Nitish Kumar and BJP : मणिपूरमध्ये भाजपला दिलेला पाठिंबा जेडीयूने काढला, पण कलटी मारण्याची चर्चा असतानाच नितीश कुमारांनी प्रदेशाध्यक्षांना हटवलं
Nitish Kumar and BJP : मणिपूरमध्ये भाजपला दिलेला पाठिंबा जेडीयूने काढला, पण कलटी मारण्याची चर्चा असतानाच नितीश कुमारांनी प्रदेशाध्यक्षांना हटवलं
Nitish Kumar and BJP : मणिपूरमध्ये भाजप नेते बिरेंद्र सिंह यांच्या नेतृत्वात भाजपचं सरकार आहे. या भाजप सरकारला बिहारचे मुख्यमंत्री असलेल्या नितीश कुमार यांनी पाठिंबा दिली होता. मात्र, हा पाठिंबा काढून घेण्यात आला. जेडीयूने सरकारचा पाठिंबा काढून घेण्याबाबत राज्यपालांना पत्र लिहिलंय. मात्र, पाठिंबा काढून घेण्यात आल्यानंतर नितीश कुमारांच्या पक्षाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. जेडीयूने पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगत मणिपूरमधील प्रदेशाध्यक्षांची हकालपट्टी केलीये.
#WATCH | Delhi: JD(U) national spokesperson Rajeev Ranjan Prasad says, "This is misleading and baseless. The party has taken cognisance of this and the president of Manipur unit of the party has been relieved of his position. We have supported NDA and our support to the NDA… https://t.co/PhAJwAp4xn pic.twitter.com/usvowgta3n
— ANI (@ANI) January 22, 2025
मणिपूरमध्ये भाजप बळकट, जेडीयूच्या पाठिंब्याशिवायही स्थिर सरकार
जेडीयूच्या या निर्णयामुळे मणिपूरमधील भाजप सरकारला मोठा धक्का वगैरे बसणार नव्हता. मात्र, केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार नितीश कुमार आणि काही मित्र पक्षांच्या टेकू वर निर्भर असल्याने नितीश कुमारांच्या भूमिकेकडे देशाचं लक्ष आहे. सध्यातरी नितीश कुमार भाजपसोबत ठामपणे उभे असल्याचं चित्र आहे. त्यामुळे नितीश कुमार भाजपची साथ सोडणार या चर्चेला तुर्तास पूर्णविराम मिळालाय.
मणिपूर विधानसभेत भाजपकडे 32 जागा आहेत, ज्या बहुमतापेक्षा जास्त आहेत. जेडीयूचे 6 आमदार होते, त्यातील 5 पुढे भाजप सरकारमध्ये सहभागी आहेत. जवळपास दोन वर्षांपासून गोंधळात असलेल्या मणिपूरमध्ये भाजपला हा निर्णय मोठा धक्का मानला जात होता. मणिपूर विधानसभेत भाजपकडे 32, एनपीएफकडे 5 आणि एनपीपीकडे 7 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूला अनपेक्षितपणे 6 जागा मिळाल्या. काँग्रेसकडे 5 तर केपीएकडे 2 जागा आहेत. सध्या जेडीयूने पाठिंबा काढून घेतल्याने भाजप सरकारला कोणताही धोका नाही. पण या निर्णयाचे दूरगामी परिणाम होऊ शकतात, असे बोलले जात आहे.
नितीश कुमार पुढील काळात कोणती भूमिका घेणार हे पाहाणे महत्त्वपूर्ण
जेडीयूचे हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे. कारण नितीश कुमार यांचा इतिहास पाहिला तर त्यांनी अनेकदा वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. नितीश कुमार यांनी पाठिंबा काढून घेतला असता तर बिहारसह देशाच्या राजकारणात खळबळ उडाली असती. कारण काँग्रेससह विरोधी पक्षाचे अनेक नेते नितीश कुमार आणि तेलगू देसमच्या चंद्राबाबूंना भाजपपासून दूर खेचू इच्छितात हे सर्वश्रूत आहे. आगामी काळात नितीशकुमार आणि भाजपचे संबंध कसे असतील हे पाहाणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या