PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम, अन्यथा...
PM Kisan : प्रधानमंत्री किसान सन्मान निधीद्वारे शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6000 रुपयांची रक्कम दिली जाते. 2000 रुपयांप्रमाणं तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाते.
नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडू चालवली जाते. या योजनेत शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 रुपयांची रक्कम दिली जाते.2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या योजनेची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत शेतकऱ्यांना 18 हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे. शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा आहे. त्यापूर्वी शेतकऱ्यांना एक काम करावं लागणार आहे. काही राज्यांमध्ये अॅग्रीस्टॅकवर फार्मर रजिस्ट्री या योजनेसाठी आवश्यक करण्यात आली आहे. तर, नव्या शेतकरी नोंदणीसाठी फार्मर आयडी आवश्यक करण्यात आला आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे 3.46 लाख कोटी रुपयांची रक्कम डीबीटीद्वारे त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. साधारणपणे 11 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे. 18 व्या हप्त्याची रक्कम 9.58 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आता. आता शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या 19 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मात्र, शेतकऱ्यांना या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळवायचे असल्यास त्यांना शेतकरी नोंदणी करावी लागणार आहे.
केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयानुसार डिसेंबर 2024 पासून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा फायदा ज्या शेतकऱ्यांनी फार्मर रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांना मिळणार नाही. त्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये मिळवण्यासाठी फार्मर रजिस्ट्री करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे.
शेतकरी नोंदणी करण्याचं प्रमुख कारण शेतकऱ्यांकडे नेमकी किती जमीन आहे याची माहिती मिळवणे. जमीन धारणा क्षेत्रावर आधारित लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे याचा उद्देश आहे.
शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा
शेतकऱ्यांना आतापर्यंत 18 हप्त्यांचे 36000 रुपये मिळाले आहेत. जे शेतकरी पहिल्यापासून या योजनेत सहभागी आहेत. त्यांना या योजनेतून 36000 रुपये मिळाले आहेत. आता शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याच्या 2000 रुपयांची प्रतीक्षा आहे. 18 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबर 2024 महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात कार्यक्रम आयोजित करत देण्यात आली होती.
पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. तर, महाराष्ट्र सरकारनं केंद्राच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केली आहे. त्यातून शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 रुपये दिले जातात. त्यामुळं केंद्राच्या 2000 रुपयांची आणि राज्याच्या 2000 रुपयांची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलं आहे.
इतर बातम्या :