एक्स्प्लोर

Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी

Eknath Shinde: सन 2006 साली शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्यावर ठाणे जिल्हा संपर्क नेते ही जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी देसाई यांच्या या नियुक्तीने एकनाथ शिंदे हे नाराज झाले होते.

मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज झाले की आपल्या दरे गावी भेट देतात. आपली नाराजी अप्रत्यक्षपणे ते व्यक्त करतात, त्याची राजकीय वर्तुळातही चांगलीच चर्चा होते. सध्या महायुती (Mahayuti) सरकारमध्ये असो किंवा यापूर्वीच्या युती सरकारमध्ये असो, एकनाथ शिंदेंची नाराजी सातत्याने दिसून आली आहे. सन 2005 ते 2025 या 20 वर्षांच्या राजकीय कारकि‍र्दीत एकनाथ शिंदे 9 वेळा नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी, अनेकदा ते आपल्या दरे गावी गेल्याचंही दिसून आलं. सर्वप्रथम ते 2005 मध्ये नाराज झाले होते. एकनाथ शिंदे यांच्यावर 2005 साली शिवसेना (Shivsena) ठाणे जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांनी  झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत महापौरपदाचा मान हा ठाणे शहर की वागळे इस्टेट पट्ट्याला दयायचा यावरून वाद झाला होता. तेव्हा सर्वात प्रथम एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा होती. तेव्हा महापौरपद  नेमके  कोणाला द्यायचे, यावर शिवसेनेत दोन गट पडले होते. अखेर मोठया वादानंतर तेव्हा महापौर पदाचा मान हा राजन विचारे यांना मिळाला होता. 

सन 2006 साली शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्यावर ठाणे जिल्हा संपर्क नेते ही जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी देसाई यांच्या या नियुक्तीने एकनाथ शिंदे हे नाराज झाले होते. शिंदे यांची नाराजगी जास्त वाढू नये म्हणून त्यावेळी तेव्हाचे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी 2007 ला महापालिका निवडणुकीच्या तोंडावर  देसाई यांची नियुक्ती रद्द केली. पुढे 2009 ला  ठाणे लोकसभा  मतदारसंघातून विजय चौगुले यांचा पराभव  झाला. त्यानंतर अखंड असलेल्या ठाणे जिल्ह्याची शिवसेनेत दोन भागात  विभागणी करण्यात आली. यात  ठाणे आणि कल्याण असे  शिवसेनेत दोन स्वतंत्र जिल्हाप्रमुख नेमण्यात आले. तेव्हा ठाण्याच्या जिल्हाप्रमुख पदी एकनाथ शिंदे आणि कल्याणचे प्रभारी जिल्हाप्रमुख पदी गोपाल लांडगे यांची नियुक्ती शिवसेना नेतृत्वाने केली होती. त्यावेळी जिल्हाप्रमुखपदाच्या झालेल्या विभागणीवरना एकनाथ शिंदे हे नाराज होते. तेव्हाही शिंदे यांची नाराजगी दूर करण्यासाठी त्यांच्याकडे अखंड ठाणे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून पक्षाने जबाबदारी दिली. 

राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ  शिंदे नाराज असल्याची चर्चा सातत्याने होत होती. त्यातच पृथ्वीराज चव्हाण यांनी शिंदे यांना मंत्रिपदाची ऑफर दिल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात होत होती. मात्र, त्यावेळीही एकनाथ शिंदे यांची नाराजगी दूर करण्यात तत्कालीन शिवसेना नेतृत्वाला यश आले होते. पुढे 2014 मध्ये  झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा ही युती तुटली. त्यावेळी, विधानसभेचे  विरोधी पक्षनेतेपद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आले. मात्र, अवघ्या एका  महिन्यातच शिवसेना ही भाजपा बरोबर राज्यातील सत्तेत सहभागी झाली. तेव्हा शिवसेनेच्या वाट्याला आलेले महत्वाचे सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आले. परंतु एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्व वाढू नये म्हणून त्यावेळी शिवसेनेने जाणीवपूर्व उपमुख्यमंत्री पद स्वीकारले नव्हते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात तेव्हा होत होती. तेव्हा उपमुख्यमंत्री पद न मिळाल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याचे बोलले जात होते. पण ही नाराजगी दूर करण्यात तत्कालीन पक्ष नेतृत्वाला तेव्हा यश आले होते. 

ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर नाराजी

पुढे 2019 ला  घडलेल्या राजकीय उलथा पालथीमध्ये शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबरवर जाऊन राज्यात सरकार स्थापन केले. महाविकास आघाडीच्या  या सरकारमध्ये सुरुवातीला मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात येईल अशी चर्चा होती. मात्र, तेव्हा मुख्यमंत्री पदावर स्वतः खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारल्यामुळे तेव्हा एकनाथ शिंदे हे नाराज होते. परिणामी तेव्हाही  शिंदे यांची  ही नाराजगी दूर करण्यासाठी शिवसेनेकडून त्यांना नगर विकास या  महत्त्वाच्या खात्याची  जवाबदारी  सोपविण्यात आली. मात्र, त्यानंतरही सातत्याने एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षात नाराज असल्याची चर्चा होतच होती. त्यातच 2022 ला झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेना पक्षाकडून एकनाथ शिंदे यांना निवडणूक रणनीती पासून लांब ठेवण्यात आले. या घटनेनंतर एकनाथ शिंदे यांची नाराजी वाढतच गेली. त्यानंतर  अवघ्या पंधरा दिवसानंतरच झालेल्या विधानपरिषदेच्या  निवडणुकीच्या निकालाच्या रात्री एकनाथ शिंदे यांचे  ऐतिहासिक असे बंड  झाले. या बंडा नंतर  शिवसेना फुटून त्याची दोन पक्षात विभागणी झाली. या बंडा नंतर भाजपाने एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत त्यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली.

विधानसभा निवडणुकांच्या जागावाटपावेळी नाराजी

लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेला किती जागा मिळाव्या यावरून चर्चा सुरू असताना देखील एकनाथ शिंदे शेवटपर्यंत 15 जागांसाठी अडून होते. त्यासाठी थेट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा करून त्यांनी लोसभेला 15 जागा मिळवल्या. त्याचप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील जास्त जास्त जागा मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे शेवटपर्यंत वाटाघाटी करतच होते. या दोन्ही निवडणुकांच्या जागा वाटपावरून शिंदे नाराज असल्याची जोरदार चर्चा होती. दरम्यान अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाचा कारभार एकनाथ शिंदे यांनी सांभाळला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुका ही महायुतीने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या. या निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व असे यश मिळाले. त्यात सर्वाधिक जागा या भाजपाच्या निवडून आल्या. परिणामी भाजपने मुख्यमंत्री पदावर दावा सांगितला. तेव्हा भाजपाकडे मुख्यमंत्री पद जाणार असल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. अनेक दिवस चर्चेत गेल्यानंतर उपमुख्यमंत्री पद तरी एकनाथ शिंदे स्वीकारणार का? याबाबत अगदी शपथ विधीच्या काही तास आधी पर्यंत शिंदे नाराज असल्याने उपस्थित राहणार नाहीत अशी चर्चा होती. मात्र, शेवटी ते उपस्थित राहिले आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या काळात ते अनेकवेळेस अचानक गावी जाऊन बसले. त्यामुळे त्यांची नाराज उघड होत होती.

पालकमंत्रीपदावरुन नाराजी

दरम्यान, आता पालकमंत्रीपदांच्या वाटपानंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे नाराज झाल्यामुळे आपल्या दरे या मूळगावी गेल्याचं सांगण्यात आलं. तर, शिंदेंच्या नाराजीनंतर 2 जिल्ह्यातील पालकमंत्रीपदांच्या नावांना स्थगिती देण्यात आली आहे. एकूणच, गेल्या 19 वर्षांतील राजकीय कार्यकाळात एकनाथ शिंदे 9 वेळा नाराज झाल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान, दरवेळी शिंदेंची नाराजी दूर करुन त्यांना सक्रीय करण्यात आल्याचंही यावरुन दिसून येते. 

हेही वाचा

बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?

व्हिडीओ

Nagpur Winter Season : चहापानाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहणार
MVA PC Winter Session :  ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Smriti Mandhana: स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
Winter Session: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
Embed widget