एक्स्प्लोर

लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका

लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी आहे असा इशाराच रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारला दिला.

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांपूर्वी लाडकी बहीण योजनेचा (Ladki bahin yojana) सर्वत्र बोलबोला दिसून आला. त्यामुळे, महिलांनीही या योजनेचा लाभ थेट बँक खात्यात मिळाल्याने महायुती सरकारला बहुमोल मतदान करत महायुतीला विजयी केलं. महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी लाडकी बहीण योजनेचा परिणाम झाला अन् घवघवीत यश मिळाल्याचं म्हटलं आहे. मात्र, निवडणुकांच्या निकालानंतर सरकार स्थापन होताच राज्य सरकारकडून या योजनेसाठी अपात्र असतानाही पात्र ठरुन लाभ घेणाऱ्या महिलांना थेट इशारा देण्यात आला आहे. अपात्र महिलांनी योजनेतून स्वत:हून बाहेर पडाले, सरकारकडे पैसे जमा करावे असेही सांगण्यात आलंय. महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी महिलांकडून पैसे परत घेतले जातील असे वक्तव्य केलं होतं. मात्र, त्यांनी स्पष्टीकरण देताना लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेतले जाणार नसून ज्यांना परत कारायचे आहेत, त्यांना ते सरकारी तिजोरीत जमा करता येतील असे म्हटलं आहे. आता, त्यावरुनच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी थेट राज्य सरकारला दम भरला आहे. 

लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी आहे असा इशाराच रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारला दिला. स्वतःला सख़्खे लाडके भाऊ म्हणवून घेणारे आता सावत्र झाले. बहिणीची ओवाळणी परत घेणारं फसव महायुतीचे सरकार असल्याची टीकाही रोहिणी खडसेंनी केलीय.

लोकसभा निवडणुकीमध्ये जे जनमत महायुतीच्या विरोधामध्ये होतं ते जनमत काहीही करून पलटवायचं आणि मतं मिळवायची ह्या एकाच हेतूने विधानसभा निवडणुकीच्या आधी अनेक प्रलोभन देणाऱ्या योजना सरकारच्या वतीने लोकांसाठी जाहीर करण्यात आल्या. त्या योजनांमध्ये प्रामुख्याने लाडकी बहिण योजना, तीर्थयात्रा योजना, शेतकऱ्यांना वीज बिल माफीची योजना अशा एक ना अनेक योजनांचा समावेश करण्यात आला. एकीकडे प्रचाराच्या जाहिरातीसाठी सरकारी तिजोरीतून वारेमाप खर्च सुरू असताना दुसरीकडे या योजनांच्या माध्यमातून भविष्यातील आर्थिक नियोजनाचा कसलाही विचार न करता फक्त योजना अंमलात आणून मतांची गोळाबेरीज लावून घ्यायची आणि निवडणुका जिंकायच्या हा एकच उद्देश. त्यात त्यांना यश देखील मिळालं. परंतु ज्या लाडकी बहीण योजनेमुळे आज महायुती सरकार सत्तेवर आलं. ज्या माझ्या माता भगिनींनी कुठलाही विचार न करता महायुतीच्या उमेदवारांना  भरघोस मतदान केलं. आज त्यांचीच फसवणूक करण्याचा डाव सरकारने मागील काही दिवसांपासून आखल्याची टीका रोहणी खडसे यांनी केली आहे. 

लाडक्या बहिणींच्या जीवावर निवडणुका जिंकल्या 

निवडणुकीपूर्वी कुठल्याही आर्थिक नियोजनाशिवाय केवळ मतांच्या राजकारणासाठी वापरल्या गेलेल्या या योजनांमुळे आता सरकार चांगलंच अडचणीत आलं आहे. ज्यांच्या जीवावर निवडणुका जिंकल्या त्या युतीतील नेत्यांना आता या योजनेचा आर्थिक भार सोसवेनासा झालेला आहे आणि त्यामुळेच त्यांनी माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे कसे कमी करता येतील, त्यांना अपात्र कसं करता येईल, त्यांना घाबरवून- धमकावून या योजनेपासून कशाप्रकारे दूर ठेवता येईल ह्यासाठी ना ना प्रकारच्या क्लुपत्या लढवायला सुरुवात केली आहे. त्यासाठी महायुतीतील मंत्र्यांची सध्या चांगलीच चढाओढ सुरू असल्याचं पाहिला मिळत आहे, असे म्हणत अनेक नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

