Beed News : अतिरिक्त उसाला गुऱ्हाळाचा सक्षम पर्याय; गेवराईच्या तरुणाचा प्रकल्प ठरतोय शेतकऱ्यांसाठी मोठा आधार
Beed News : गेवराई शहराजवळ सुरू केलेल्या या प्रकल्पामुळे परिसरातल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे

Beed News : यावर्षी उसाच्या क्षेत्रामध्ये वाढ झाल्याने अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या तोडणीला अलेला ऊस आजही शेतातच उभा आहे आणि याच अतिरिक्त उसाचा प्रश्न सोडवण्यासाठी गेवराई येथील तरुण शेतकरी महेश तांबे याने गुळाचा प्रकल्प चालू केला आहे.
दररोज 10 ते 12 टन उसाचे गाळप
मराठवाड्यात सध्या तोडणीला आलेल्या उसाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तोडणी अभावी अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेतामध्ये उभा आहे. गेवराई चे तरुण शेतकरी महेश तांबे देखील दरवर्षी 15 ते 16 एकरावर उसाची लागवड करतात, मात्र ऊस तोडणीसाठी दरवर्षी विलंब होतो आणि ऊस कारखान्याला गेला तरी पैसे मिळण्यासाठी बराच काळ लागतो. म्हणून त्यांनी या अतिरिक्त उसासाठी पर्याय म्हणून स्वतः गुळाचा प्रकल्प उभा केला आहे आणि या प्रकल्पात दररोज 10 ते 12 टन उसाचे गाळप केले जात आहे
शेतकऱ्यांना मोठा दिलासा
गेवराई शहराजवळ सुरू केलेल्या या प्रकल्पामुळे परिसरातल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गोदावरी नदीच्या पाण्यावर या परिसरातले शेतकरी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करतात मात्र उसाला वेळेत तोडणी न आल्याने अनेक शेतकऱ्यांना उसातून पुरेसे उत्पन्न घेता येत नाही त्यामुळे आता अनेक शेतकरी या गुऱ्हाळमध्ये आपला ऊस घालत आहेत आणि यातून शेतकऱ्यांना देखील चांगला भाव मिळतोय
दररोज एक ते दीड टन गुळाची निर्मिती
या गुऱ्हाळात दररोज एक ते दीड टन गुळाची निर्मिती केली जात असून याची विक्री स्वतः महेश तांबे हे मार्केटमध्ये जाऊन करतात पूर्णपणे सेंद्रिय असलेल्या या गुळाला किरकोळ विक्री साठी त्यांना 40 ते 50 रुपये किलो चा भाव मिळत आहे यातून सर्व खर्च जाता 60 ते 70 हजार रुपयाच उत्पन्न महिन्याला मिळत आहे
असे प्रकल्प शेतकऱ्यांसाठी मोठा आधार
मराठवाड्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाली आहे मात्र अनेक कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने शेतकऱ्यांसमोर उसाच मोठं संकट उभा राहिल आहे त्यामुळे कारखान्याची वाट न पाहता शेतकरी गुऱ्हाळला पसंती देत आहेत. त्यामुळे अतिरिक्त उसासाठी आता गुळाचे असे प्रकल्प शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहेत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
