BJP vs Shiv Sena Thane :शिंदेंच्या बालेकिल्ल्यात झेंडा फडकवण्यासाठी भाजपचे नेते आतुर? Special Report
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर असल्याची चर्चा रंगलीय...भाजपकडून शिंदेंची जमेल तेवढी कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे...आता भाजपनं थेट शिंदेंच्या बालेकिल्ल्याला लक्ष्य केलंय...ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी तिथले नेते आतुर झालेत...भाजपच्या या मिशन ठाण्याला शिंदे कसं उत्तर देणार हे पाहायचंय...
ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.
शिवसेनेचे सतीश प्रधान हे ठाण्याचे पहिले महापौर होते.
१९९३ पासून २०१७ पर्यंत ठाण्यात सातत्यानं शिवसेनेचा महापौर होता
आता याच ठाण्यावर भाजपची नजर आहे...
थेट ठाण्यात घुसून शिंदेंची कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे का, असा प्रश्न निर्माण होतोय...
भाजपचे असलेले वनमंत्री गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार घेणार आहेत...
ठाणेकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार आपल्या भेटीला या उफक्रमांतर्गत भाजपचे दोन आमदार थेट लोकांशी संपर्क साधणार आहेत...
दर आठवड्याला सोमवारी आणि शुक्रवारी आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे भाजपच्या खोपट ऑफिसमध्ये बसणार आहेत.
All Shows

































