एक्स्प्लोर

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

Bribe case Pandharpur : शेत जमिनीचा प्रलंबित निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार पंढरपूर उपजिल्हाधीकारी कार्यालयात घडला आहे.

Bribe case Pandharpur : शेत जमिनीचा प्रलंबित निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार पंढरपूर उपजिल्हाधीकारी कार्यालयात घडला आहे. प्रांताधिकारी कार्यालयातील लिपिक व शिपाई हे दोघेही जाळ्यात सापडले आहेत. लाच लुचपत विभागानं या दोघांनाही रंगेहात लाच घेतना पकडलं आहे. 

प्रलंबित असलेल्या शेत जमिनीचा निकाल देण्यासाठी 60 हजार रुपयाची लाच मागितली होती. आज या प्रकरणी 55 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंढरपूर उपविभागीय कार्यालयातील महसूल सहाय्यक किशोर मोहिते व शिपाई  नितीन शिवाजी मेटकरी या दोघांना लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. ही कारवाई आज दुपारी उपविभागीय कार्यालयाच्या आवारात करण्यात आली आहे. या याप्रकरणी महसूल सहाय्यक किशोर  भगवान मोहिते आणि शिपाई नितिन शिवाजी मेटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी मागितली होती लाच 

यातील तक्रारीच्या शेत जमिनी संदर्भात येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल होती. यावर तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी किशोर मोहिते यांनी 60 हजार रुपयांची मागणी केली‌ होती. तडजोडी अंती 55 हजार स्वीकारण्याचे मान्य केले‌ होते. त्यानुसार आज संध्याकाळी प्रांताधिकारी कार्यालयामध्ये रोख 55 हजार रुपये स्विकारताना नितीन शिवाजी मेटकरी याला रंगेहात पकडण्यात आले आहे.

आठ दिवसांपासून लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रचला होता सापळा 

आठ दिवसांपासून लाचलुचपत विभागाचे अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. 13 ते 17 जानेवारी दरम्यान आरोपी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना गुंगारा देत होते. आज अखेर सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान स्वतः च्या कार्यालयात लाच स्विकारताना सापडले. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या याप्रकरणी महसूल सहाय्यक किशोर भगवान मोहिते आणि शिपाई नितिन शिवाजी मेटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतजमिनीसंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, ज्याने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती, त्याच्या बाजूने निकाल देण्यासाठी महसूल सहाय्यक किशोर भगवान मोहिते आणि शिपाई नितिन शिवाजी मेटकरी यांनी 60 हजार रुपयांची लाट मागितली होती. मात्र, याप्रकरणी त्यांना रंगेहात पडकण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

प्लॉट खरेदी प्रकरणात शेतकऱ्याकडे मागितली 10 लाखांची लाच; सरपंच आणि लिपिक ACBच्या जाळ्यात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
Embed widget