LIC Policy Maturity Claim : LIC कडे तब्बल 881 कोटी रुपये पडून; तुमचा पैसा सुद्धा यामध्ये आहे का? तपासण्यासाठी 'या' स्टेप्स फाॅलो करा!
LIC Policy Maturity Claim : नियमांनुसार, ज्या पॉलिसींच्या मॅच्युरिटी रकमेवर कोणी दावा केलेला नाही, अशा पॉलिसी दावा न केलेल्या खात्यात जमा केल्या जातात.

LIC Policy Maturity Claim : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ची 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 880.93 कोटी रुपयांची दावा न केलेली मॅच्युरिटी रक्कम आहे. सरकारी माहितीनुसार, एकूण 372,282 पॉलिसीधारकांनी त्यांच्या मॅच्युरिटी बेनिफिटचा दावा केलेला नाही. म्हणजे पॉलिसी मॅच्युअर होऊन 3 वर्ष झाली तरी त्यावर कोणीही दावा केलेला नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या कुटुंबातील कोणीतरी एलआयसी पॉलिसी घेतली आहे, जी मॅच्युअर झाली आहे परंतु पैसे मिळालेले नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही त्या पॉलिसीच्या रकमेवर दावा करू शकता. LIC मध्ये दावा न केलेली मॅच्युरिटी कशी शोधायची हे पाहूया..
दावा न केलेल्या मॅच्युअर पॉलिसी शोधण्यासाठी प्रक्रिया
- LIC वेबसाइट https://licindia.in/home ला भेट द्या
- होमपेजवर ग्राहक सेवा वर क्लिक करा.
- यावर जा आणि पॉलिसीधारकांच्या अनक्लेम्ड रकम पर्याय निवडा.
- पॉलिसी क्रमांक, नाव, जन्मतारीख आणि पॅन कार्ड क्रमांक यासारखे आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
- यानंतर तुम्हाला अनक्लेम मॅच्युरिटी असलेल्या पॉलिसीची माहिती मिळेल.
नियमांनुसार, ज्या पॉलिसींच्या मॅच्युरिटी रकमेवर कोणी दावा केलेला नाही, अशा पॉलिसी दावा न केलेल्या खात्यात जमा केल्या जातात. 10 वर्षे हक्क नसलेली रक्कम राहिल्यास ती ज्येष्ठ नागरिक कल्याण निधीमध्ये टाकली जाते. हा पैसा वृद्धांच्या देखभालीसाठी खर्च केला जातो.
दावा न केलेल्या ठेवीचा दावा कसा करावा?
कोणत्याही एलआयसी कार्यालयातून दावा फॉर्म मिळवा किंवा अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करा. फॉर्म भरल्यानंतर, आवश्यक कागदपत्रे जसे की पॉलिसी दस्तऐवज, प्रीमियम पावत्या आणि लागू असल्यास मृत्यू प्रमाणपत्र संलग्न करा. एलआयसी कार्यालयात कागदपत्रांसह पूर्ण केलेला फॉर्म सबमिट करा. LIC तुमच्या दाव्याचे पुनरावलोकन करेल आणि मंजूर केल्यास, ते तुमची हक्क न केलेली रक्कम जारी करेल.
25 कोटींहून अधिक लोकांकडे LIC पॉलिसी
1956 पर्यंत 154 भारतीय विमा कंपन्या, 16 विदेशी कंपन्या आणि 75 भविष्य निर्वाह कंपन्या भारतात कार्यरत होत्या. 1 सप्टेंबर 1956 रोजी सरकारने या सर्व 245 कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ सुरू केले, म्हणजेच LIC. सध्या 25 कोटींहून अधिक लोकांकडे LIC पॉलिसी आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
