एक्स्प्लोर

Health Tips : तुमच्या घरात लहान मुलं आहेत? पावसाळ्यात घ्या विशेष काळजी, वाचा सविस्तर

पावसाने सर्वच ठिकाणी चांगलेच थैमान घातले आहे.पाऊस जेवढा सुखदायक असतो तितकाच तो अनेक आजारांना आमंत्रण ही देतो.

Tips To Keep Safe Baby During Monsoon : लहान मुलांना पावसाळा (Mansoon) आला की, पावसात भिजायला खूप आवडते. मात्र त्यानंतर लगेच लहान मुले संसर्गजन्य आजारांचे बळी ठरतात. ऋतुमानानुसार येणाऱ्या आजारांचा फटका लहान मुलांना मोठ्या प्रमाणात बसतो. अशा वेळी घरातील लहान मुलांची कोणत्या पद्धतीने काळजी घ्यावी जाणून घेऊया.

1. पावसाळ्यात लहान बाळांना फंगल इन्फेक्शन (Fungal Infection) होण्याचा मोठा धोका असतो. पावसाळ्यात त्वचा खूप ओली आणि तेलकट होते. त्यामुळे हवेतील धूळ आणि जंतू लगेच त्वचेवर चिकटतात. यामुळे फंगल इंनफेक्शनचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. फंगल इन्फेक्शन झाल्यास त्वचा लाल होते, खाज सुटणे आणि शरीरावर पुरळ येऊ शकते. 

2. पावसाळ्यात लहान मुलांना मलेरिया, चिकनगुनियासारखे आजार बळावतात. पावसामुळे नाल्यात किंवा खड्ड्यात पाणी साचते, त्यामुळे डासांची पैदास होते. मलेरियामुळे ताप, अशक्तपणा सर्दी अशा समस्या उद्भवतात. 

3. पावसाळ्यात अचानक होणाऱ्या बदलांमुळे सर्दी आणि फ्लूचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. लहान बाळांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याकारणाने त्यांना या रोगांची लागण तात्काळ होते.

4. लहान बाळांसाठी अनेक जण लंगोटचा वापर करतात. पावसाळ्यात कपडे लवकर वाळत नाहीत. ओले कपडे किंवा लंगोट घातल्यास पुरळ उठण्याची समस्या उद्भवते.

5. लहान मुलांना बाहेरचे पदार्थ खायाला खूप आवडते. मात्र पावसाळ्यात बाहेरचे अन्नपदार्थ खाणे आणि पाणी पिणे टाळावे. कारण तुम्ही जर का बाहेरचे अन्नपदार्थ खाल्ले तर तुम्हाला हिपॅटायटिस ए सारखे विषाणूजन्य संसर्ग तुमच्या शरीरात पसरु शकतो. पावसाळ्यात अनेकदा जागोजागी पाण्याचे डबके साचलेले असते. ज्यामध्ये घाण पाणी हे साचलेले राहते, त्यामुळे कॉलरा, टायफॉईड, लेप्टोस्पायरोसिस, कावीळ यांसारख्या आजारांच्या संपर्कात येणे अगदी सोपे होते. ताप येणे, प्रचंड डोकेदुखी, जुलाब, ओटीपोटात दुखणे, सांधेदुखी ही कॉलरा, टायफॉईड, लेप्टोस्पायरोसिस, कावीळ यांसारख्या रोगाची लक्षणे असू शकतात. यांचे प्राथमिक लक्षण म्हणून तुमच्या यकृतावर सूज येऊ शकते. डोळ्यांचा, हाताच्या बोटांचा आणि लघवीचा रंग पिवळा होऊ शकतो, भूक न लागणे अशा तक्रारी आपोआप वाढू लागतात.

6. नवजात बालकांनाही डेंग्यूची समस्या असू शकते. जर तुम्ही कूलर चालवला तर त्यात असलेल्या पाण्यात बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे डेंग्यू पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे नवजात बालकांना ताप, सर्दी, फ्लू होऊ शकतो.

पावसाळ्यात लहान मुलांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

  • बाळाला दमट खोलीत ठेवणे टाळा. थंड हवेचा संपर्क टाळा. बाळाचे केस आणि त्वचा कोरडी ठेवा.
  • नवजात बाळाला संसर्गापासून वाचवण्यासाठी त्याला स्तनपान करा. कारण स्तनपानामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि संसर्गाचा धोका कमी होतो.
  • घरात पूर्ण स्वच्छता ठेवा. खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा जेणेकरुन संसर्ग डास आणि माश्यांद्वारे पसरु नये.
  • बाळाला जाड सुती कपड्यांचा वापर करा आणि वापरण्यापूर्वी कपडे पूर्णपणे उन्हात वाळलेले किंवा इस्त्री केलेले आहेत याची खात्री करा.
  • इतर ऋतूंपेक्षा पावसाळ्यात जास्त वेळा बाळाचे डायपर बदला. जर पुरळ उठले तर लगेच बेबी पावडर वापरा.

इतर महत्वाच्या बातम्या

Health News: बॉडी फिटनेस तपासण्यासाठी यापुढे फक्त BMI गृहित धरला जाणार नाही; वाचा लठ्ठपणा चिकित्सकांनी सांगितलेले बदल...

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget