मारकडवाडीत टीका तर सदाभाऊ म्हणतात पवारांचा पक्ष नव्हे गुंडांची टोळी...माजी आमदार राम सातपुतेंचीही मोहिते पाटलांवर बोलताना जीभ घसरली...
मुंबईत कुर्ल्यामधल्या बस दुर्घटनेतल्या मृतांची संख्या ७ वर, ड्रायवर संजय मोरेला पोलिसांकडून अटक, बेस्टच्या कारभारावर नेत्यांकडून टीकेची झोड...
जालन्यात अकरावीतल्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या..टवाळखोरांचं ब्लॅकमेलिंग आणि छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केलाचा कुटुंबीयांचा आरोप
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरचा मुस्लिम पक्षाचा दावा कोर्टानं फेटाळला, ४८ वर्षांपासून सुरु असलेला वाद निकाली, हिंदू संघटनांकडून कोर्टाचं स्वागत..
बीड जिल्ह्यात सरपंचाच्या हत्येप्रकरणी सहापैकी दोघांना अटक, आणखी चार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची सहा पथकं स्थापन..
उद्योगपती गौतम अदानींनी सागर बंगल्यावर घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, दोघांमध्ये दीड तास चर्चा, मुख्यमंत्री झाल्याबद्दल फडणवीसांच्या अभिनंदनासाठी भेट घेतल्याची माहिती
बांगलादेशातल्या हिंदू अत्याचारांविरोधात आज राज्यात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा, संभाजीनगरात रामगिरी महाराज उपस्थित, नाशिक, रत्नागिरीसह राज्यात अनेक ठिकाणी उत्स्फूर्त मोर्चे
बेळगाव केंद्रशासित करण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचं अमित शाहांना पत्र