एक्स्प्लोर

Omega 3 Benefits : निरोगी शरीराकरीता ओमेगा - 3 आहे आवश्यक , काय आहेत फायदे ; पाहा..

ओमेगा - 3 (Omega -3) हे खूप आपल्या शरीराकरीता अत्यंत आवश्यक असणारे फॅटी अॅसिड आहे.हे एक पोषक तत्व आहे जे रोगांशी लढण्याची क्षमता विकसित करण्यास मदत करते.

Omega - 3 For Good Health : ओमेगा - 3 (Omega -3) हे खूप आपल्या शरीराकरीता अत्यंत आवश्यक असणारे फॅटी अॅसिड आहे. हे एक पोषक तत्व आहे, जे रोगांशी लढण्याची क्षमता विकसित करण्यास मदत करते. ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड्स हे शरीरातील अनेक कार्यांसाठी महत्त्वपूर्ण आहेत. तसेच, त्यांचे पुरेसे सेवन हे आपल्या शरिराच्या अनेक सामान्य आणि गंभीर आरोग्य समस्यांपासून बचाव करू शकते.

ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडमुळे हृदयाचे कार्य अधिक चांगले होते.  ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड हे महिलांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. ते महिलांच्या वाढत्या वयानुसार ऑस्टियोआर्थरायटिस आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करतात. तसेच मासिक पाळीत होणाऱ्या वेदना ही कमी करतात. हे तुमच्या मेंदचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते. तुमची स्मरणशक्ती, मूड आणि बुद्धिमत्ता सुधारण्याकरताही ओमेगा 3 फायदेशीर ठरते. सोबतच यामुळे तुमचे केस आणि डोळेही निरोगी राहतात. ओमेगा - 3 फॅटी अॅसिडमुळे कॅन्सरसारख्या (Cancer) आजारांचा धोकाही टळू शकतो. 

'या' पदार्थांचा करा रोजच्या आहारात समावेश

माशाचे तेल (Fish Oil)

माशांच्या तेलात ओमेगा - 3 फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असते. हे तेल सहसा ट्यूना किंवा रावस माश्यापासून बनवले जाते. माश्यांचे तेल हृदयाकरिता फायदेशीर ठरते. तसेच शरीरातील कोलेस्ट्राॅलची पातळी नियंत्रीत ठेवण्याकरता याचा फायदा होऊ शकतो.

जवस (Flax Seeds)

जवसाच्या (Flax Seeds) तेलामध्ये अल्फा लिनोलिक अॅसिड (Alpha linolic acid) सापडतं, जे एक प्रकारे ओमेगा 3 फॅटी अॅसिड (Omega 3 fatty acid) असतं.  त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म आपल्याला जळजळ कमी करण्यास आणि मेंदूचे संरक्षण करण्यास मदत करतात. फ्लॅक्ससीडमध्ये असलेल्या ओमेगा 3 फॅटी ऍसिडमुळे फ्लेक्ससीड तेलाचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. यासोबतच हे ब्लडप्रेशरची पातळी कमी करण्यासही मदत करते.

चिया सीड्स (Chia Seeds)

चिया सीड्सचा (Chia Seeds) शरीराला मोठ्या प्रमाणात फायदा होतो. याओमेगा 3 फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असते. याचा समावेश रोजच्या आहारात केल्यास तुमचे अनेक आजार दूर होऊ शकतात.

आक्रोड (Walnut)

सुक्या मेव्यामध्ये ओमेगा- 3 (Omega-3) फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात आढळते. यापैकी, अक्रोड हे ओमेगा -3 फॅटी ऍसिडचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो. तुम्ही अक्रोड कधीही खाऊ शकता.

1. ओमेगा 3 तुमच्या रक्तात असणारी ट्रायग्लिसराईड्ची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. शरीरातील ट्रायग्लिसराईड्ची पातळी वाढल्यास तुम्हाला हार्टटॅक येण्याचा धोका वाढू शकतो.

2. ओमेगा 3 च्या कमतरतेमुळे डोळे कोरडे पडण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो.

3. ओमेगा ३ अॅसिडच्ये सेवनामुळे ब्रेनला ऑक्सीजनचा व्यवस्थित पूरवठा होतो आणि त्यासाठी ओमेगा 3 फॅटी अॅसिड मेमरीला बूस्ट करण्याकरता फायदेशीर ठरतो. 

इतर महत्वाच्या बातम्या

Health Tips : तुमच्या घरात लहान मुलं आहेत? पावसाळ्यात घ्या विशेष काळजी, वाचा सविस्तर

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Embed widget