Cancer: तरुणांनो अन् महिलांनो आताच काळजी घ्या! कॅन्सरचा धोका झपाट्याने वाढतोय, एका रिपोर्टमध्ये धक्कादायक बाब समोर
Cancer: आजच्या काळात तरुण आणि महिलांमध्ये कर्करोगाचा धोका वाढताना दिसत आहे. एका अहवालात ही बाब समोर आली आहे. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही बदल करू शकता.
Cancer: आजकालची बदलती जीवनशैली, कामाचा ताण, जंकफूडचे सेवन यासारख्या गोष्टींमुळे अनेकांना विविध गंभीर आजार होत आहेत. रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोग हे आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच वाढत्या वयानुसार कर्करोगाचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढतोय, अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या अहवालानुसार, तरुण, प्रौढ आणि विशेषतः महिलांमध्ये कर्करोगाचा धोका वाढत असल्याचे दिसून येत आहे. आणखी काय म्हटलंय या रिपोर्टमध्ये? जाणून घ्या...
कोणत्या वयोगटातील लोकांना कर्करोगाचा धोका अधिक?
या रिपोर्टनुसार, 50 वर्षांखालील महिलांना स्तन, गर्भाशय, कोलोरेक्टल आणि स्वादुपिंडाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. या कर्करोगाचे मुख्य कारण खराब जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी असू शकतात. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या एका नवीन अहवालात असे दिसून आले आहे की विशिष्ट वयोगटातील महिलांना कर्करोगाचा धोका पुरुषांपेक्षा जास्त असतो. चला जाणून घेऊया हा गंभीर आजार कसा टाळता येईल?
वजन नियंत्रित करा
निरोगी जीवनशैलीसाठी वजन नियंत्रणात ठेवणे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोकाही कमी होऊ शकतो. वजन वाढणे किंवा लठ्ठपणामुळे अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो, ज्यामध्ये स्तनाचा कर्करोग, आतड्याचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा सर्वाधिक धोका असतो.
फायबरयुक्त आहार घ्या
पोट निरोगी ठेवण्यासाठी फायबरयुक्त अन्न उत्तम मानले जाते. यामुळे तुमची आतडे निरोगी राहण्यास मदत होते आणि तुमचे वजनही नियंत्रणात राहते. हे विशेषतः आतड्यांसंबंधी कर्करोगाचा धोका कमी करते. यामुळे तुमचे पोट सहज साफ होते आणि तुमचे संपूर्ण शरीर निरोगी राहते.
व्यायाम करा
दररोज व्यायाम केल्याने तुम्ही फक्त तंदुरुस्त राहत नाही तर कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोकाही कमी होतो. जे लोक शारीरिकरित्या सक्रिय राहतात त्यांना स्तनाचा कर्करोग, कोलन कर्करोग, मूत्राशयाचा कर्करोग, मूत्रपिंडाचा कर्करोग आणि फुफ्फुसाचा कर्करोग इत्यादी अनेक प्रकारच्या कर्करोगाच्या जोखमीपासून संरक्षण मिळते.
सनस्क्रीन वापरा
सनस्क्रीन लावल्याने, सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते आणि तुम्ही त्वचेच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून दूर राहू शकता. अतिनील किरणांमुळे त्वचेचा कर्करोग होऊ शकतो आणि त्यापासून संरक्षण हे सर्वात महत्त्वाचे आहे आणि यासाठी सनस्क्रीन हा एक चांगला पर्याय असू शकतो. या व्यतिरिक्त
धूम्रपान टाळा
सिगारेटच्या धुरामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. सिगारेट ओढल्याने फुफ्फुसाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग आणि मूत्राशयाचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो. सिगारेट सोडल्याने कर्करोगाचा धोका ३० ते ५० टक्क्यांनी कमी होतो.
हेही वाचा>>>
Cancer: सावधान! तुमच्या दातांमुळे सुद्धा होऊ शकतो कर्करोग? 'ही' लक्षणं तुम्हाला नाही ना? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )