एक्स्प्लोर

K P Patil : ठाकरे गटाचे नेते के पी पाटलांची पुन्हा कोलांटउडी? मुश्रीफांचा घरी जाऊन सत्कार, महायुतीत घरवापसी करणार असल्याची चर्चा!

ठाकरे गटाचे नेते के पी पाटील यांनी आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची थेट त्यांच्या कागलमधील निवासस्थानी जाऊन भेट घेत फेटा बांधून त्यांचा सत्कार केला.

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन महिन्यात तीनदा पक्ष बदलून ठाकरे गटामध्ये गेलेल्या माजी आमदार के पी पाटील यांनी आता पुन्हा एकदा कोलांटउडी मारण्याचा निर्णय घेतला आहे का? अशी चर्चा कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. ठाकरे गटाचे नेते के पी पाटील यांनी आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची थेट त्यांच्या कागलमधील निवासस्थानी जाऊन भेट घेत फेटा बांधून त्यांचा सत्कार केला. त्यामुळे पुन्हा एकदा के पी पाटील यांच्या कोलांटउडी मारण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्याबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांनी के पी पाटील यांनी घरी जात सत्कार केला. त्यामुळे पाटील हे पुन्हा एकदा महायुतीमध्ये येणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

प्रकाश आबिटकर आणि के पी पाटील कट्टर राजकीय वैरी

के पी पाटील यांनी ठाकरे गटाकडून राधानगरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा प्रकाश आबिटकर यांनी 38 हजारांवर मताधिक्यांनी दारुण पराभव केला. त्यामुळे के पी पाटील पुन्हा एकदा महायुतीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत का? अशी सुद्धा चर्चा आहे. राधानगरीच्या स्थानिक राजकारणामध्ये प्रकाश आबिटकर आणि के पी पाटील हे कट्टर राजकीय वैरी आहेत. बिद्री कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आबिटकर यांच्याकडून पॅनल उभा करण्यात आलं होतं. मात्र या निवडणुकीमध्ये आबिटकर यांना के पी पाटील यांचा पराभव करण्यात अपयश आलं होतं. कारखान्याच्या सर्वच्या सर्व जागा के पी पाटील यांच्या आघाडीने जिंकल्या होत्या. केपींच्या आघाडीमध्ये हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी मदत केली होती. आता मात्र परिस्थिती बदलली असून आपण आबिटकर कॅबिनेट मंत्री झाले आहेत. त्यामुळे बदलते राजकीय संदर्भ लक्षात घेता हसन मुश्रीफ यांच्याजवळ के पी पाटील जाण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
Samarjitsinh Ghatge Kolhapur news: देवेंद्र फडणवीसांनी मुश्रीफ अन् माझ्यातील वैर संपवलंय, मी मूळ पक्षात परत येतोय: समरजीत घाटगे
देवेंद्र फडणवीसांनी मुश्रीफ अन् माझ्यातील वैर संपवलंय, मी मूळ पक्षात परत येतोय: समरजीत घाटगे
कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यात रायबा, सरदार आणि राणोजीला हवी वाघिणीची साथ; वाघीण स्थलांतरित करून आणल्यास पर्यटनाला चालना
कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यात रायबा, सरदार आणि राणोजीला हवी वाघिणीची साथ; वाघीण स्थलांतरित करून आणल्यास पर्यटनाला चालना
देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे; समरजीत घाटगेंची पुन्हा भाजपवापसी; मुंबईत पक्ष प्रवेशाची तारीख ठरली
देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे; समरजीत घाटगेंची पुन्हा भाजपवापसी; मुंबईत पक्ष प्रवेशाची तारीख ठरली

व्हिडीओ

Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime: अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नीनंच काटा काढला, प्रियकराच्या मदतीने निर्घृणपणे संपवलं, मात्र सत्य समोर आलंच, घटनेनं कवठेमहांकाळ हादरलं!
अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नीनंच काटा काढला, प्रियकराच्या मदतीने निर्घृणपणे संपवलं, मात्र सत्य समोर आलंच, घटनेनं कवठेमहांकाळ हादरलं!
Uttar Pradesh Accident: गाजीपुरमध्ये यात्रेकरूंनी भरलेली बस डिव्हायडरला धडकून उलटली, महाराष्ट्रातील दोन महिलांचा जागीच अंत, 35 यात्रेकरू जखमी
देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, गाजीपुरमध्ये यात्रेकरूंनी भरलेली बस डिव्हायडरला धडकून उलटली, दोन महिलांचा जागीच अंत, 35 यात्रेकरू जखमी
Maharashtra Live blog updates: उन्हाळी सुट्टीत सर्वसामान्यांचा बस प्रवास महागला, 15 एप्रिल ते 15 जून दरम्यान 10% भाडेवाडीचा निर्णय
Maharashtra Live blog updates: उन्हाळी सुट्टीत सर्वसामान्यांचा बस प्रवास महागला, 15 एप्रिल ते 15 जून दरम्यान 10% भाडेवाडीचा निर्णय
Mumbai Metro 3 : मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
KKR vs LSG : मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली, केकेआरचा तिसरा पराभव
मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली
BMC Budget 2026 : मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
Baramati byelection 2026: बारामतीत काँग्रेसची माघार, पण 'हे' 22 जण मागे हटलेच नाहीत, सुनेत्रा पवारांविरोधात शड्डू ठोकणारे कोण?
बारामतीत काँग्रेसची माघार, पण 'हे' 22 जण मागे हटलेच नाहीत, सुनेत्रा पवारांविरोधात शड्डू ठोकणारे कोण?
Nashik Crime Ravindra Erande news: नाशिक पोलिसांनी नराधम रवींद्र एरंडेला चौदावं रत्न दाखवलं, लंगडत बाहेर पडला अन् म्हणाला....
नाशिक पोलिसांनी नराधम रवींद्र एरंडेला चौदावं रत्न दाखवलं, लंगडत बाहेर पडला अन् म्हणाला....
Embed widget