एक्स्प्लोर

Uttamrao Jankar : ईव्हीएम विरोधातील आंदोलनाची धग आता दिल्लीत जाऊन पोहचली; उत्तमराव जानकरांकडून जंतर मंतरवर आंदोलनाचा एल्गार 

Uttamrao Jankar : ईव्हीएम मशीनच्या मुद्द्यावरुन माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर जानकर उद्या 23 जानेवारी रोजी दिल्लीत आंदोलन करणार आहेत.

Uttamrao Jankar नवी दिल्ली : ईव्हीएम मशीनच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar Faction) माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे (Malshiras Vidhan Sabha Constituency) आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी ईव्हीएममध्ये (EVM) छेडछाड करून महायुतीचा (Mahayuti) विजय झाल्याचा गंभीर आरोप याआधी केला आहे. दरम्यान याच मुद्द्यावरुन आमदार उत्तमराव जानकर हे 23 जानेवारी रोजी दिल्लीला मुख्य निवडणूक आयोगाकडे आपला राजीनामा सादर करणार असल्याचे बोललं जात आहे. माळशिरस येथील पोटनिवडणूक तातडीने जाहीर करावी. ही निवडणूक बॅलेट पेपरवर किंवा व्हीव्हीपॅट दिसेल अशा पद्धतीने घेण्याची मागणी त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात केली आहे. 

अशातच उत्तमराव जानकर यांनी आज (22 जानेवारीला)  शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीला पोहोचले आहेत. संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जानकर दाखल झाले आहेत. उद्यापासून जानकर हे EVM विरोधात दिल्लीत आंदोलन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची होत असलेली भेट महत्वाची असल्याचे बोलले जात आहे. 

सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन  ⁠पुढचं धोरण- उत्तम जानकर

या विषयी बोलताना  उत्तम जानकर (Uttam Jankar) म्हणाले की,  ईव्हीएम विरोधात मारकडवाडीत (Markadwadi) उठाव झाला.  
⁠तेच वातावरण राज्यभरात आहे. तर येत्या काळात ⁠दिल्लीची निवडणूक आहे, त्यानंतर गोव्याची निवडणूक आहे. ⁠त्यामुळे आम्ही चोर कुठे पकडायचा हा मुद्दा आहे. ⁠कुठेतरी चोरी पकडलीच जाईल. संजय राऊत यांना जेलमध्ये टाकलं तरी त्यांनी संघर्ष केला. ⁠म्हणून त्यांना भेटायला आलो. ⁠आम्ही इतर पक्षाच्या नेत्यांना भेटणार आहोत. तसेच जंतर मंतरवर अधिवेशनापूर्वी आंदोलन करता येईल का, हे पाहतोय. 25 तारखेला निवडणूक आयोगाचा स्थापन दिवस आहे. ⁠पुढचं धोरण सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन ठरवू.असेही  उत्तम जानकर म्हणाले 

⁠ईव्हीएमच्या जिवावर निवडणूक जिंकणे हा राष्ट्रद्रोह

निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना ⁠उद्या मी भेटणार आहे, ⁠आम्ही भेट घेऊन नंतर सगळे पत्रकार परिषद घेऊ. ⁠कुणी नाही आलं तरी मी एकटा जंतर मंतरवर बसणार आहे. धानोरे गावातील लोकांना प्रश्न होता म्हणून त्यांनी ग्रामसभा घेऊन हात उंचावून मतदान घेतलं. ईव्हीएम विरोधात आम्ही अनेकदिवस आंदोलन करत आहोत. ⁠ईव्हीएमच्या जिवावर निवडणूक जिंकणे हा राष्ट्रद्रोह आहे. ⁠उत्तमराव जानकर ज्या भागातून निवडन आले तिथल्या लोकांनी हे दाखवून दिले आहे. ⁠लढाई देशाची आहे ही लढाई फक्त त्यांची नाही, ⁠लढाई अशीच होते. ⁠लढाईची सुरुवात अशीच होते. दरम्यान ⁠महाराष्ट्राचा उद्रेक लोकांसमोर आणू . ⁠जिंकलेले अजून धक्क्यातून सावरलेले नाहीत आम्ही कसे जिंकलो आणि आम्ही कसे हरलो असे ⁠दोन्ही बाजूंना धक्के बसले असल्याचे ही उत्तम जानकर म्हणाले 

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray: राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
मोठी बातमी : शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना
शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
Maharashtra Budget 2026: देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
Maharashtra Budget 2026 : मेट्रो मार्गांचं जाळं वाढवणार, द्रूतगती मार्गांची उभारणी ते शेतकरी कर्जमाफी आणि स्टार्टअप हब, देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
विकसित महाराष्ट्राच्या दिशेनं पाऊल, मेट्रोचा विस्तार, द्रूतगती मार्गांची उभारणी ते कर्जमाफी, अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा
Maharashtra Budget 2026: गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडणार ते पशूधन ते शेतपाणंद; शेतकरी, ग्रामीण महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पातील 5 मोठ्या घोषणा
गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडणार ते पशूधन ते शेतपाणंद; शेतकरी, ग्रामीण महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पातील 5 मोठ्या घोषणा
Aaditya Thackeray: राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
Embed widget