आदिती तटकरेंवर बोचरी टीका

उदाहरण द्यायचं तर माजी मंत्री छगन भुजबळ साहेब यांचं देता येईल. भुजबळ साहेब म्हणतात… आम्ही दंडासहित रक्कम वसूल करू तर अजित दादा म्हणतायत ज्यांचे अडीच लाख रुपयांच्यावरचे उत्पन्न आहे त्यांनी तात्काळ या योजनेतून माघार घ्यावी. महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री यांची परिस्थिती दुष्काळात तेरावा महिना अशी झालीय. मंत्री तटकरे कधी म्हणतायत की आम्ही पैसे परत घेणार नाहीत, कधी म्हणताय पैसे परत घेतले जातील तर कधी म्हणतायत की ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अश्या लाडक्या बहिणींनी स्वतः लाभ घेणे थांबवावे. तर कधी म्हणतायत केसरी आणि पिवळ रेशनिंग कार्ड असलेल्या महिलांना अडचण नाही पण इतर महिलांचे पैसे तक्रारी आल्या तर परत घेऊ. एकंदरीतच काय तर महिला बालकल्याण खात्याच्या मंत्र्यांची स्वतःजवळ मंत्री पद असून देखील.. असून घोटाळा आणि नसून खोळंबा अशी गत झाली आहे, अशी बोचरी टीका रोहणी खडसेंनी आदिती तटकरेंवर केलीय.  

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वारेमाप पैसा उधळण्याच्या स्वभावामुळे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अर्थखात्याच्या चुकीच्या नियोजनामुळे जे अर्ज करतील त्यांना लाडकी बहीण योजनेतून पैशांच सर्रास वाटप केलं. केवळ मतं आणि आता पैसे द्यायची वेळ आली की सरकारी तिजोरीत नुसताच ठणठणाट.. त्यातच सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणुकीपूर्वी आपल्या भाषणातून 2100 रुपये सरकार आल्यावर देऊ अशी घोषणा देखील करत राहिले. त्यांच्या या आगाऊ घोषणाबाजीमुळे अजित पवारांची मात्र राज्याच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे पैशांची जुळवा जुळव करताना  तारांबळ उडाली आहे. त्यामुळेच अजित पवारांनी खाजगीत सूर आळवला आहे की आपण योजनेची पैसे वाढवून देण्याची घोषणा कधी केलीच नाही. त्यामुळे योजनेचे अधिकचे पैसे देऊ कसे? असे म्हणत रोहणी खडसेंनी अजित पवारांनाही लक्ष्य केलं.

गाठ शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी- खडसे

दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत त्यामुळे आदिती तटकरे यांच्या समोर प्रश्न आहे. आता जर या योजनेला नियमावलींची कात्री लावली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गुलाबी रंगात न्हाहून निघालेल्या अजितदादाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लाडक्या बहीणींची मतं मागायची तरी कशी? आणि कोणत्या तोंडाने ? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकर्ता म्हणून माझा या सरकारला निर्वाणीचा इशारा आहे…खबरदार.. लाडक्या बहीण योजनेतील माझ्या एकाही भगिनीला योजनेपासून वंचित ठेवलं तर.. गाठ तुमची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत आहे, असा इशाराच रोहिणी खडसेंनी दिला आहे. 

हेही वाचा

अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pushpak Express Accident : अपघात नेमका कसा झाला? पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशांची EXCLUSIVE माहितीPushpak Express Train Accident : रेल्वेने 11 जणांना चिरडलं, आतापर्यंत नेमकं काय काय घडलं?Jalgaon Train Accident | पुष्पक एक्सप्रेसला आग, उड्या मारल्या, बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलंJalgaon Train Accidentआग लागल्याच्या भीतीने चालत्या गाडीतून उड्या मारल्या,बंगळुरु एक्प्रेसने चिरडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Embed widget