एक्स्प्लोर
Ranji Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी दिग्गजांनी रणजीच्या पहिल्याच सामन्यात नांग्या टाकल्या; रोहित, यशस्वी, शुभमनने किती धावा केल्या?
रणजी ट्रॉफीच्या सहाव्या फेरीत भारतीय संघातील स्टार खेळाडू रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल हे फेल ठरले. हे तिघेही भारतीय संघासाठी टॉप-3 मध्ये खेळतात.

Rohit Sharma Yashasvi Jaiswal Shubman Gill Ranji Trophy
1/7

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा गेल्या काही काळापासून रेड बॉल क्रिकेटमध्ये खूपच खराब फॉर्ममध्ये जात आहे. आपला फॉर्म परत मिळवण्यासाठी आणि पुन्हा रुळावर येण्यासाठी, रोहित शर्मा देशांतर्गत क्रिकेटकडे वळला आहे.
2/7

रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करणाऱ्या रोहित शर्माकडून चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या, पण रोहित शर्मा काही खास कामगिरी करू शकला नाही आणि फक्त 3 धावा करून बाद झाला. रोहितने इथेही त्याच्या चाहत्यांना निराश केले आहे.
3/7

रोहित शर्मा व्यतिरिक्त या सामन्यात त्याच्यासोबत सलामीला आलेला यशस्वी जैस्वाल देखील अपयशी ठरला. या सामन्यात जयस्वालने फक्त 4 धावा केल्या.
4/7

या सामन्यात रोहित शर्माला जम्मू आणि काश्मीरचा गोलंदाज उमर नझीरने बाद केले. तर आकिब नबीने जैस्वालला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
5/7

तर भारताकडून कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा शुभमन गिल रणजी ट्रॉफीमध्येही खेळत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली पंजाब संघ मैदानात उतरला. कर्नाटकविरुद्ध फक्त 4 धावा करून गिल बाद झाला.
6/7

यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा खेळताना दिसेल. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी स्टार खेळाडूंचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे.
7/7

भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळेल. या सामन्यापूर्वी रोहित शर्मा आणखी तीन सामने खेळेल. जिथे रोहित शर्मा इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळेल. या मालिकेत सर्वांच्या नजरा त्याच्या फॉर्मवर असतील.
Published at : 23 Jan 2025 11:37 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
कोल्हापूर
भारत
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
