Weather Updates : काळजी घ्या...पुढील पाच दिवस तापमानाचा पारा वाढणार! हवामान विभागाने दिला महत्त्वाचा इशारा
Weather Updates : पुढील पाच दिवस भारतात उष्णता वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Weather Updates : अजूनही मार्च महिना सुरू झाला नसला तरी तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. आता, आगामी पाच दिवस वातावरणातील उष्मा वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. वायव्य, मध्य आणि पूर्व भारतात पुढील पाच दिवसात कमाल तापमान हे सामान्यपेक्षा तापमानापेक्षा तीन ते पाच अंशांनी जास्त असणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
देशाच्या अनेक भागांमध्ये आधीच अधिक तीव्रतेच्या तापमानाची नोंद होत आहे. साधारणपणे एवढे तापमान मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नोंदवण्यात येते. त्यामुळे यंदाच्या वर्षी तीव्र उष्णतेची लाट येण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. आयएमडीने एका निवेदनात म्हटले आहे की, "पुढील पाच दिवसांत वायव्य, मध्य आणि पूर्व भारतातील बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा तीन ते पाच अंश सेल्सिअस जास्त राहण्याची शक्यता आहे." ,
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत वायव्य भारतातील कमाल तापमानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता नाही. मात्र, त्यानंतर तापमानाचा पारा दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मार्चच्या महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांत वायव्य भारतातील काही ठिकाणी तापमानाचा पारा हा 40 अंश सेल्सिअस आणि त्याहून अधिक वाढू शकतो.
हवामान विभागाने अतिउष्ण वातावरणासाठी अनेक घटक जबाबदार असल्याचे म्हटले आहे. पश्चिमी चक्रावातची (वेस्टर्न डिस्टर्बन्स) अनुपस्थिती असल्याने वातावरण उष्ण होत असल्याचे हवामान अधिकाऱ्यांनी म्हटले. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पाऊस येतो आणि तापमान कमी ठेवण्यास मदत होते. सोमवारी (20 फेब्रुवारी), वायव्य, मध्य आणि पश्चिम भारतातील बहुतेक ठिकाणी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस ते 39 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले.
दिल्लीच्या प्राथमिक हवामान केंद्र सफदरजंग वेधशाळेने सोमवारी येथे 1969 नंतरचा तिसरा सर्वात उष्ण फेब्रुवारी दिवस नोंदवला. सोमवारी कमाल तापमान 33.6 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले.
शेतीवर परिणाम होण्याची शक्यता
या काळात अधिक तापमान उत्पादनासाठी हानिकारक आहे. इतर उभी पिके आणि फळबागांवरही असाच परिणाम होऊ शकतो. हवामान खात्याने सांगितले की, पिकांवर उष्णतेचा परिणाम दिसू लागल्यास शेतकरी हलके सिंचन करू शकतात.
फेब्रुवारीमध्ये थंडीचा काही प्रमाणात जोर असतो. पण आतापासूनच हवामान बदलू लागले आहे. बुधवारी (22 फेब्रुवारी) सकाळी धुके दिसल्यानंतर हवामान चांगले राहील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, हा अंदाज चुकीचा ठरला. गेल्या वर्षी मार्चमध्ये, 1901 नंतर देशातील सर्वात उष्ण वातावरणामुळे ळे गव्हाच्या उत्पादनात 2.5 टक्क्यांची घट झाली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
