Sharad Pawar - Ajit Pawar :पुण्यात राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर, पवारांच्या शेजारी दादांची खूर्ची!
Sharad Pawar - Ajit Pawar :पुण्यात राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर, पवारांच्या शेजारी दादांची खूर्ची!
वसंत दादा शुगर इंस्टिट्यूटची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडते आहे आणि त्याचबरोबर या गणित हंगामात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या साखर कारखान्यांना पुरस्कार देखील दिले जाणार आहेत आणि त्यासाठीची ही बैठक व्यवस्था आपण पाहतो आहोत या व्हीएसआय चे अध्यक्ष आहेत शरद पवार आणि उपाध्यक्ष आहेत दिलीप वळसे पाटील आणि इतर विश्वस्तांमध्ये समावेश आहे तो अजित पवार आणि इतर त्यांचा आणि आपण या ठिकाणी जर बैठक व्यवस्था पाहिली तर शरद पवारांच्या अगदी उजव्या बाजूला अजित पवार असणार आहेत डाव्या बाजूला दिलीप वळसे पाटील असणार आहेत त्यांच्या डाव्या बाजूला विजय सिंह मोहिते पाटील असणार आहेत त्यानंतर जयप्रकाश दांडेगावकर त्यानंतर विशाल पाटील पांडुरंग पाटील आणि दिलीपराव देशमुख त्यानंतर या बाजूला इतर विश्वस्त जे आहेत राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील असणार आहेत अजित पवारांच्या त्यांच्या बाजूला जयंत पाटील, त्यानंतर इंद्रजीत मोहिते, बीबी ठोंबरे, हर्षवर्धन पाटील आणि बाबासाहेब पाटील, तर हा राजकीय कार्यक्रम नाही हे तर सर्वांना ठाऊक आहे. राज्यातील साखर उद्योगाशी संबंधित नेते आणि उद्योजक या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. शरद पवार या संस्थेचे अनेक वर्ष अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे साखर उद्योगाशी संबंधित विषयांचा या कार्यक्रमामध्ये ओहापो होतो, नवीन तंत्रज्ञान कोणता आत्मसात करायचं, कोणती धोरण आखायची याबद्दल या कार्यक्रमामध्ये चर्चा होते, मात्र या ठिकाणी ही जी बैठक व्यवस्था आहे, त्यामुळे राजकीय रंग देखील या कार्यक्रमाला असणार आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार, शरद पवारांपासून वेगे झाल्यानंतर दोन्ही नेते फारसे एकत्र पाहायला मिळालेले नाहीत किंवा एकत्र एका स्टेजवरती जरी आले तरी दोघं एकमेकांशी बोलताना किंवा एकमेकांची संवाद साधताना फारस दिसून येत नाही मात्र या ठिकाणी शरद पवारांच्या अगदी बाजूला अजित पवारांची ही बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसण्याच टाळलं. आधी जी बैठक व्यवस्था करण्यात आली होती त्या बैठक व्यवस्थेत अजित पवार हे शरद पवारांच्या शेजारी बसणार होते. मात्र आता त्यांच्या जागी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील बसलेत.