एक्स्प्लोर

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कुठे गेले? आज चंद्र दिसतोय का ते बघा? ते कोणत्या गावाला गेले ते शोधा? असे म्हणत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावला.

Aaditya Thackeray on Eknath Shinde : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दावोसला (Davos) गेलेत,पण ते उपमुख्यमंत्री नाराज होऊन कुठे गेले? आज चंद्र दिसतोय का ते बघा? ते कोणत्या गावाला गेले ते शोधा? असे म्हणत युवासेनाप्रमुख आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांनी टोला लगावला. दावोसमधून जर राज्यासाठी काही मोठं येत असेल तर त्याचं आम्ही स्वागत करु. पण मागील दावोस दौऱ्यात जो खर्च करण्यात आला, जी उधळपट्टी झाली ती होऊ नये असेही आदित्य ठाकरे म्हणाले. सह पालकमंत्री म्हणजे ते त्या त्या जिल्ह्याचे मालकमंत्री आहेत असा टोला देखील आदित्य ठाकरेंनी महायुतीला लगावला. 

 बांगलादेशी विरोधात हे मोर्चा काढतात तरीपण ते आले कसे?

संतोष देशमुख प्रकरणी देखील आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. वाल्मिक कराडला हे पकडू शकले नाही, तो शरण आल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. पण सैफ प्रकरणात पोलिसांना मोकळीक दिली तर ते कसे काम करु शकतात याचं उदाहरण आपण काल पाहिलं आहे. पोलिसांचा आम्ही अभिनंदन करतो असेही आदित्य ठाकरे म्हणाले. 10 वर्ष झालं भाजप सरकार आहे. बांगलादेशी विरोधात मोर्चा काढतात तरीपण हे घुसखोर बांगलादेशी आले कसे?  आपलं केंद्र सरकार काहीच करू शकत नाही का? हे आरोपी बांगलादेशी राहत कुठे? तर ठाणे शहरात असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

पालकमंत्रीपदावरुन शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा 

पालकमंत्रीपदावरुन शिंदे गटानं राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे. रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना मिळाल्याने भाजपचे आमदार भरत गोगावले नाराज आहेत. त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर टायर जाळून आंदोलन केले आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत महाराष्ट्र युतीतील शिंदे गटाची अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराजी व्यक्त झाली आहे. यादी जाहीर झाल्यानंतर भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रीपद मिळाले नाही. त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असे उदय सामंत म्हणाले आहे. दरम्यान, त्यानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, गोगावले आणि भूसे यांना पालकमंत्रीपद न मिळाल्याने एकनाथ शिंदे हे नाराज होऊन साताराच्या दरेगावी गेल्याची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या:

Eknath Shinde : एकनाथ शिंदे पुन्हा साताऱ्यातील दरेगावी, तीन दिवस पूर्णवेळ विश्रांती करणार

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Pune Crime News: 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली 82 वर्षांच्या आजोबांना 10 कोटींचा गंडा, पुण्यात प्रसिद्ध 'रीलस्टार' पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Embed widget