Mosambi News : मोसंबीच्या आगारातला शेतकरी संकटात, जालना जिल्ह्यात मोसंबीला फळगळीचा फटका, हेक्टरी एक लाखांची मदत देण्याची मागणी
मोसंबी (Mosambi) पिकांवर देखील अतिवृष्टीचा मोठा परिणाम झाला आहे. फळगळीने जालना (Jalna) जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
![Mosambi News : मोसंबीच्या आगारातला शेतकरी संकटात, जालना जिल्ह्यात मोसंबीला फळगळीचा फटका, हेक्टरी एक लाखांची मदत देण्याची मागणी Mosambi producing farmers in Jalna district in distress Mosambi News : मोसंबीच्या आगारातला शेतकरी संकटात, जालना जिल्ह्यात मोसंबीला फळगळीचा फटका, हेक्टरी एक लाखांची मदत देण्याची मागणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/01/e78d2003cbb7f4469bb0b4b629060eea1664602197409339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mosambi News : सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. काही ठिकाणी पाऊस पडत आहे. मात्र, राज्यातील काही भागात अतिवृष्टी झाली आहे. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. मोसंबी (Mosambi) पिकांवर देखील अतिवृष्टीचा मोठा परिणाम झाला आहे. फळगळीने जालना (Jalna) जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
जालना जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील मोसंबी बागांना फटका
अतिवृष्टीने पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मराठवाड्यात मोसंबीच्या आंबिया बहार फळगळीने संकटात आला आहे. जालना जिल्ह्यात शेकडो हेक्टरवरील मोसंबी बागांना फळगळीचा फटका बसला आहे. राज्यासह मराठवाड्यात अतिवृष्टीने अनेक फळबागांना मोठा फटका बसला आहे. मोसंबीची सर्वाधिक लागवड जालना जिल्ह्यात केली जाते. याच जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी अतिवृष्टीने संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील मोसंबी बागांना आता फळगळीचा सामना करावा लागत आहे. या संकटामुळं मोसंबी उत्पादक शेतकरी चांगलेच धास्तावलेत. बुरशीजन्य रोगांमुळं ऐन दिवाळीच्या तोंडावर हाताशी आलेलं उत्पन्न वाया जात असल्याचे शेतकऱ्यांना पाहावं लागत आहे.
सरकारनं त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी
मोसंबीची मोठ्या प्रमाणावर सध्या फळगळ होत आहे. दसरा दिवाळीच्या मुहूर्तावर आंबिया बहाराची फळे बाजारात आणून फायदा होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, फळगळीमुळं शेतकरी चिंतेत आहेत. हाती आलेला घास निसर्ग हिरावून घेतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. फळगळीची नेमकी कारणं काय आहेत, याबाबत तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, अतिवृष्टीमुळं फळांवर रोग पडत आहे. तसेच फळांची गळ देखील होत आहे. बागेत जास्त पाणी झाल्यानं बागेवर प्रादुर्भाव होत आहे. जवळपास 80 टक्के नकुसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळं आम्हाला त्वरीत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हेक्टरी एक लाख रुपयांची मदत करावी
एका झाडावर सरासरी एक क्विंटलचा माल निघतो. आज जर परिस्थिती बघितलं तर 10 ते 20 किलोच माल शिल्लक राहिला असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. आता शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं असा प्रश्न उपस्थित होत आहे. मोसंबी पिकाचा विमा भरला असूनही कंपन्यांकडून विम्याचा परतावा मिळत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. शासनानं हेक्टरी एक लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी दिली आहे. मोसंबीवरच आमचा उदरनिर्वाह आहे. पोटच्या लेकरांच्या पलीकडे या झाडांची देखभाल केली आहे. तरी देखील आमचं मोठं नुकसान झालं असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)