नोबेल पुरस्कार विजेते वैज्ञानिक हरगोविंद खुराना यांची आज जयंती, जाणून घ्या काय होतं त्यांचं संशोधन
भारतीय वंशाचे अमेरिकन वैज्ञानिक हरगोविंद खुराना यांची आज जयंती आहे. त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. जाणून घेऊयात त्याचं नेमकं काय होत संशोधन..

Har Gobind Khorana : चिकित्सा विज्ञान क्षेत्रातील भारतीय वंशाचे अमेरिकन वैज्ञानिक हरगोविंद खुराना यांची आज जयंती आहे. त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हरगोविंद खुराना यांचा जन्म 9 जानेवारी 1922 मध्ये रायपूर येथील एका गरिब कुटुंबात झाला. त्यांना मोठी पाच भावंडे होती. हे सर्वात लहान होते. भारत सरकारची शिष्यवृत्ती प्राप्त करून ते संशोधनासाठी इंग्लंडला गेले.
हरगोविंद खुराना यांनी 1952 ते 1960 या काळात यूनिवर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया येथे प्राध्यापक म्हणून काम केले. त्याच काळात त्यांनी केलेल्या संशोधनामुळे त्यांना अमेरिकी वैज्ञानिकांचा मार्शल डब्ल्यू. नीरेनबर्ग आणि डॉ. रॉबर्ट डब्लू. रॅले यांच्या संयुक्त विद्यमानाने नोबेल पुरस्कार देण्यात आला. या संशोधनातून असे सिद्ध झाले की, पेशींचे आनुवंशिक कूट पुढे घेऊन जाणाऱ्या न्यूक्लिक अॅसिड न्यूक्लिओटाइड्स सारख्या पेशींचे प्रोटीन सिंथेसिस नियंत्रित होते.
हरगोबिंद यांना त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यांनी 1945 मध्ये पंजाब विद्यापीठातून एमएससी पदवी मिळवली. त्यानंतर ते शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्ये डॉक्टरेट मिळवल्यानंतर त्यांनी झुरिचमध्ये संशोधन कार्य केले, त्यानंतर ते 1951 मध्ये केंब्रिज विद्यापीठात गेले आणि त्यांनी न्यूक्लिक अॅसिडवर संशोधन सुरू केले. 1952 मध्ये त्यांनी एस्थर एलिझाबेथ सिबलरशी लग्न केले. उच्च शिक्षण घेतल्यानंतर खूराना पुन्हा भारतात परतले. मात्र, येथे काम करण्यासाठी योग्य संधी न मिळाल्याने ते पुन्हा इंग्लंडला परतले. 1966 मध्ये त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व घेतले. त्याचबरोबर त्यांना नॅशनल मेडिकल ऑफ सायन्स हा पुरस्कार देण्यात आला.
ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठात संशोधन करण्याची त्यांना संधी मिळाली. तिथे त्यांनी प्रामुख्याने "न्यूक्लिक अॅसिड्स आणि अनेक महत्त्वपूर्ण बायोमोलेक्यूल्सचे संश्लेषण" यावर काम केले. 1960 मध्ये, डॉ. खुराना यांची युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन, यूएसए येथे एन्झाइम रिसर्च संस्थेत प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. तिथे त्यांनी आरएनए-प्रोटीन संश्लेषणासाठी कोडिंगची यंत्रणा उघड केली आणि कार्यात्मक जनुकांच्या संश्लेषणावर काम सुरू केले. विस्कॉन्सिन विद्यापीठात काम करत असताना खुराणा यांना नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांनी प्रथिने संश्लेषणातील अनुवांशिक कोडवर काम केल्याबद्दल त्यांना नेबोल पारितोषिक देण्यात आले.
एन्झाइम्सद्वारे ते प्रथिने तयार करू शकले. यानंतर, कोडे सोडवण्याचे कार्य या प्रथिनांच्या अमीनो अॅसिडचा क्रम असू शकतो. खुराणा यांच्या शोधातून असे दिसून आले की अँटिबायोटिक्स खाल्ल्याने शरीरावर एक प्रकारचे व्यापक परिणाम होतात. यावर त्यांना 1968 मध्ये डॉ. निरेनबर्ग आणि लुसिया ग्रॉउट्झ हॉरविट्झ यांच्यासोबत संयुक्तपणे नोबेल पारितोषिक मिळाले, त्यात खुराणा यांचे महत्वपूर्ण योदगादन होते. खुराणा यांच्या संशोधनातून असे दिसून आले की मानवी डीएनएमध्ये न्यूक्लियोटाइड्सची स्थिती कोणत्या प्रकारचे अमिनो अॅसिड तयार होईल हे ठरवते. या अमीनो आम्लांपासून प्रथिने तयार होतात, जी पेशींच्या कार्याशी संबंधित माहिती पुढे नेण्याचे काम करतात. जनुकशास्त्राचे आजचे जग याच माहितीवर आधारित आहे.
खुराणा पहिले शास्त्रज्ञ होते की त्यांनी विशेष प्रकारचे न्यूक्लियोटाइड्सचे रासायनिक संश्लेषण केले होते. ज्याच्या आधारे त्यांनी जगातील पहिले कृत्रिम जनुक तयार केले. पुढे त्यांची ही प्रक्रिया खूप लोकप्रिय झाली आणि त्यांच्या याच संशोधनाच्या जोरावर नंतर शास्त्रज्ञांनी जीनोम संपादनाच्या क्षेत्रात यश मिळवले. हे खुराना यांचे संशोधन कार्य होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
