Food :'अशी कशी देवाची करणी!' नारळाच्या आत पाणी नेमकं येतं कुठून? माहीत नसेल तर जाणून घ्या
Food : नारळाचे पाणी आरोग्यासाठी खूप चांगले आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण, नारळाच्या आत पाणी कुठून येते हे तुम्हाला माहिती आहे का?
Food : ऋतू कोणताही असो, नारळाचं पाणी हे आरोग्यासाठी अमृत समजले जाते. निरोगी राहण्यासाठी आहारात नारळ पाण्याचा समावेश करणे चांगले असते. नारळ पाणी हे आरोग्यदायी पेय आहे आणि अनेक गुणधर्मांनी समृद्ध आहे. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता तर पूर्ण होतेच, पण त्यात असलेले इलेक्ट्रोलाइट्स आपल्यासाठी फायदेशीर ठरतात. तसेच त्यात कमी फॅट्स असते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठीही नारळपाणी चांगले मानले जाते. पण हे तर नारळाच्या पाणी पिण्याचे फायदे झाले, जे नारळ बाहेरून इतकं कडक असतं की मुंगी शिरायलाही जागा नसते, अशा नारळामधील पाणी नेमकं येत कुठून याचा विचार कधी केलाय का? माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहोत. जाणून घ्या..
शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळपाणी हा एक चांगला पर्याय
उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवण्याचा सल्ला दिला जातो. डिहायड्रेशनमुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात हायड्रेशनची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळपाणी हा एक चांगला पर्याय आहे. जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असलेले नारळाचे पाणी शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखते. त्यात अँटी-ऑक्सिडंट्सही भरपूर असतात. अर्थात नारळ पाण्याचे फायदे आपल्या सर्वांना माहीत आहेत. पण, आरोग्याच्या गुणधर्मांनी भरलेले हे पाणी नारळाच्या आत कुठून येते हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊया..
नारळाच्या आत पाणी कुठून येते?
नारळाची झाडे खूप उंचावर वाढतात. नारळ हे बाहेरून कठीण आणि सर्व बाजूंनी बंद असते. अशा स्थितीत पाणी कुठून येते हा प्रश्न अनेकांना पडतो.
आपण जे नारळाच्या आतील पाणी पितो ते खरं तर वनस्पतीच्या एंडोस्पर्मचा भाग आहे.
खरं तर, नारळाचे झाड पाणी गोळा करण्यासाठी किंवा राखून ठेवण्यासाठी आपल्या फळांचा वापर करते. त्यामुळे नारळाच्या झाडाचे पाणी हे त्याच्या फळात साठवण्याचा एक मार्ग म्हटला तरी चालेल.
झाडाच्या मुळांद्वारे हे पाणी गोळा करून फळांपर्यंत पोहोचवले जाते. मुळं आणि फळांच्या पेशींद्वारे हे पाणी फळांच्या आत येते.
यानंतर, जसजसे हे नारळ पिकू लागते, एंडोस्पर्म पाण्यात विरघळू लागतात आणि पाणी हळूहळू सुकते. जेव्हा नारळ सुकतो, तेव्हा आपण खातो ते म्हणजे नारळाचा चव किंवा खोबरं.. हे या एंडोस्पर्मचे घन स्वरूप असते.
ही संपूर्ण प्रक्रिया नारळाच्या झाडाच्या पेशींद्वारे होते.
जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, एंडोस्पर्म प्रथम द्रव स्वरूपात असते. हे रंगहीन द्रव नारळाचे पाणी असते आणि नंतर पेशींसह ते नारळाच्या आतल्या बाजूने जमा होऊ लागते. हळूहळू ते नारळातील खोबऱ्यामध्ये बदलते.
झाडाच्या विकासादरम्यान, फर्टिलाइजेशननंतर एंडोस्पर्मचे रुपांतरण नंतर न्यूक्लियसमध्ये बदलते.
नारळाचं पाणी थकवा आणि डिहायड्रेशन दूर करते, तसेच शरीराला शक्ती देते.
हेही वाचा>>>
Travel : काय सांगता! चक्क जमीनीच्या आतून वाहते 'ही' अनोखी नदी? रामायणाशी संबंधित रहस्य, नेमकं सत्य काय?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )