Raigad Crime : बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना! महाडमध्ये जन्मदात्या पित्याकडूनच मुलीवर लैंगिक अत्याचार
Raigad Crime News : बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये घडली आहे.
Raigad Crime : बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये घडली आहे. पित्यानेच स्वतःच्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीवर महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Mahad MIDC Police Station) पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे रायगड (Raigad Crime News) जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये पित्यानेच स्वतःच्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. या घटनेनंतर पीडित मुलीने पोलीस ठाणे गाठत आपबीती सांगितली. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार मुलीच्या बापावर महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नराधम बाप जेरबंद
महाड एमआयडीसी पोलिसांनी पीडित मुलीच्या बापाला अटक केली असून त्याच्या विरोधात पोक्सो कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समेळ सुर्वे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.
एसटी चालकाने गाभण गायीला चिरडले
दरम्यान, कर्जत एस. टी. आगारात रात्री एका शिकाऊ एसटी चालकाने गायीला चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या गायीच्या पोटात वासरू असल्याने ती गाय गाभण असल्याच समजतंय.या अपघाताचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर कर्जत मधील भीसेगाव येथील ग्रामस्थांनी एस.टी. आगाराच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या