Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 13 ऑगस्ट 2021 | शुक्रवार | ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...
1. कोरोना काळात पालक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, शाळेच्या फीमध्ये 15 टक्के सवलत देण्याचा निर्णय, मात्र इंग्रजी शाळांचा सरकारच्या निर्णयाला विरोध
2. दोन डोस घेतलेल्यांच्या लोकल पाससाठी ऑनलाईन लिंक उपलब्ध, मोबाईलवर आलेला संदेश दाखवून पास मिळणार
3. राज्यपालांच्या मंजुरीअभावी रखडलेल्या 12 आमदारांच्या यादीवर उच्च न्यायालय अंतिम फैसला सुनावणार, राज्यपालांच्या भूमिकेवर कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्षं
4. प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सच्या प्रवण मराठेंना अटक, पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, आत्महत्या करणाऱ्या मिलिंद मराठेंसह कुटुंबातील चौघांवर गुन्हा
5. नाशकात हेल्मेट नसल्यास दुचाकीस्वारांना पेट्रोल मिळणार नाही, 15 ऑगस्टपासून निर्णयाची अंमलबजावणी, वाहतूक विभाग सज्ज
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 13 ऑगस्ट 2021 | शुक्रवार | ABP Majha
6. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, ठाणे पोलिसांकडून लूकआउट नोटीस जारी, विमान आणि जलमार्गे प्रवासावर बंदी
7. शरद पवारांचा आवाज काढून मंत्रालयात बदलीसाठी फोन केल्याची घटना, पिंपरी पोलिसांकडून तिघांना अटक
8. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सोलापुरातील पाच तालुक्यांत आजपासून संचारबंदी, व्यापाऱ्यांचा मात्र विरोध
9. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ऑनलाईन सहभागी होणार, आज दहा वाजता शिवशाहीर माझा कट्ट्यावर
10. लॉर्ड्स कसोटीचा पहिला दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला, लोकेश राहुलचं दमदार शतक, पहिल्या दिवसअखेर तीन गडी गमावून भारताच्या 276 धावा