Mobile : तुमच्या जुन्या मोबाईला हवीये चांगली किंमत? मग ही बातमी नक्की वाचा
Mobile : तुमचा जुना मोबाईल विकून नवीन मोबाईल तुम्ही विकत घेत असला आणि त्या जुन्या मोबाईल चांगली किंमत कशी मिळवता येईल हे जाणून घेऊया.

मुंबई : नवीन मोबाईल (Mobile) घेताना पहिला विचार येतो तो बजेटचा. पण जर तुम्ही मोबाईल खरेदी करताना बजेटची (Budget) काळजी करत असला तर हा उपाय नक्की करुन पाहा. तुमच्या बजेटसाठी तुम्ही तुमचा फोन ऑनलाईन (Online) विकू शकता. त्यातून मिळालेले पैसे तुम्ही तुमचा नवीन फोन घेण्यासाठी वापरु खर्च करुन शकता. त्यामुळे आता तुमचा जुना मोबाईल फेकून देण्याची किंवा न वापरण्याची काही गरज नाही. कारण तुम्हाला तुमचा जुन्या मोबाईलचा देखील आता तितकाच फायदा होऊ शकतो.
सध्या ऑनलाईन माध्यमातून अनेकजण मोबाईल विकत घेतात. त्यामुळे मोबाईल विकत घेताना अनेक चांगल्या ऑफर्स मिळण्यास मदत होते. याचाच एक महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमच्या जुन्या मोबाईलला देखील चांगली किंमत मिळू शकते. फ्लिपकार्ट सारख्या अॅपमध्ये तुम्हाला ही सुविधा उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे अगदी वाजवी दरात नवीन मोबाईल मिळण्यास तुम्हाला मदत होऊ शकते.
कसा विकाल तुमचा जुना मोबाईल ?
यासाठी फ्लिपकार्टवरील सर्च बारमध्ये सेलबॅक आणि सेलिंग फोन असा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमच्या जुन्या मोबाईलची माहिती टाकावी लागेल. ती टाकून झाल्यानंतर तुमच्या फोनला योग्य ती किंमत तिथे दाखवली जाईल. ज्यामुळे तुम्हाला तुमचा जुना मोबाईल विकता येईल. तसेच जर तुम्ही त्याच अॅपवरुन नवीन मोबाईल विकत घेत असाल तर त्यावर जुना मोबाईल एक्सजेंच केल्यानं चांगल्या ऑफर देखील मिळण्यास मदत होऊ शकते.
दरम्यान फ्लिपकार्टवरील एक्झिक्युटिव्ह तुमच्या घरी तुमचा फोन घेण्यासाठी येऊ शकतो. तुमच्या प्रत्येक ब्रँडचा मोबाईल तुम्ही विकू शकता. सध्या नवीन मोबाईलच्या किंमती या बऱ्याचदा काही हजारांमध्ये असतात. अशावेळी जर अशापद्धतीने तुम्ही फोन एक्सजेंच केलेत तर तुमच्या फोनची किंमत आणखी कमी होण्यास मदत होऊ शकते.
दरम्यान नुकतच सध्या आयफोन 15 लाँच करण्यात आला आहे. या आयफोनची किंमती देखील काही हजारांमध्ये आहे. अशावेळी तुम्ही जर तुमचा मोबाईल तुम्ही एक्सजेंच केला तर तुम्हाला चांगल्या ऑफर्स मिळण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला तुमचा आवडता मोबाईल मिळण्यास मदत होऊ शकते.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
