Ice Tea : 'आईस टी' पिणे आरोग्यासाठी चांगलं की वाईट, फायदे-तोटे काय काय?
Ice Tea : 'आईस टी' फक्त शरीराला थंडावा देत नाही तर ती प्यायल्याने आपल्या आरोग्यास बरेच फायदे होतात. साखरेचे योग्य प्रमाण आणि मर्यादित 'आईस टी' चे सेवन आरोग्यास उत्तम ठेवते.

Health Tips : दिवसभराच्या ताणतणावानंतर, दहा मिनिटांचा चहा (Tea) ब्रेक तुम्हाला नव्याने ताजेतवाणे करतो. पण कधीतरी हा चहा ब्रेक (Breakfast) थंडगार असला तर अजूनच रिफ्रेशिंग वाटतं. 'आईस टी' फक्त शरीराला थंडावा देत नाही तर ती प्यायल्याने आपल्या आरोग्यास (Health) बरेच फायदे होतात. सामान्यपणे आईस टी ब्लॅक किंवा ग्रीन टी पासून तयार केली जाते. आईस टीची चव वाढवण्यासाठी त्यात लिंबू, चेरी, मध टाकू शकता. आईस टीमध्ये पोटॅशिअम, फायबर, मॅग्नेशिअम, फ्लेव्होनॉइड यांसारखे अँटिऑक्सिडंट्स पोषक तत्त्व असतात.
'या' रिफ्रेशिंग ड्रिंकचे फायदे जाणून घेऊयात
रोग प्रतिकारशक्ती वाढते
'आईस टी' मध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक घटक असतात जे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात, त्यामुळे शरीराचे संसर्गापासून संरक्षण होते.
हृदयाचे आरोग्य
'आईस टी' च्या सेवनाने हृदयाचे आरोग्य उत्तम राहते. आईस टीमध्ये असलेलं फ्लेव्होनॉइड रक्तवाहिन्यातील सूज कमी करते, त्यामुळे हृदयासंबंधी होणाऱ्या आजारांपासून आपले संरक्षण होते.
शरीर फ्री रॅडिकल्सपासून मुक्त राहते
आईस टीमध्ये 'व्हिटॅमिन सी' आणि पोटॅशिअम असते जे शरीरातून फ्री रॅडिकल्सला बाहेर टाकते. हे फ्री रॅडिकल्स तुमच्या शरीरात तणाव निर्माण करण्याचं कारण ठरतात.
वजन कमी करण्यात मदत करते
आईस टीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. जे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
मधुमेहावर नियंत्रण
मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांसाठी आईस टी फायदेशीर आहे कारण आईस टीमध्ये साखरेची पातळी कमी असते. सोबतच शरीरातील इन्सुलिन रेझिस्टन्स नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. आईस टीमध्ये नैसर्गिक साखरही कमी असते. आईस टीमुळे टाईप-२ च्या मधुमेहाचा धोका कमी होऊन तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
कशी बनवावी 'आईस टी' ?
तुम्हाला कोणत्याही रस्त्याच्या कोपऱ्यावर किंवा तुमच्या घराजवळ आईस टी सहजासहजी मिळणार नाही. पण आईस टी आपण घरी बनवू शकतो. आईस टी बनवणे फारच सोपं काम आहे. आईस टी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पाणी गरम करा. पाणी उकळल्यानंतर त्यात टी बॅग टाका. साधारण १० ते १५ मिनिटे पुन्हा पाणी उकळून घ्या. थोड्या वेळानंतर चहा थंड झाल्यावर त्यातमध्ये मध आणि बर्फाचे तुकडे टाका. आईस टी पिण्यापूर्वी त्यात थोडासा लिंबाचा रस टाका. तुमची आईस टी तयार झाली.
'आईस टी' किती प्रमाणात प्यावी?
'आईस टी' पिण्याचा उत्तम मार्ग म्हणजे साखरेशिवाय आईस टी पिणे. दिवसातून फक्त एकदा आणि आठवड्यातून काही कप आईस टी प्यायल्याने तुमच्या आरोग्याला कोणताही धोका होत नाही. पण जास्त प्रमाणात साखर टाकून आईस टी प्यायल्याने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.
जाणून घेऊया जास्त आईस टी प्यायल्याने आरोग्यास होणारे दुष्परिणाम-
- जास्त प्रमाणात आईस टी प्यायल्याने किडनी स्टोनची समस्या उद्भवते.
- बर्याच वेळा लोक साखरेचा सोडा आईस टीमध्ये मिसळतात त्यामुळे शरीरात साखरेची पातळी वाढते.
- जास्त आईस टी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल वाढते परिणामी स्ट्रोकचा धोका उद्भवतो.
- जास्त प्रमाणात आईस टी प्यायल्याने शरीरात कॅफिनचे प्रमाण वाढते, त्यामुळे झोप न लागणे, पोटदुखी, डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात.
'आईस टी' प्यायल्याने दातांमधील पोकळीच्या समस्येपासून आराम मिळतो. त्वचेचा पोत सुधारतो. हाडे मजबूत राहतात. तसेच रक्तदाब कमी करण्यास मदत होते. 'आईस टी' च्या सेवनाने आपल्याला ताजेतवाने वाटते. साखरेचे योग्य प्रमाण आणि मर्यादित 'आईस टी' चे सेवन आरोग्यास उत्तम ठेवते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
