Mahakumbh 2025 Viral Girl: कुंभमेळ्यात रातोरात व्हायरल 'मोनालिसा' च्या पत्रिकेत 'हा' ग्रह! कसं चमकलं तिचं नशीब? ज्योतिषी सांगतात...
Mahakumbh 2025 Viral Girl: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ 2025 येथे हार विकणारी मुलगी 'मोनालिसा' इतकी व्हायरल झाली आहे की, सध्या तिचीच चर्चा होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार यामागचे कारण जाणून घ्या
Mahakumbh 2025 Viral Girl: प्रयागराजमधील महाकुंभ 2025 मध्ये व्हायरल गर्ल मोनालिसा सध्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे. सावळ्या रंगाची, सुंदर डोळे आणि हृदयाला भिडणारे हास्य.. अशा ही मुलगी सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय झाली आहे. तिचे सौंदर्य पाहून प्रत्येकजण तिच्याकडे पाहत राहतो. मात्र आता परिस्थिती अशी आहे की, एक अत्यंत सामान्य, साधी मुलगी आता सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. अशात अनेकांच्या मनात प्रश्न असा येतो की, मोनालिसा रातोरात सेलिब्रिटी कशी बनली? ज्योतिषषास्त्रानुसार तिच्या पत्रिकेत असा कोणता ग्रह आहे? ज्याने तिला इतकी प्रसिद्धी मिळवून दिली? ज्योतिषशास्त्रात याबाबत काय म्हटलंय?
मोनालिसा सोशल मीडियावर अधिराज्य गाजवतेय!
सध्या महाकुंभ 2025 ची व्हायरल गर्ल मोनालिसा सोशल मीडियावर अधिराज्य गाजवत आहे. संपूर्ण सोशल मीडिया त्याच्या फोटो आणि व्हिडीओंनी भरला आहे. पण विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे अचानक एक साधी मुलगी इतकी व्हायरल कशी झाली? यामागचे कारण ज्योतिष कृष्णकांत मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले की, असा कोणता ग्रह आहे ज्याच्यामुळे हार विकणारी एक सामान्य मुलगी इतकी व्हायरल झाली आहे? जाणून घेऊया ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून...
मोनालिसा इतकी व्हायरल कशी झाली?
ज्योतिषी कृष्णकांत मिश्रा यांनी अलीकडेच हार विकणारी मुलगी कशी व्हायरल झाली याचा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, एका गरीब कुटुंबातील सुंदर डोळ्यांची मुलगी रातोरात इतकी व्हायरल झाली की देश-विदेशातील लोक तिला ओळखू लागले. ज्योतिषशास्त्रानुसार असे घडते जेव्हा कुंभ राशीतील गुरु, शुक्राची राशी वृषभ राशीत येतो, तसेच जेव्हा सूर्य मकर राशीत येतो, तेव्हा असे घडते
10 जानेवारीनंतर नशीब बदलले?
ज्योतिषी कृष्णकांत मिश्रा यांनी सांगितले की, 10 जानेवारीनंतर सूर्याचे उत्तरायण झाले आणि उत्तरेकडे दैवी शक्ती जागृत झाल्या. त्यावेळी सूर्य आणि शुक्र हा डोळ्यांचा कारक असल्यामुळे ही ब्युटी गर्ल अचानक व्हायरल झाली. यामुळेच एक सामान्य मुलगी इतकी प्रसिद्ध झाली की तिला चित्रपटाची ऑफरही आली.
Why Monalisa Simple Girl Become Viral in Mahakumbh 2025 in Prayagraj..#MahaKumbh2025 #monalisa #astrology #prayagraj #MahaKumbhMela2025 pic.twitter.com/aO6uU1R0zk
— KrishnaKantMishra (@krishnaguruje) January 22, 2025
राणू मंडल बाबतही असेच घडले होते?
ज्योतिषी कृष्णकांत मिश्रा म्हणतात की, यापूर्वी राणू मंडल बाबतीतही असे घडले होते, जे त्यांनी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून उदाहरणे देऊन स्पष्ट केले. राणू मंडल जेव्हा प्रसिद्ध झाली, त्यावेळी तिच्या पत्रिकेतील बुध सक्रिय होता आणि तिच्या बोलण्यामुळे ती खूप प्रसिद्ध झाली होती. ते म्हणाले की, राहु सोशल मीडियावर कोणाला गरीबीपासून राजा बनवणार हे कोणालाच ठाऊक नसते. मोनालिसा याचे उत्तम उदाहरण आहे.
हेही वाचा>>>
Maha Kumbh 2025: कुंभमेळ्यात भेटली स्वर्गातली 'अप्सरा'? सोनेरी डोळ्यांची 'ती' मुलगी कोण? नैसर्गिक सौंदर्याने इंटरनेटवर खळबळ! फोटो व्हायरल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )