एक्स्प्लोर

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या बॅनरवरून भुजबळांचा फोटो गायब, थेट कट्टर विरोधक कांदेंची एन्ट्री; कृषीमंत्र्यांची जोरदार चर्चा!

Manikrao Kokate : मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर माणिकराव कोकाटे पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर आले आहेत. माणिकराव कोकाटे यांच्या स्वागतासाठी त्यांच्या समर्थकांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आलेली आहे.

नाशिक : सिन्नर विधानसभेचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांची कृषीमंत्रीपदी वर्णी लागली आहे. मंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच नाशिकमध्ये (Nashik) दाखल झाले. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून नाशिकमध्ये जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. मात्र हेच बॅनर आता चर्चेचा विषय ठरले आहे. कारण माणिकराव कोकाटे यांच्या स्वागताच्या बॅनरवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा फोटो गायब आहे. तर भुजबळांचे कट्टर विरोधक असलेले आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांचा फोटो बॅनरवर झळकला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा शपथविधी (Mahayuti Cabinet Expansion) सोहळा रविवारी (दि. 15) पार पडला. यामध्ये 33 कॅबिनेट तर 6 राज्यमंत्र्यांचा समावेश आहेत. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना डावलण्यात आल्याने ते कमालीचे नाराज झाले आहेत. तर छगन भुजबळ यांना डच्चू देऊन माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आल्याची चर्चा सध्या रंगली आहे. त्यातच नाशिकमध्ये लागलेल्या बॅनरने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

कोकाटे, भुजबळ यांच्यातील मतभेद पुन्हा चर्चेत

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर माणिकराव कोकाटे पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर आले आहेत. माणिकराव कोकाटे यांच्या स्वागतासाठी शहरात त्यांच्या समर्थकांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानाबाहेर लावलेल्या बॅनरवर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा फोटो नसल्याचा पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांचे कट्टर राजकीय विरोधक सुहास कांदे यांचा फोटो मात्र बॅनरवर दिसून येत आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे नाराज आहेत. तर माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ यांच्यातील संघर्ष मात्र या बॅनरबाजीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

मला विचारून बॅनर लावलेले नाही

दरम्यान, या बॅनरबाबत माणिकराव कोकाटे यांना विचारले असता ते म्हणाले की, माझे आणि त्यांचे काही मतभेद असतील मात्र वैर नाही. जे बॅनर लावले आहेत ते कार्यकर्त्यांनी लावले आहेत. त्यांनी कोणाचे फोटो टाकायचे आणि कुणाचे नाही टाकायचे हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी मला विचारून बॅनर लावलेले नाही. मला विचारले असते तर मी त्यांना सांगितले असते भुजबळांचा फोटो टाका, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर  भुजबळांचे कट्टर विरोधक समजले जाणारे सुहास कांदे यांचा फोटो बॅनरवर दिसला. याबाबत विचारले असता मला माहित नाही बॅनर कोणी लावलेले आहे. कार्यकर्त्यांना जे योग्य वाटते ते कार्यकर्ते करतात, असे माणिकराव कोकाटे म्हणाले. 

आणखी वाचा

Manikrao Kokate : छगन भुजबळांचा अजितदादांवर थेट हल्लाबोल, माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; म्हणाले, 'भुजबळांनी पंतप्रधान...'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
मोठी बातमी : शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना
शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना
Ajit Pawar : अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
Rajya Sabha Election 2026: लहानपणापासून भुकेचे चटके सोसले, संघर्ष केला, दलित समाजाची मुलगी देशाच्या वरिष्ठ सभागृहात जाणार, शिंदे साहेबांनी...; राज्यसभेची उमेदवारी मिळताच ज्योती वाघमारेंची पहिली प्रतिक्रिया
लहानपणापासून भुकेचे चटके सोसले, संघर्ष केला, दलित समाजाची मुलगी देशाच्या वरिष्ठ सभागृहात जाणार, शिंदे साहेबांनी...; राज्यसभेची उमेदवारी मिळताच ज्योती वाघमारेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष
Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर - संजय राऊत
Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, सोनं 2698 तर चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर 
सोने चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक, चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Nitish Kumar: नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
नितीशकुमारांच्या बिहारी राजकारणाच्या पर्वाचा अखेर शेवट; राज्यसभेत दुसरी इनिंग सुरु करणार! नवा मुख्यमंत्री भाजपचा की जेडीयूचा होणार?
Rajya Sabha Election 2026 Shivsena Shinde Group Candidate: राज्यसभेच्या तिकिटासाठी तेंडुलकरच्या लग्नमंडपातून धावपळ; शिंदेंच्या कारच्या मागे शायना एनसी धावत सुटल्या, नेमकं काय घडलं?, VIDEO
राज्यसभेच्या तिकिटासाठी तेंडुलकरच्या लग्नमंडपातून धावपळ; शिंदेंच्या कारच्या मागे शायना एनसी धावत सुटल्या, नेमकं काय घडलं?, VIDEO
Rajya Sabha Election 2026 Jyoti Waghmare: एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक, आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहऱ्याला शिवसेनेकडून राज्यसभा निवडणुकीसाठी संधी, कोण आहेत ज्योती वाघमारे?
एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक, आंबेडकरी चळवळीतील आक्रमक चेहऱ्याला राज्यसभा निवडणुकीसाठी संधी, कोण आहेत ज्योती वाघमारे?
Embed widget