Food : काय सांगता! शिळ्या भातापासून 5 चवदार रेसिपीज बनवाल तर, पाहुणे म्हणतील, ' क्या बात है!'
Food : जर तुम्ही रात्री जास्तीचा भात तयार केला असेल तर काळजी करू नका. हा उरलेला भात तुम्हाला फेकून द्यावा लागणार नाही, उलट तुम्ही त्यासोबत काही चविष्ट पदार्थ बनवू शकता

Food : बिर्याणी.. पुलाव... भात हा पदार्थ कोणाला आवडत नाही.. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच भात आवडतो. अनेक घरात रात्रीचा भात खाण्याची पद्धत आहे. त्यामुळे अनेकवेळा रात्री जास्तीचा भात शिजवला जातो. मात्र जो खाल्ला जात नसल्यामुळे उरतो. हा उरलेला भात फेकून देण्याऐवजी तुम्ही काही चविष्ट पदार्थ बनवू शकता. होय, तुम्ही काही स्वादिष्ट पदार्थ बनवण्यासाठी रात्रीचा शिळा भात वापरू शकता. तुम्ही हे पदार्थ दुपारच्या जेवणासाठी किंवा स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. जाणून घेऊया उरलेल्या भातापासून बनवलेले काही चविष्ट पदार्थ.
रात्री जास्तीचा भात केला असेल तर काळजी करू नका.
जर तुम्ही रात्री जास्तीचा भात तयार केला असेल तर काळजी करू नका. हा उरलेला भात तुम्हाला फेकून द्यावा लागणार नाही, उलट तुम्ही त्यासोबत काही चविष्ट पदार्थ बनवू शकता, ज्यामुळे तुम्हाला आवडेल आणि हे पदार्थ उरलेल्या भातापासून बनवले आहेत हे कोणाला कळणारही नाही. जाणून घेऊया शिळ्या भातापासून बनवलेल्या काही पदार्थांची रेसिपी
उरलेल्या भातापासून बनवलेले पदार्थ
फ्राईड राईस
रात्री उरलेला भात फ्राय करून दुसऱ्या दिवशी खाऊ शकता. जिरे, कांदा, हिरवी मिरची, हळद, वाटाणे, गरम मसाला आणि मीठ घालून हलक्या तेलात परतून घ्या. ते अधिक रुचकर बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले घालून ते मंचुरियनसोबत खाऊ शकता.
तवा पुलाव
उरलेल्या भातापासून तुम्ही तवा पुलाव बनवू शकता. जो पावभाजी मसाल्यात बनवला जातो आपल्या आवडीच्या भाज्या घालून ही डिश तयार करा. लंचसाठी हा एक चांगला पर्याय आहे. यासोबतच उन्हाळ्यात थंड ताक किंवा दही आणि कांदा खाऊ शकता.
लेमन राईस
हा दक्षिण भारतीय पदार्थ हे उरलेल्या भातासोबत बनवता येतात. त्यात कढीपत्ता, हरभरा, मसूर आणि मोहरी टाकली जाते, ज्यामुळे त्याची चव आणखी वाढते. तुम्ही या डिशमध्ये शेंगदाणे आणि काजू देखील तळू शकता, जे लेमन राईस अधिक स्वादिष्ट बनवते. यानंतर त्यावर लिंबाचा रस पिळून खा. ही डिश दुपारच्या जेवणासाठी देखील खूप चांगली आहे.
पनीर फ्राईड राइस
ही डिश बनवण्यासाठी उरलेल्या भातामध्ये भाजलेले पनीर मिक्स करून तळून घ्या. त्यात काळी मिरी पावडर, गरम मसाला वगैरे टाकून त्याची चव वाढवता येते. लंचसाठी देखील हा एक चांगला पर्याय आहे.
राईस भजी
संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उरलेल्या भातापासून पकोडे बनवू शकता. बाहेरून बेसनाची कुरकुरीतपणा आणि आतून तांदळाचा मऊपणा यामुळे हे पकोडे खूपच स्वादिष्ट होतात. तुम्ही ते चहासोबत सर्व्ह करू शकता, जे तुमच्या संध्याकाळचा आनंद द्विगुणित करेल.
हेही वाचा>>>
Food :'अशी कशी देवाची करणी!' नारळाच्या आत पाणी नेमकं येतं कुठून? माहीत नसेल तर जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
