एक्स्प्लोर

EPFO : नोव्हेंबर महिन्यात 14.63 लाख सदस्यांची ईपीएफओकडे नोंदणी, नव्या कर्मचाऱ्यांसह महिलांची संख्या वाढली, महाराष्ट्र टॉपवर

EPFO : ईपीएफओनं नोव्हेंबर 2024 चा पेरोल डेटा जाहीर केला आहे. त्यानुसार 8.74 लाख नव्या सदस्यांनी नोंदणी केली आहे. महिलांची संख्या देखील वाढली आहे.

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच एम्पलॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशननं  नोव्हेंबर महिन्याचा पे रोल डेटा जाहीर केला आहे. या डेटानुसार नोव्हेंबर महिन्यात ईपीएफओच्या मेंबर्स ची संख्या 14 लाख 63 हजारांनी वाढली आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये 9.07 टक्के वाढ झाल्याचे पहायला मिळाले. 

नोव्हेंबर 2023 च्या तुलनेत नोव्हेंबर 2024 मध्ये पेरोल डेटा नुसार 4.88 टक्के वाढ पाहायला मिळाली. या आकडेवारीनुसार देशात संघटित क्षेत्रात नोकऱ्या वाढत असल्याचं पाहायला मिळतं. कर्मचाऱ्यांमध्ये ईपीएफओ सोबत जोडले जाण्यासह त्यापासून मिळणाऱ्या लाभांबद्दल जागरूकता वाढली आहे, असं म्हटलं जातंय. 

ईपीएफओसोबत नोव्हेंबर महिन्यात 8.74 लाख सदस्य जोडले गेले. ऑक्टोबर 2024 मध्ये नव्यानं नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत ही वाढ 16.58 टक्का पाहायला मिळाली. तर नोव्हेंबर 2023 च्या तुनलेत नोव्हेंबर 2024 मध्ये 18.80 टक्के वाढ दिसून आली. 

ईपीएफओच्या आकडेवारीनुसार नव्यानं जोडल्या गेलेल्या खातेदारांमध्ये 18 ते 25 वर्षांदरम्यान वय असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. नोव्हेंबरमध्ये नव्यानं नोंदणी झालेल्या सदस्यांपैकी 54.97 टक्के सदस्य  18 ते 25 वयोगटातील आहेत. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये यामध्ये 9.56 टक्के वाढ झाली आहे. याशिवाय नोव्हेंबर 2023 मध्ये 18 ते 25 वयोगटातील जितके सदस्य जोडले गेले होते त्याच्या 13.99 टक्के अधिक नोंदणी नोव्हेंबर 2024 मध्ये झाली आहे. 

पेरोल डेटाच्या आकडेवारीनुसार 14.39 लाख कर्मचारी ईपीएफओतून बाहेर पडले होते. ते पुन्हा ईपीएफओशी जोडले गेले आहेत. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये 11.47 टक्के वाढ झाल्याचं पाहायला मिळतं. 

पेरोल डेटाचं विश्लेषण केलं असता नोव्हेंबर 2024 मध्ये ज्या खातेदारांनी ईपीएफओ जॉईन केलं त्यामध्ये 2.40 लाख महिलांची संख्या आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत या आकडेवारीत 14.94 टक्क्यांची वाढ झाली आहे. वार्षिक आकडेवारी पाहिली असता त्यामध्ये 23.62 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. 

राज्यनिहाय आकडेवारी पाहिली असता पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून नोंदणीची टक्केवारी 59.42 टक्के आहे. पाच राज्यांमध्ये सदस्यांची  संख्या 8.69 लाख इतकी आहे. सर्वाधिक ईपीएफओ सदस्यांची संख्या जोडण्यात महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये महाराष्ट्रातून 14 लाख 63 हजारांच्या तुलनेत 20.86 टक्के सदस्य जोडले गेले आहेत. 

दरम्यान, येत्या काळात ईपीएफओकडून खातेदारांच्या सोयीसाठी अनेक बदल केले जाणार आहेत. त्यामध्ये खातेदारांना पीएफ खात्यातील रक्कम एटीम कार्डद्वारे काढण्याची सोय उपलब्ध करुन दिली जाणार आहे. 

इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karuna Sharma on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा
'आयुष्मान' योजनेंतर्गत वयोमर्यादा वाढवून रक्कमही दुप्पट करा; केंद्र सरकारला शिफारस
'आयुष्मान' योजनेंतर्गत वयोमर्यादा वाढवून रक्कमही दुप्पट करा; केंद्र सरकारला शिफारस
शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या दुकानादारांवर कारवाई; तीन दुकाने सील, मंत्री विखे पाटीलही बोलले
शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या दुकानादारांवर कारवाई; तीन दुकाने सील, मंत्री विखे पाटीलही बोलले
बाहेरच्यांनी येऊन आमच्या अस्मितेशी लुंग्या सुंग्यांनी खेळू नये अन्यथा ठोकून काढू; शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना शिवप्रेमींचा थेट अन् गर्भित इशारा
बाहेरच्यांनी येऊन आमच्या अस्मितेशी लुंग्या सुंग्यांनी खेळू नये अन्यथा ठोकून काढू; शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना शिवप्रेमींचा थेट अन् गर्भित इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP MajhaSanjay Raut On Eknath Shinde Congress | एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, राऊतांचा दावाSanjay Raut PC | महाराष्ट्र सरकार ढोंगी, दुतोंडी; संजय राऊतांची शिंदे-फडणवीसांवर टीकाABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 15 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karuna Sharma on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार; करुणा शर्मांचा मोठा दावा
'आयुष्मान' योजनेंतर्गत वयोमर्यादा वाढवून रक्कमही दुप्पट करा; केंद्र सरकारला शिफारस
'आयुष्मान' योजनेंतर्गत वयोमर्यादा वाढवून रक्कमही दुप्पट करा; केंद्र सरकारला शिफारस
शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या दुकानादारांवर कारवाई; तीन दुकाने सील, मंत्री विखे पाटीलही बोलले
शिर्डीत भाविकांची लूट करणाऱ्या दुकानादारांवर कारवाई; तीन दुकाने सील, मंत्री विखे पाटीलही बोलले
बाहेरच्यांनी येऊन आमच्या अस्मितेशी लुंग्या सुंग्यांनी खेळू नये अन्यथा ठोकून काढू; शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना शिवप्रेमींचा थेट अन् गर्भित इशारा
बाहेरच्यांनी येऊन आमच्या अस्मितेशी लुंग्या सुंग्यांनी खेळू नये अन्यथा ठोकून काढू; शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना शिवप्रेमींचा थेट अन् गर्भित इशारा
Manikrao Kokate : न्यायालयाकडून न्याय अपेक्षित, सबब नाही, सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात हायकोर्टात धाव; माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढणार?
न्यायालयाकडून न्याय अपेक्षित, सबब नाही, सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात हायकोर्टात धाव; माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढणार?
कोल्हापुरातील जवानाला भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण; सहा महिन्याच्या चिमुकल्या लेकराची भेट आयुष्यभरासाठी अधुरीच राहिली
कोल्हापुरातील जवानाला भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण; सहा महिन्याच्या चिमुकल्या लेकराची भेट आयुष्यभरासाठी अधुरीच राहिली
Supriya Sule : महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला सुप्रिया सुळेंचा कडाडून विरोध; म्हणाल्या, राज्यात 'पोलीसराज' प्रस्थापित करायचाय का?
महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला सुप्रिया सुळेंचा कडाडून विरोध; म्हणाल्या, राज्यात 'पोलीसराज' प्रस्थापित करायचाय का?
कोल्हापूर-सांगली महामार्ग बेमुदत रोखण्याचा इशारा, स्वाभिमानी कार्यकर्त्यांची पहाटेपासून धरपकड; राजू शेट्टींच्या घरी पोलिस पोहोचले
कोल्हापूर-सांगली महामार्ग बेमुदत रोखण्याचा इशारा, स्वाभिमानी कार्यकर्त्यांची पहाटेपासून धरपकड; राजू शेट्टींच्या घरी पोलिस पोहोचले
Embed widget