Health : अभिनेत्री अनन्या पांडेसारखं फिट व्हायचंय? तिने दिनक्रमात 'या' व्यायामाचा केला समावेश, फिटनेस तज्ज्ञ सांगतात..
Health : आजकाल सर्वच अभिनेत्री फिटनेस फ्रिक झाल्या आहेत. अनन्या पांडे ही बॉलिवूडमधील फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी तिने एका व्यायामाचा समावेश तिच्या दिनक्रमात केला आहे.
![Health : अभिनेत्री अनन्या पांडेसारखं फिट व्हायचंय? तिने दिनक्रमात 'या' व्यायामाचा केला समावेश, फिटनेस तज्ज्ञ सांगतात.. Health lifestyle marathi news Want to get fit like actress Ananya Pandey Include armchair pilets exercise in routine say fitness experts Health : अभिनेत्री अनन्या पांडेसारखं फिट व्हायचंय? तिने दिनक्रमात 'या' व्यायामाचा केला समावेश, फिटनेस तज्ज्ञ सांगतात..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/1a698ece1061758532f150dcd8c4caef1719473219140381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Health : आपण अनेकदा अभिनेता किंवा अभिनेत्रींना रुपेरी पडद्यावर पाहतो, ते जसे सुंदर आणि नीटनेटके राहतात, त्यांची लाईफस्टाईल, त्यांचं चालणं..त्यांचं बोलणं अशा अनेक गोष्टी बरेच जण फॉलो करतात. बॉलीवूडचे सिनेतारे आणखी एका गोष्टींमुळे चर्चेत असतात, ते म्हणजे त्यांच्या फिटनेस बाबत.. खरं तर बॉलिवूड अभिनेत्रींचा फिटनेस आणि फिगर पाहून आपल्या सर्वांना प्रेरणा मिळते. यामागे सेलिब्रिटींची खास मेहनत देखील असते. डाएट असो किंवा वर्कआउट असो, अभिनेत्री त्यांच्या फिटनेसकडे लक्ष देतात. अनन्या पांडे ही बॉलिवूडमधील फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी तिने एका व्यायामाचा समावेश तिच्या दिनक्रमात केला आहे. जाणून घ्या..
शिल्पा शेट्टीपासून ते अनन्या पांडेपर्यंत सर्वच अभिनेत्री आजकाल फिटनेस फ्रिक!
अगदी शिल्पा शेट्टीपासून ते अनन्या पांडेपर्यंत सर्वच अभिनेत्री आजकाल फिटनेस फ्रिक झाल्या आहेत. अनन्या पांडे ही बॉलिवूडमधील फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी तिने आर्मचेअर पिलेट्स व्यायामाचा समावेश तिच्या दिनक्रमात केला आहे. तिची फिटनेस कोच नम्रता पुरोहित यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये खुशी कपूर आणि अनन्या पांडे आर्मचेअर पायलेट्स करताना दिसत आहेत. हा व्यायाम कसा करायचा? तसेच तो करण्याचा योग्य मार्ग आणि त्याचे फायदे जाणून घेण्यासाठी योग आणि फिटनेस तज्ज्ञ नताशा कपूर यांनी विशेष माहिती दिलीय. जाणून घ्या..
View this post on Instagram
आर्म चेअर पिलेट्स व्यायामाचे फायदे
या व्यायामामुळे शरीरातील मुख्य स्नायू मजबूत होतात
शरीराच्या वरच्या भागाला ताकद मिळते.
असे केल्याने मुद्रा देखील सुधारते.
हे स्नायूंना टोन करते आणि सांधे मजबूत करते, त्यांची कार्यक्षमता वाढवते.
यामुळे चरबीही सहज वितळते.
विशेषतः, पोट आणि कंबरेची चरबी कमी करण्यासाठी हा व्यायाम खूप प्रभावी आहे.
यामुळे पायांचे स्नायू देखील टोन होतात.
चेअर पिलेट्सवर अनेक प्रकारचे व्यायाम करता येतात.
आर्म चेअर पिलेट्स कसे करावे?
हा व्यायाम Pilates चेअरवर केला जातो.
यासाठी तुम्हाला तुमचे हात मांड्यांवर किंवा खांद्याच्या वर ठेवावे लागतील.
आता दाब देऊन पाय वरच्या दिशेने ढकलावे.
यामुळे स्नायूंवर दबाव येतो आणि स्नायू टोन होतात.
हा व्यायाम वेगवेगळ्या दाबांवर आणि सेटवर केले जाते.
सामान्य खुर्चीवर बसून तुम्ही लेग्स एक्स्टेंशन पिलेट्सचा व्यायाम करू शकता.
हे फिटनेससाठीही फायदेशीर आहे.
यासाठी पाठीचा कणा सरळ आणि ओटीपोटाचा भाग तटस्थ ठेवा.
आतून श्वास घ्या.
डावा पाय समोर करा आणि पाय जमिनीवर टिकवून ठेवा.
हे करत असताना श्वास सोडा.
आता पाय नॉर्मल स्थितीत आणा.
आता उजवा पाय समोरच्या दिशेने पुढे घ्या
तुम्हाला हे 4 वेळा करावे लागेल.
हेही वाचा>>>
Health :..तर 'हे' रहस्य आहे शिल्पा शेट्टीच्या फिटनेसचं? उगाच बोलत नाही तिला 'फिटनेस क्वीन!' तुम्हीही रुटीनमध्ये समावेश करा
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)