Pushpa 2 Box Office Collection: दीड महिना बॉक्स ऑफिसवर राज्य, पण आता हललं साम्राज्य; रिलीजच्या 49व्या दिवशीही 'पुष्पा 2'नं रचला नवा रेकॉर्ड
Pushpa 2 Box Office Collection Day 49: बॉक्स ऑफिसवर राज्य केल्यानंतर, अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2: द रूल' आता बॉक्स ऑफिसवरुन हळूहळू काढता पाय घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता पुष्पा 2 च्या कलेक्शनमध्ये सतत घट होत असल्याचं पाहायला मिळतंय.
Pushpa 2 Box Office Collection Day 49: अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) स्टारर 'पुष्पा 2: द रूल'नं (Pushpa 2 The Rule) गेल्यावर्षी 5 डिसेंबरला थिएट्रिकल रिलीजनंतर बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) पुरता धुरळा उडवून दिला होता. अॅक्शन, डायलॉग्सचा भरपूर मसाला असलेल्या पुष्पाभाऊच्या हटके अंदाजानं फक्त देशातच नाहीतर, जगभरात खळबळ उडवून दिली. रिलीजच्या सातव्या आठवड्यातही पुष्पा 2 प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणण्यात यशस्वी ठरली आहे. दरम्यान, आता हळूहळू पुष्पा 2 जरी बॉक्स ऑफिसवरुन काढता पाय घेत असेल, तरीसुद्धा इतर फिल्म्सच्या सात आवड्यातील कामगिरीपेक्षा पुष्पाचा परफॉर्मन्स सातव्या आठवड्यातही दमदार आहे.
'पुष्पा 2: द रूल'ची 49 दिवसाची कमाई किती?
भारतीय चित्रपटांच्या इतिहासात 'पुष्पा 2: द रूल'नं खरोखरंच स्वतःला वाईल्ड फायर म्हणून सिद्ध केलं आहे. देशातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रम पुष्पा 2 नं यापूर्वीच केला आहे. अशातच आता दीड महिन्यांहून अधिक काळ लोटल्यानंतरही 'पुष्पा 2' अजूनही कमाई करत आहे. दरम्यान, पुष्पा 2 च्या कलेक्शनमध्ये अजूनही खूप घट पाहायला मिळत आहे. कोट्यवधींची कमाई करणारा पुष्पा 2 आता लाखोंवर येऊन पोहोचला आहे. असं असलं तरीसुद्धा पुष्पा 2 येत्या काही दिवसांतच 1250 कोटींचा आकडा पार करण्यात नक्की यशस्वी ठरेल, असं सांगितलं जात आहे. अशातच 'पुष्पा 2'च्या कमाईवर एक नजर टाकुयात...
- अल्लू अर्जुन स्टारर या चित्रपटानं पहिल्या आठवड्यात 725.8 कोटी रुपये कमावले होते.
- दुसऱ्या आठवड्यात 'पुष्पा 2: द रुल' ने 264.8 कोटी रुपये कमावले.
- तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटानं 129.5 कोटी रुपये कमावले.
- चौथ्या आठवड्यात 'पुष्पा 2: द रुल' ने 69.65 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
- 'पुष्पा 2: द रुल' चे पाचव्या आठवड्यात कलेक्शन 25.25 कोटी रुपये होतं.
- या चित्रपटानं सहाव्या आठवड्यात 9.7 कोटी रुपये कमावले.
- या चित्रपटाने 44 व्या दिवशी 95 लाख, 45 व्या दिवशी 1.1 कोटी, 46 व्या दिवशी 1.5 कोटी, 47 व्या दिवशी 65 लाख आणि 48 व्या दिवशी 65 लाखांची कमाई केली.
- आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या 49 व्या दिवशीच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
सॅकॅनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2: द रुल' ने रिलीजच्या 49 व्या दिवशी 50 लाख रुपये कमावले आहेत. यासह, 'पुष्पा 2: द रुल' ची 49 दिवसांची कमाई आता 1230.05 कोटी रुपये झाली आहे.
पुष्पा 2 ला पछाडणार 'स्काय फोर्स'
'पुष्पा 2: द रुल' बॉक्स ऑफिसवर राज्य करत असून दीड महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. यादरम्यान, अनेक चित्रपट आले आणि गेले पण 'पुष्पा 2: द रुल' चं सिंहासन कुणीही हलवू शकलेलं नाही. चित्रपटाची कमाई आता निःसंशयपणे कमी होत आहे. पण, 49 व्या दिवशी त्यानं 1230 कोटींचा टप्पा ओलांडला आणि एक नवा विक्रम रचला. असं करणारा हा पहिलाच चित्रपट आहे. दरम्यान, आता स्काय फोर्स चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. अक्षय कुमार स्टारर या चित्रपटाबद्दल बरीच चर्चा आहे आणि तो पाहता असं दिसतं की, हा चित्रपट 'पुष्पा 2: द रुल' सोबत येईल. 'पुष्पा 2: द रूल' 'स्काय फोर्स'ला टक्कर देऊ शकेल की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :