बॉम्बे फिव्हर अन् कोरोना.. काय आहे साधर्म्य? बॉम्बे फिव्हरच्या दुसऱ्या लाटेने कसा झाला होता हाहकार!
कोरोना आजाराशी साधर्म्य असलेली बॉम्बे फिव्हरची दुसरी लाट सर्वाधिक घातक ठरली होती. महात्मा गांधींनाही बॉम्बे फिव्हरची लागण झाली होती. या संदर्भातील हा रिपोर्ट.
औरंगाबाद : फ्रान्स, युरोपसह जगात काही देशात येणाऱ्या कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या पाश्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा करणात आली आहे. कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेमुळे शंभर वर्षांपूर्वी देशात आलेली बॉम्बे फिव्हर महामारीची आठवण होते. बॉम्बे फिव्हरची दुसरी लाट सर्वाधिक घातक ठरली होती. त्यावेळी महात्मा गांधींनाही बॉम्बे फिव्हरची लागण झाली होती. या संदर्भातील हा रिपोर्ट.
बॉम्बे फिव्हर हा कोराना सदृश्य आजार आहे. आज जसं कोरोनाने जग दहशतीखाली आहे, अगदी शभर वर्षांपूर्वी या आजारानं अख्ख जग हादरल होतं. जून 1918 मध्ये जागतिक युद्धावरून परतणाऱ्या सैनिकांसोबत स्पॅनिश फिव्हरचे विषाणू भारतात आले असं सांगितले जाते. भारतात या आजाराचा प्रवेश मुंबईतून झाल्यामुळे यास बॉम्बे फिव्हर नाव पडले. सुरुवातीला बॉम्बे डॉक यार्ड येथे ड्यूटीवर असलेल्या काही पोलिसांना याची बाधा झाली. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये या आजाराची लक्षणे दिसून आली त्या सैनिकांना क्वारंटाईन करण्यात आलं होत. आज जशी काही लोकांमध्ये कोरोनाची लक्षण दिसत नाहीत. अगदी असच बॉम्बे फिव्हर आजाराची लक्षणे न दिसणाऱ्या सैनिकांच्या माध्यमातून सुरुवातीला मुंबई, नंतर मद्रास, पंजाब, कोलकाता या प्रांतात आणि नंतर संपूर्ण देशात आजाराची लाट पसरली. पहिल्या लाटेत लहान मुले, वृद्धांना याची बाधा झाली.
बॉम्बे फिव्हर आजार आणि देशातील मृत्यूची संख्या
बॉम्बे फिव्हर या आजाराने देशातील 5 टक्के लोकांचा मृत्यू झाला होता, असा अभ्यास सांगतो. पहिल्या टप्यात लहान मुलं आणि वृद्धांना मोठ्या प्रमाणात बाधा झाली तर दुसऱ्या लाटेत 20 ते 40 वयोगटातील सर्वाधिक बाधित आहेत. या आजारात तरुण महिलांच्या मृत्यूचे प्रमाण लक्षणीय होतं. भारतातील 5 टक्के लोकसंख्येचा बळी गेला होता.
नपुंसकत्वासह तरुण महिलांचे मृत्यू
बॉम्बे फिव्हर या आजारामुळे 1919 चा जन्मदर पूर्वीच्या तुलनेत 30 टक्के कमी झाला होता. या आजारात मृत्यूदरही सुरुवातीस कमी होता. सप्टेंबरमध्ये बॉम्बे फिव्हरची दुसरी लाटल आली. ही लाट अत्यंत तीव्र होती व यात सर्वाधिक प्राणहानी झाली. ही लाट नोव्हेंबरपर्यंत टिकून होती. 1919 मध्ये पुन्हा तिसरी लाटही आली होती. बॉम्बे फिव्हरची लागण महात्मा गांधींनाही झाली होती. या महामारीचा स्वातंत्र्य चळवळीवरही परिणाम झाला होता. एका अभ्यासानुसार महामारीत भारतात 1 कोटी 33 लक्ष 88 हजार लोकांच्या मृत्यूचा अंदाज आहे. तर जगभरात 3 कोटी मृत्यू झाल्याचं सांगितले जाते.
कोरोना सदृश्य आजार : डॉ. उन्मेश टाकळकर (सिग्मा हॉस्पिटल, औरंगाबाद)
हा आजार आम्ही अभ्यासक्रमात अभ्यासला होता. कोरोना सदृश्य आजारात अनेक लोकांनी आपला जीव गमावला होता. या आजाराची लक्षणे देखील कोविडशी मिळतीजुळती आहे. बॉम्बे फिव्हरमुळे लंग्जवर परिणाम व्हायचा, त्या काळात फारशी आजाराची औषध उपलब्ध नव्हती. त्यामुळे मृत्यूदर अधिक होता. आता कोविडवर काय उपचार करायचा याचा थोडासा अंदाज आहे. आता कोरोनाची दुसरी लाट येईल, असं सांगितलं जातंय. त्यामुळे बॉम्बे फिव्हरची ही आठवण होतेच. त्या काळात नागरिकांनी मास्क वापरणं टाळलं होतं. आताही आपण कोरोनाच्या आजाराच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जात असताना मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग, हात धुणे यासह स्वच्छता पाळणे आवश्यक आहे. या महामारीच्या नियंत्रणासाठीही सार्वजनिक समारंभावर प्रतिबंध लावण्यात आले. मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले. सुरुवातीच्या काळात लोकांनी याचे पालन केले. पहिली लाट कमी होताच लोकांनी सार्वजनिक समारंभात मोठ्या प्रमाणात सहभाग सुरू केला. मास्क वापरणे बंद केले. यानंतर काही दिवसांतच दुसरी लाट आली. त्यामुळे कोरानाच्या दुसऱ्या लाटेला सामोर जाताना काळजी घ्या.