Heath Tips : सावधान! अशाप्रकारे फळं खाल तर पोषणाला मुकाल!
Heath Tips : उन्हाळ्यात फळे खाणे आवश्यक आहे. फळे खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती तर मजबूत राहतेच, पण त्यामुळे तुमचे आरोग्य आणि त्वचाही निरोगी राहते.
Heath Tips : प्रत्येक ऋतूमध्ये फळे खाणे खूप महत्वाचे आहे. विशेषतः उन्हाळ्यात फळे खाणे आवश्यक आहे. फळे खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती तर मजबूत राहतेच, पण त्यामुळे तुमचे आरोग्य आणि त्वचाही निरोगी राहते. परंतु, फळांचे पूर्ण पोषण मिळवण्यासाठी फळे खाताना काही चुका करू नका. चला तर, फळे खाताना आपण कोणत्या चुका टाळाव्यात ते जाणून घेऊया...
जास्त वेळ फळ कापून ठेवू नका : बरेच लोक सकाळी खाण्यासाठी फळ रात्रीच कापून ठेवतात. मात्र, असे केल्याने त्यातील अर्ध्याहून अधिक पोषक तत्व नष्ट होतात. त्यामुळे खाण्याआधीच फळे कापा. अगोदर कापून ठेवू नका.
फळांवर जास्त मीठ टाकू नका : फळे कापून किंवा फ्रूट सॅलड बनवून खा. पण, त्यावर मीठ घालून फळे कधीही खाऊ नका, याची विशेष काळजी घ्या. यामुळे, फळातील नैसर्गिक तत्वे कमी होतात, विशेषत: यामुळे आपल्याला फळांचे संपूर्ण पोषण मिळत नाही आणि अतिरिक्त सोडियम देखील आपल्या शरीरात जाते.
लिंबूवर्गीय फळांसह कॉफी-टी घेऊ नका : अनेक लोक फ्रूट सॅलडसोबत कॉफी पितात, तर असे केल्याने त्वचेची अॅलर्जी होऊ शकते. याशिवाय तुमची पचनशक्तीही कमजोर होऊ शकते, त्यामुळे लिंबूवर्गीय फळांसह चहा किंवा कॉफी कधीही पिऊ नका.
सफरचंद सोलून खाऊ नका : अनेकांना सफरचंदाची साल आवडत नाही आणि त्यांना सोललेले सफरचंद खायला आवडते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सफरचंदाच्या सालीमध्ये अधिक पोषक घटक असतात, त्यामुळे सफरचंद सोललेले कधीही खाऊ नका.
फळे फ्रीजमध्ये ठेवू नका : काही लोकांना असं वाटते की, भाज्यांप्रमाणे फळे फ्रिजमध्ये ठेवल्यास ते फार काळ ताजे राहतील आणि खराब होणार नाहीत. पण, तसं मुळीच नाही. फळे फ्रिजमध्ये ठेवणे चुकीचे ठरु शकते. फळे फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे बहुतेक फळे खराब होतात किंवा आरोग्यास हानिकारक बनतात. विशेषतः रसाळ फळे फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे. फळ फ्रीजमध्ये ठेवल्यास फायद्याऐवजी हानी होऊ शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :