एक्स्प्लोर

केंद्रीय पथकाच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला सुरुवात

केंद्रीय पथकासोबत भागातील ग्रामस्थ आणि स्थानिक अधिकारी उपस्थित होते. शिवाय दुष्काळी दौऱ्याच्या एका पथकाने गंगापूर तालुक्यातील मुरमी गावात शेतीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी पाहणी पथकासमोर त्यांची व्यथा मांडली.

औरंगाबाद : केंद्राच्या दुष्काळ पाहणी पथकाने पहिल्या टप्प्यात आज प्रत्यक्षात शिवारात आणि गावागावात जाऊन दुष्काळ पाहणी दौऱ्याला सुरुवात केली आहे. केंद्राचं हे पथक आज प्रथम औरंगाबाद जिल्ह्यातील टेंभापुरी धरणात पोहोचल आणि तेथील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासोबत भागातील ग्रामस्थ आणि स्थानिक अधिकारी उपस्थित होते. शिवाय दुष्काळी दौऱ्याच्या एका पथकाने गंगापूर तालुक्यातील मुरमी गावात शेतीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी पाहणी पथकासमोर त्यांची व्यथा मांडली.

तिसऱ्या पाहणी पथकानं जालन्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पथकानं जवसगाव आणि बेथलम गावांना भेट दिली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासमोर विभागीय आयुक्तांनी दुष्काळाच्या स्थितीचा अहवाल सादर केला. तसेच मराठवाड्यासाठी दुष्काळी स्थितीत 7 हजार 900 कोटींची गरज असल्याची केली मागणी.

पथक मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी तर विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळी भागांची पाहणी करणार आहे.

अहमदनगरमध्येही केंद्रीय पथकाने दुष्काळाची पाहणी केली. केंद्रीय सहसंचालक सुभाषचंद्र मीना यांच्यासह केंद्रातील आणि राज्यातील अधिकारी, जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी अहमदनगरमधील शेवगाव, पाथर्डी, कर्जत तालुक्यातील कापूस, तूर, कांदा यांसह रब्बी पिकांची पाहणी केली.

शेतकऱ्यांसोबत संवाद साधून पिण्याचं पाणी, शेतीतील पीक आणि त्यांची स्थिती याची चौकशी केली. दरम्यान राज्य सरकारने दुष्काळासंदर्भात आराखडा केंद्राला सादर केला असून लवकरच केंद्र आणि राज्य सरकार उपाययोजना करतील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

राज्यात 26 जिल्ह्यांमधल्या 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

राज्यातील 26 जिल्ह्यांमधल्या 151 तालुक्यांमध्ये राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. 112 तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा, तर 39 तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे.

राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरला, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करुन या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यांमध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेऊन राज्य शासन परिशिष्ट 'अ' मध्ये नमूद केलेल्या 151 तालुक्यांमध्ये त्यांच्या नावासमोर दर्शवल्याप्रमाणे गंभीर/मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे.

गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झालेले तालुके (112)

सांगली (5) : जत, कवठेमहांकाळ, खानापूर-विटा, आटपाडी, तासगांव

सातारा (1) : माण-दहीवडी

सोलापूर (9) : करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढे, पंढरपूर, सांगोले, अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर

पालघर (3) : पालघर, तलासरी, विक्रमगड

धुळे (2) : धुळे, सिंदखेडे

जळगाव (13) : अमळनेर, भडगांव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर, यावल

नंदुरबार (3) : नंदुरबार, नवापूर, शहादा

नाशिक (4) :  बागलान, मालेगांव, नांदगांव, सिन्नर

अहमदनगर (11) : कर्जत, अहमदनगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, रहाता, रोहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड

औरंगाबाद (9) : औरंगाबाद, गंगापूर, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड,सोयगाव, वैजापूर, कन्नड

बीड (11) :  आष्टी, बीड, धारुर, गेवराई, माजलगाव, शिरुर (कासार), वडवणी, केज, आंबेजोगाई, परळी, पाटोदा,

जालना (7) : अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसांगवी, जाफ्राबाद, जालना, परतूर

नांदेड (2) : मुखेड, देगलूर

उस्मानाबाद (7) : लोहारा, कळंब, उस्मानाबाद, परांडा, तुळजापूर, वाशी, भूम

परभणी (6) : मनवथ, पाथरी, सोनपेठ, पालम, परभणी, सेलू

हिंगोली (2) :  हिंगोली, सेनगाव

अमरावती (1) : मोर्शी

बुलडाणा (7) : खामगाव, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, सिंदखेड राजा

यवतमाळ (6) :  बाभुळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, उमरखेड, राळेगाव

चंद्रपूर (1) : चिमूर

नागपूर (2) : काटोल, कळमेश्वर मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झालेले तालुके (39)

पुणे (7) - आंबेगाव, पुरंदर, सासवड, वेल्हे, बारामती, दौंड, इंदापूर, शिरुर-घोडनंदी

सातारा (2) - कोरेगांव, फलटण

धुळे (1) - शिरपूर

नंदुरबार (1) - तळोदे

नाशिक (4) - देवळा, इगतपुरी, नाशिक, चांदवड

नांदेड (1) - उमरी

हिंगोली (1) - कळमनुरी

लातूर (1) - शिरुर अनंतपाळ

अकोला (5) - बाळापूर, बार्शिटाकळी, मुर्तिजापूर, तेल्हारा, अकोला

अमरावती (4) - अचलपूर, चिखलदरा, वरुड, अंजनगांव सुर्जी

बुलडाणा (1) - मोताळा

वाशिम (1) - रिसोड

यवतमाळ (3) - केलापूर, मारेगांव, यवतमाळ

चंद्रपूर (4) - ब्रम्हपुरी, नागभिर, राजुरा, सिंदेवाही

नागपूर (1) - नरखेड

वर्धा (2) - आष्टी, कारंजा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Congress : काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 11 February 2025Rinku Rajguru Kolhapur | कोल्हापुरात आर्ची आली, फोटोमुळं चर्चा झाली! Special ReportTanaji Sawant Son Kidnapping| कहाणी नेत्याच्या लेकाच्या अधुऱ्या बँकॉक वारीची ABP MajhaBharat Gogawle on Palakmantripad : पालकमंत्रिपदावरून तिन्ही पक्षात धुसफूस सुरूच Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Congress : काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला राज्यात 42 केंद्रावर कॉपी; 12 वी परीक्षेत मराठवाड्यातच सर्वाधिक कॉपीची नोंद
पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला राज्यात 42 केंद्रावर कॉपी; 12 वी परीक्षेत मराठवाड्यातच सर्वाधिक कॉपीची नोंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
Embed widget