एक्स्प्लोर

मराठवाड्यात अतिवृष्टीचा फटका, मोसंबीला कवडीमोल भाव, शेतकऱ्यांनी चालवली बागांवर कुऱ्हाड 

औरंगाबाद, बीड आणि जालना या भागाला मोसंबीचा हब म्हणून ओळखले जाते. त्याच मोसंबीचा हब असलेल्या  बीड जिल्ह्यातल्या किनगाव मध्ये शेकडो शेतकरी आता आपल्या मोसंबीच्या बागांवर कुऱ्हाड चालवत आहेत.

बीड : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वसामान्य शेतकरी हैराण असतानाच अतिवृष्टीचा फटका आता फळबागांना बसतो आहे. औरंगाबाद, बीड, जालना या भागात मोठ्या प्रमाणावर मोसंबीच्या बागा आहेत. मात्र या मोसंबी बागांवर अतिवृष्टीमुळे मंगू रोग पडल्याने उत्पादन तर घतलेच आहे. शिवाय भावही घसरले आहेत. शेतकऱ्याला प्रति क्विंटल मागे केवळ नऊशे ते हजार रुपये एवढाच भाव मिळत आहे.

औरंगाबाद, बीड आणि जालना या भागाला मोसंबीचा हब म्हणून ओळखले जाते. त्याच मोसंबीचा हब असलेल्या  बीड जिल्ह्यातल्या किनगाव मध्ये शेकडो शेतकरी आता आपल्या मोसंबीच्या बागांवर कुऱ्हाड चालवत आहेत. बदलते हवामान आणि मोसंबीला मिळणारा कमी भाव, यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. याच चिंतेतून शेतकऱ्यांनी चक्क मोसंबीच्या बागा तोडण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या गावात शेकडो एकरांवर मोसंबीची लागवड करण्यात आली होती. त्याच ठिकाणच्या बागा आता जमीनदोस्त झाल्या आहेत. 

गेल्या दहा वर्षापासून लहू चाळक यांनी आपल्या दोन एकर मोसंबी बागेतून लाखोंचे उत्पन्न मिळवलं. मात्र गेल्या दोन वर्षापासून दहा ते बारा रुपयाचा भाव मोसंबीला मिळाला आणि त्यातही अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाडावर होत असल्याने मोठ्या प्रमाणात फळांची नासाडी झाली. बागेवर झालेला खर्चही निघत नसल्याने त्यांनी एक एकर बागेवर कुऱ्हाड चालवली आणि हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या या झाडांना ते स्वतः बांधावर फेकून देत आहेत.

मोसंबीच्या बागा स्वतःच्या हातानं उद्ध्वस्त करणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था दैनिय आहे. तीच अवस्था उभा असलेल्या आणि  मोसंबीच्या झाडाला फळ लगडलेल्या शेतकऱ्यांची देखील आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील औरंगपूर येथील शेतकरी विजय शिंदे यांनी 7 वर्षांपूर्वी आपल्या तीन एकरमध्ये मोसंबीची बाग लावली होती. मात्र गेल्या तीन वर्षांपासून सतत अतिवृष्टीमुळे पिकाचं उत्पादन घटलं आहे, तर यावर्षी अति पाऊस झाल्याने आणि मंगु रोग पडल्याने 15 ते 16 टन होणारी मोसंबी आता 7 टनावर आली असल्याचे विजय शिंदे या शेतकऱ्याने सांगितले. 
 
औरंगाबादच्या पाचोड मोसंबीची मार्केमध्ये आवक घटली असून, रोज 500 टन येणाऱ्या याच मार्केटमध्ये आता 20 टन मोसंबीसुद्धा येत नसल्याचं पाहायला मिळत आहे..

मेहनतीनं वर्षभर मोसंबीच्या बागा जोपासायचा. फळांना आपल्या मुलाप्रमाणं जपायचं. लहरी निसर्ग आणि वेगवेगळ्या रोगांपासून वाचवण्याचा प्रयत्न करायचा. शेवटी एवढं सगळं करुन मोसंबी मार्केटमध्ये विक्रीला न्यायची आणि हाती निराशा घेऊन यायची हेच मोसंबी मोसंबी पिकाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे सध्याचं वास्तव आहे. त्यात सरकार कडूनही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मोसंबी शेतकऱ्यांना तोकडी मदत मिळाली आहे. त्यामुळे शेतकरी अधिकच संकटात सापडला असल्याचे मेहराज सय्यद या मोसंबी व्यापऱ्यांने सांगितले.

इतर महत्वाच्या बातम्या 

Prithvi Akash Ambani Birthday : देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबातील लहान सदस्याचा पहिला वाढदिवस साजरा होणार मोठ्या धुमधडाक्यात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Gold Rate Today:एकीकडे रुपया कमजोर, शेअर बाजारात घसरण, दुसरीकडे सोने -चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या दर
रुपया कमजोर, बाजारात घसरण,गुंतवणूकदारांची सोने चांदीला पसंती, दरात तेजी, जाणून घ्या दर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh Protest : जरांगेंनी हात जोडले, एसपींनी विनंती केली;अखेर 2 तासांनी देशमुख खाली आलेDhananjay Deshmukh Beed Protest:मनोज जरांगेंच्या विनंतीला प्रतिसाद, धनंजय देशमुख टाकीवरुन खाली उतरलेDhananjay Deshmukh Beed Protest : धनंजय देशमुख यांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन; मनोज जरांगे आंदोलनस्थळी दाखल100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Gold Rate Today:एकीकडे रुपया कमजोर, शेअर बाजारात घसरण, दुसरीकडे सोने -चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या दर
रुपया कमजोर, बाजारात घसरण,गुंतवणूकदारांची सोने चांदीला पसंती, दरात तेजी, जाणून घ्या दर
Santosh Deshmukh : मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये  महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
Sick Leave : सावधान... आजारी असल्याचं सांगून सुट्टी घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट, कंपन्यांकडून डिटेक्टिव्ह एजन्सीची नेमणूक
वैद्यकीय रजा घेणाऱ्यांमागं खासगी कंपन्यांकडून गुप्तहेर, नेमकं काय घडलं? कुणी घेतली अनोखी सेवा
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
Embed widget