Job Majha : नोकरी शोधताय? राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालयात नोकरीच्या संधी
Job Majha : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 208 जागांची मोठी भरती निघाली असून त्यासाठी अर्ज कसा करायचा हे जाणून घ्या...
मुंबई: अनेकजण सध्या चांगल्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे
एकूण 208 जागांसाठी भरती होत आहे.
पहिली पोस्ट – वैद्यकीय अधिकारी
एकूण जागा – 6
शैक्षणिक पात्रता – MBBS
दुसरी पोस्ट – वैद्यकीय अधिकारी (बालरोगतज्ज्ञ)
एकूण जागा – 2
शैक्षणिक पात्रता – MD/ ONB/ OCH
तिसरी पोस्ट – ANM
एकूण जागा – 166
शैक्षणिक पात्रता – ANM कोर्स
चौथी पोस्ट – स्टाफ नर्स
एकूण जागा – 34
शैणक्षिक पात्रता - 12वी उत्तीर्ण आणि GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
नोकरीचं ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट - arogya.maharashtra.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर नोकरीविषयक संधीवर क्लिक करा. त्यात तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे महानगरपालिका येथे कंत्राटी तत्वावर पदभरती वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर Document वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय
पोस्ट - विभागीय तांत्रिक तज्ज्ञ (Divisional Technical Expert)
यात पदांच्या एकूण 12 जागांवर भरती होत आहे. या अंतर्गत मुंबईत 3, कोकण, नागपूर आणि अमरावती विभागासाठी प्रत्येक 1, पुणेसाठी 2, औरंगाबाद, नाशिक विभागासाठी प्रत्येकी 2 जागा आहेत.
शैक्षणिक पात्रता – B.E./B.Tech/B.Arch/MSC (Environment) मध्ये बॅचलर डिग्री
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2022
महत्त्वाच्या बातम्या :