Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स, एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Live Updates: राज्यासह देशात राजकीय घडामोडींसह अनेक घटना घडत आहेत.

Background
Maharashtra Breaking News Live Updates: जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ काल (22 जानेवारी) भीषण अपघात झाला. यामध्ये 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या अपघाताबाबत आता विविध माहिती समोर येत आहे. तसेच आज हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिन आहे. राज्यासह देशात राजकीय घडामोडींसह अनेक घटना घडत आहेत.
Nashik News : बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, शिवसेना ठाकरे गटाची मागणी
नाशिक : बाळासाहेब ठाकरे यांची आज 99 वी जयंती साजरी होत असताना नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाने बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्वसाधारण बैठकीत झालेल्या ठरावाचे बॅनर शिवसेना मध्यवर्तीय कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आले आहे. नाशिकमध्ये झळकलेले बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
Devyani Pharande : भाजपच्या आमदार देवयानी फरांदे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल
भाजपच्या आमदार देवयानी फरांदे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल.
विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातुन मनसेच्या उमेदवाराने घेतली होती माघार.
मनसेच्या उमेदवाराने माघार घेतल्यानं देवयानी फरांदे यांच्या विजयाचा मार्ग झाला होता सोपा.
विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवाराने माघार घेतल्यानं आभार मानण्यासाठी देवयानी फरांदे राज ठाकरेंच्या भेटीला.























