Ajit Pawar In Baramati : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार 'होम ग्राऊंड'वर जाणार, कसा असेल बारामती दौरा?
दोन महिन्यांनी पहिल्यांदा अजित पवार बारामतीत येणार आहेत. या निमित्तानं बारामतीत अजित पवारांच जोरदार शक्तिप्रदर्शन पहायला मिळणार आहे.

पुणे : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर म्हणजे जवळपास (Ajit Pawar) दोन महिन्यांनी पहिल्यांदा अजित पवार बारामतीत येणार आहेत. उद्या (शनिवारी 26 सप्टेंबर) बारामतीत अजित पवारांची जंगी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर नागरी सत्काराचे देखील आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्तानं बारामतीत अजित पवारांच जोरदार शक्तिप्रदर्शन पहायला मिळणार आहे. आज पिंपरी-चिंचवडमध्येही अजित पवारांचं कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं. त्यानंतर आता उद्या नेमकं काय घडणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
कसा असेल अजित पवारांचा दिनक्रम?
-बारामती तालुक्यातील सुपे येथील पोलीस स्टेशनचे उद्घाटन करणार दुपारी 2 वाजता
-दुपारी अडीच वाजता मोरगावच्या मयुरेश्वराचे दर्शन घेणार
-दुपारी 3 वाजता माळेगाव येथील पोलीस ठाण्याचे उद्घाटन अजित पवार करणार
-बारामतीत अजित पवारांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार
-मिरवणूकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज उद्यान कसबा येथून दुपारी 3:30 करणार
-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करणार
-ही मिरवणूक कसबा - गुणवडी चौक - गांधी चौक - सुभाष चौक - भिगवण चौक ते शारदा प्रांगण,बारामतीपर्यंत असून शारदा प्रांगण, बारामती येथे साय 4:30 वा भव्य नागरी सत्कार आणि जाहीर सभा होणार आहे.
-बारामतीत उद्या अजित पवार गट शक्ती प्रदर्शन करणार
-अजित पवार यांचा बारामतीत भव्य नागरी सत्कार
कुटुंबासमोर सत्कार होणार...
रामतीच्या शारदा प्रांगणात अजित पवारांचा बारामतीकरांकडून जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार, भाऊ श्रीनिवास पवार , पार्थ आणि जय या दोन मुलांसह अजित पवारांच कुटुंब उपस्थित असणार आहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी सध्या बारामतीत सुरु आहे. पवार कुटुंबातील नेते आधी राष्ट्रवादी पक्ष हा एक कुटुंब असल्याचं सांगायचे. आता पक्षात फूट पडली असली तरी कुटुंबात फूट पडलेली नाही, असं म्हणत आहेत आणि म्हणूनच बारामतीतील पक्षाचे कार्यकर्ते एकाचवेळी अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांबरोबर दिसत आहेत. त्यामुळंच बारामतीतील अजित पवारांच शक्तिप्रदर्शन वरकरणी शरद पवारांना आव्हान वाटत असलं तरी तो कौतुक सोहळा ठरण्याची शक्यता आहे. बाहेर काहीही चित्र असलं तरी बारामतीत दोन्ही गट एकत्र दिसत आहेत. बारामतीच्या राजकारणाचे गहिरे रंग यानिमित्तानं पहायला मिळणार आहेत.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
